परळी वैजनाथ ;- महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाच्यावतीने दि.1अॉक्टोंबर ते दि.7 अॉक्टोंबर दरम्यान राज्यात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे.त्यानिमित्ताने 4 अॉक्टों.रोजी शाळा सुरु होण्याच्या पहील्याच दिवशी शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांचा पुष्प गुच्छ देऊन स्वागत करुन वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
प्रास्ताविकात सामाजिक कार्यकर्ते वृक्षमित्र चेतन सौंदळे यांनी वन्यजीव सप्ताह-21बाबती माहिती विषद करून विद्यार्थ्यांना पक्षी संवर्धन,पक्ष्यांची घरटे तयार करणे वन्यजीव व वृक्ष लागवडीचे महत्तव पटवून दिले तसेच अंबेजोगाई येथील वनपाल श्री.जी.बी.कस्तुरे यांनी वन्यजीव संरक्षण बाबतची माहिती देऊन मानव -वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची कारणे व अन्न साखळीतील एक सुध्दा प्राणी कमी झाला तर त्याचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.भागवत कराड,अंबेजोगाई वन विभागाचे वनपाल श्री.जी.बी.कस्तुरे ,वनपाल श्री.सी.एच.राठोड,श्री.एस.जे.राऊत,सौ.पी.जे.तागड, शाळेतील शिक्षक श्री.सुनील गर्जे सर, श्री.आर.बी.मुंडे सर,श्री.एल.पी.फड सर,श्रीधर गुट्टे सर,श्री.रामेश्वर नागरगोजे सर,श्री.रणवीर वाव्हळे सर,श्री.तांदळे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
No comments:
Post a Comment