Sunday, February 2, 2025

रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा च-हाटा रोडवरील पालवणफाटा येथील निरूपयोगी रेल्वे पुलाची तपासणी करणार का! रेल्वे रुळ ओलांडताना ग्रामस्थांचे हाल डॉ.गणेश ढवळे


बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा म्हणजे अहिल्यानगर – बीड – परळी रेल्वे मार्ग या वर्षात रेल्वे धावणार असून ४० वर्षापासून पाहिलेले बीडकरांचे स्वप्न साकार होणार असल्याने बीडकरांना रेल्वे चाचणी उत्सुकता आहे. यादरम्यान नवगणराजुरी ते बीड अशा १३ किलोमीटर अंतरावर रेल्वे रूळ अंथरण्याचे काम पूर्ण झाले असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या मार्गावरील सुरक्षित चाचणी घेण्यात येणार असल्याची घोषणा गेल्या महिन्यात करण्यात आली होती. याच धर्तीवर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा हे स्वतः ५ फेब्रुवारी रोजी राजुरी ते बीड स्थानकांदरम्यानची तपासणी करणार आहेत. बीड तालुक्यातील च-हाटा रोडवरील पालवण फाटा येथील २ कोटी ७० लाख रुपये खर्चून बांधण्यात 

आलेल्या आणि निरूपयोगी असलेल्या पुलाची पाहणी करणार का? संबंधित प्रकरणाची चौकशी करणार का? आणि शासनाची दिशाभूल व आर्थिक नुकसान प्रकरणी संबंधितांकडून नुकसान भरपाई वसूल करणार का? त्याच बरोबर याठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना न केल्याने ग्रामस्थांचे हाल होत असुन याची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सुचना संबंधित आधिका-यांना देतील काय? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि शेख युनुस च-हाटकर, सुदाम तांदळे यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment