Friday, January 31, 2020

अखिल भारतीय 6 व्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन.* पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे,आ. प्रकाश सोळंके,आ. संजय दौंड,मा. आ. पृथ्वीराज साठे यांची प्रमुख उपस्थिती. स्वागताध्यक्षा;- शिवकन्या सिरसाट


परळी (प्रतिनिधी)
परळी तालुक्यातील मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही शनिवार,दि 8 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता सहाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या धम्म परीषदेची सध्या जय्यत तयारी सुरू असून तयारीसाठी धम्मप्रेमी जनतेने पुढाकार घेतला आहे.या धम्म परिषदेला पुज्य भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा),पुज्य भिक्खू पय्यानंद (लातूर),पुज्य भिक्खू ज्ञानरक्षित (औरंगाबाद),पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली), पुज्य भिक्खू पय्यारत्न (नांदेड) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी,चोखामेळा सहकारी सोसायटी वसंतनगर चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून या धम्म परिषदेला धम्मप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन धम्म परिषदेच्या स्वागताध्यक्षा बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाट,  व परिषदेचे अध्यक्ष अँड अनंतराव जगतकर संयोजक तथा तक्षशीला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवनचे अध्यक्ष चंद्रकांत साधु इंगळे व  प्रा प्रदिप रोडे  आदींनी संयुक्तरित्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.


तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवन (ता.परळी जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी,मौजे चांदापुर,ता.परळी येथे शनिवार,दि 2 फेब्रुवारी 2020 रोजी होणार्‍या सहाव्या बौद्ध धम्म परिषदेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी येथे संपन्न होणार्‍या सहाव्या धम्म परिषदेची सुरूवात सकाळी 9 वाजता पंचरंगी धम्मध्वजारोहणाने  होईल.यावेळी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे
 पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे, आ.प्रकाशदादा सोळंके,आ. संजयभाऊ दौंड,माजी आ. पृथ्वीराज साठे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.या 
बौध्द धम्म परीषदेच्या स्वागताध्यक्षपदी बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाट या असणार आहेत.तर अध्यक्षस्थानी आयु.अ‍ॅड. अनंतराव जगतकर (अध्यक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनी) तर यावेळी धम्मपीठावर परळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला गित्ते,जि.प.सदस्य प्रा.डॉ.मधुकर आघाव, जि.प.सदस्या आशाताई संजयभाऊ  दौंड,प्रा.डॉ.अर्चना कांबळे (कोल्हापुर),नालंदा आकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे,परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मीक कराड,सरपंच डी.एस.राठोड, सरपंच भामाबाई हानवते, उपसरपंच श्रीहरी गित्ते,प्रा.डॉ. विनोद जगतकर,परळी न.प.चे स्वच्छता समितीचे सभापती किशोर पारधे, स्वच्छता निरिक्षक शंकर साळवे, नगरसेवक नितीन रोडे,  अनंत इंगळे,दत्ता सावंत (परळी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संयोजन समितीने चांदापुर येथे होणार्‍या या धम्म परिषदेची सर्व तयारी पुर्ण केली आहे.वसंतनगर तांडा रस्त्यापासून वृध्द,अपंग व महिला यांना जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी संयोजन समितीचे मुरलीधर कांबळे (बौद्धाचार्य),दिलीप वाघचौरे (बौद्धाचार्य),माणिक रोडे,मधुकर वेडे,व्यंकट वाघमारे, मिलींद नरबागे,राज जगतकर, प्रभाकर बडे,प्रा.बी.एस. बनसोडे,राजाभाऊ घाटे,किशोर इंगळे,चंद्रकांत बनसोडे,संजय साळवे (पुस),सुरेखा रोडे, सुभाष वाघमारे अर्जुन काळे,आकाश वेडे,विनोद रोडे, धनंजय जोगदंड,सुशिल इंगळे, शिलाताई जोगदंड,रूक्मीण गोरे,लखन सावंत, अर्जुन वाघचौरे बुद्धकरण जोगदंड,संजय सिंगणकर,संजय जोगदंड,श्रीराम वैद्य, प्रसिद्धीप्रमुख प्रा.बालाजी जगतकर यांनी पुढाकार घेतला आहे.तरी परळी व अंबाजोगाई तालुक्यातील धम्मप्रेमी जनतेने पांढरे वस्ञ परिधान करूनच धम्म परिषदेस उपस्थित रहावे असे आवाहन तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाणचे चंद्रकांत इंगळे,प्रा.प्रदिप रोडे, राजेंद्र घोडके,राहुल घोडके, प्रा.गौतम गायकवाड,सचिन वाघमारे,जगन सरवदे,विश्‍वनाथ भालेराव,सिमा इंगळे आदींनी केले आहे.

मुकनायक शताब्दी पुरस्कार सोहळाडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकच्या माध्यमातून उपेक्षितांच्या आवाजाला वाचा फोडली-पो.नि.बाळासाहेब पवारपत्रकारांनी सत्यता पडताळून वृत्त प्रकाशित करावे-सौ.सरोजिनीताई हालगे.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ भारतीय राज्यघटनाच लिहिली नाही तर अनेक क्षेत्रात त्यांचे कार्य आहे. पाक्षिक मूकनायक सुरु करुन बाबासाहेबांनी उपेक्षितांच्या आवाजाला वाचा फोडण्याचे काम केले असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप करतांना नगराध्यक्षा सौ.सरोजिनीतार्ई हालगे यांनी पत्रकारांनी सत्यता पडताळून वृत्त प्रकाशित करावे असे आवाहन केले. मूकनायक शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे संपन्न झाला. कार्यक्राच्या सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करुन तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक प्रतिज्ञा देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.सरोजिनीताई हालगे होत्या तर कार्यक्रमाचे उद्घाटन संभाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या हस्ते झाले. ग्रामिण पोलिस ठाण्याचे पो.नि.प्रदिप त्रिभवन, निवासी नायब तहसिलदार क्षितिजा वाघमारे, पोलिस सहाय्यक निरीक्षक आरती जाधव, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा जाधव, प्रा.दयानंद कुरुडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी अनंत इंगळे यांनी तीन ग्रंथ तर गुरुदास आश्रमाचे दास महाराज यांनी ग्रामगिता पत्रकारसंघास भेट दिली.
यावेळी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणार्‍या पत्रकार प्रा.रविंद्र जोशी, प्रा.प्रविण फुटके, धनंजय आढाव, प्रा.राजु कोकलगावे, दत्ता काळे, जगदिश शिंदे, विठ्ठल साबळे यांचा मूकनायक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास चेतन सौंदळे, प्रा.विलास रोडे, अनंत इंगळे, डॉ.ऐश्वर्या जाधव, इंजि.जयवर्धन सुर्यवंशी, फुले आंबेडकर अभ्यासक जयपाल कांबळे, दास महाराज, सुनिल धिमधिमे, बापु गायकवाड, संपादक राजेश साबणे, संजय खाकरे, प्रेमनाथ कदम, धनंजय आरबुने, सचिन वंजारे, अ‍ॅड.कपिल चिंदालिया, महादेव गित्ते आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, शहराध्यक्ष संभाजी मुंडे, कार्याध्यक्ष धिरज जंगले, मोहन व्हावळे आनंद तुपसमुद्रे,विकास वाघमारे ,आकाश देवरे,महेश मुंडे,बाबा शेख,गणेश आदोडे व पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भगवान साकसमुद्रे यांनी केले. सुत्रसंचालन रानबा गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन अनंत गित्ते यांनी केले.

*'जल्लोष तरुणाईचा' : महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची उत्साहपूर्ण सांगता*


परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)

          'जल्लोष तरुणाईचा' हे ब्रीद घेऊन युवा मनाचा आविष्कार , स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात गेल्या दोन दिवसात पाहावयास मिळाला. पहिल्या दिवशी आनंदनगरी या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संजय  देशमुख यांचा शुभहस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी , संस्थेच्या  संचालिका छाया देशमुख,  प्रा .डॉ. विद्या देशमुख , प्राचार्या डॉ .आर. जे .परळीकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती . आनंदनगरी  , रेट्रो व विविध फनी गेम या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांनी पहिला दिवस दणाणून सोडला .
         पहिल्या दिवसाच्या आनंदाला आणखी उभारी देत दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात शेला पागोटे या कार्यक्रमाने झाली . मुलींच्या कल्पनाविलासाला चालना देणाऱ्या या कार्यक्रमाअंतर्गत स्नेहसंमेलन उद्घाटन व पारितोषिक वितरणाचा सोहळा पार पडला . 
            या कार्यक्रमासाठी उद्घाटक संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ .आर. जे. परळीकर, संचालिका डॉ. मीनल लोहिया व मनोहर कांबळे, छाया देशमुख,  प्रा .डॉ.विद्या देशमुख, प्रा. डॉ. विनोद जगतकर, प्रा. डॉ. प्रवीण दिग्रस्कर यांची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमास संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिलराव देशमुख, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांच्या शुभेच्छा लाभल्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विद्येची देवता सरस्वती आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शामरावजी देशमुख  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा . प्रवीण फुटके यांनी केले .  संजय देशमुख यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. आपल्या उद्घाटनपर वक्तव्यात त्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, कै. शामरावजी देशमुख आणि महाविद्यालयाच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतींना सर्वप्रथम अभिवादन केले. विद्यार्थिनींना उद्देशून ते म्हणाले की तुमची उपस्थिती आम्हाला प्रसन्न करते. तुमच्या प्रसन्न वयामध्येच यावसं वाटतं.अशा प्रकारचे कार्यक्रम कलागुणांना वाव देणारं हक्काचं व्यासपीठ मिळवून देतात. व्यक्तिमत्व विकासासाठी अशाप्रकारचे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे असतात,त्याचा आपणा सर्वांनी आनंद घ्यावा. त्यासोबतच आपल्या मैत्रिणींच्या कर्तृत्वाला दाद देणे हा एक फार मोठा सद्गुण आहे , तो सर्वांनी जपावा आणि संवर्धित करावा. अशा प्रकारचा मोलाचा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ .आर.जे. परळीकर मॅडम यांच्या वतीने अध्यक्षीय समारोप करताना प्रा . डॉ . विनोद जगतकर यांनी महिलांच्या शिक्षणाची गंगा परळीपर्यंत आणण्याचे कार्य कै. शामरावजी देशमुख यांनी केले त्यामुळेच परळीसारख्या शहरांमध्ये सुरक्षित पद्धतीने मुली शिक्षण घेत आहेत. असे प्रतिपादन त्यांनी केले. तथागत गौतम बुद्धांच्या जीवनाच्या प्रसंगाचा आधार घेऊन त्यांनी 'अत्त दीपं भव'  म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा ! असा अनमोल संदेश विद्यार्थिनींना दिला . 
           या कार्यक्रमात महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींचा गौरवही करण्यात आला . याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख  प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड  यांचा आविष्कार फाउंडेशन कोल्हापूरचा राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि श्रीनाथ सेवा प्रतिष्ठान नाथरा परळी चा साहित्य सेवागौरव पुरस्कार  मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला . तसेच प्रा . वीणा पारेकर यांना संस्कृत विषयातील यूजीसी च्या वतीने दिली जाणारी राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल गौरवण्यात आले.
              द्वितीय दिवसाच्या सायंकालीन सत्रात विद्यार्थिनींच्या कलागुणांना आविष्कृत करणारा व भारतीय संस्कृतीचे सर्वांगीण दर्शन घडविणारा रंगारंग असा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला . यात प्राचीन भारतीय नृत्याविष्कारासोबत राष्ट्रभक्तीपर गीत , लावणी , सिनेगीत , गोंधळ आदींवर अप्रतिम नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. आर.के.यल्लावाड, आभार प्रा. डॉ.खिल्लारे यांनी मानले . या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ .आर. जे .परळीकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली . या दोन दिवसात विद्यार्थिनींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता .

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नवगण महाविद्यालय येथे एच आय व्ही एड्स जनजागृती व तपासणी शिबीर.


 गुरुवार रोजी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत परळी शहरातील नवगण कॉलेज येथे एच आय व्ही एड्स जनजागृती व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात प्रथम तेथे जमलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक असे एकूण दीडशे लोक उपस्थित होते त्या सर्वांना एच आय व्ही एड्स संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली त्यानंतर टीबी गुप्तरोग या आजारावर माहिती देण्यात आली व वयानुसार होणारे शारीरिक बदल व त्याचा शारीरिक व मानसिक परिस्थितीवर होणारापरिणाम पटवून देण्यात आला व त्यानंतर तपासणी करण्यात आली आजच्या शिबिरामध्ये 82 लोकांनी स्वतःची एच आय व्ही व सीबीसी ची तपासणी करून घेतली 

दिव्या फाऊंडेशन "समाजमानव" पुरस्काराने सन्मानित .पुरस्कार स्वीकारताना अशोक काकडे सुनील तिजारे व मोरे.

▪ 

बुलडाणा :  समाजाच्या उत्कर्षांसाठी नि:स्वार्थ भावनेने राज्यात कार्यरत असलेल्या दिव्या फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव करीत अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद (जाळीचा देव ) बुलडाणाच्यावतीने"समाजमानव" पुरस्कार बहाल  करण्यात आला आहे. ३० जानेवारीला अजिंठा रोडवरील श्री पंचकृष्ण मंदिर श्रीगोपाल आश्रम येथे लोणकर बाबा यांचे व मान्यवरांच्या  हस्ते हा पूरस्कार दिव्या फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक काकडे व पदाधिकाऱ्यांनी स्विकारला. गेल्या अनेक वर्षापासून राज्यभरात दिव्या फाऊंडेशन विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करीत आहे.सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्यात संस्थेचा हिरीरिने सहभाग असतो. वंचीत व निराधांरासाठी आधारवड बनलेल्या दिव्या फाउंडेशनने  आजवर केलेल्या सेवाभावी कामाचे मुल्यमापन करुन भविष्यात त्यांना अधिक जोमाने कार्य करण्यास प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांना अभा पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्या वतीने "समाजमानव" पूरस्काराने मान्यवरांच्या उपस्थितित शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले आहे.  यावेळी राजेंद्र मोरे,सिद्धार्थ आराख, संगिता राजपूत,सुनील तिजारे,मंगेश ठाकरे, गजानन  अवसरमोल मोहसीन खान,चंदूकुमार बहेकार,डॉ गौतम अंभोरे  डॉ.निकम यादी दिव्या फाऊंडेशनचे सहकारी उपस्थित होते, दिव्या फाऊंडेशन च्या कार्याचा पाठीशी उभे असणाऱ्या सर्व पत्रकारांकडून  सुद्धा शुभेच्छा मिळाल्या.

Thursday, January 30, 2020

शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजप आजही सत्ता स्थापनेस तयार . मा.ना. सुधीर मुनगंटीवार

 

नांदेड : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता दोन महिने उलटले आहेत. परंतु, अजूनही भाजपला आपण सत्तेत येणार असल्याची आशा असल्याचे दिसत आहे. कारणशिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजप आजही सत्तास्थापनेसाठी तयार आहे, असे आशादायी वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. नांदेडमध्ये एका विवाहसोहळ्याला माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच मनसेला सोबत घेण्याची गरज नसल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. शिवसेनेवर खोचक टीका करण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. “मुंबईच्या शक्तिशाली मातोश्रीचा शक्तिपात झाल्यानेच दिल्लीची मातोश्री शक्तिशाली झाली. शिवाय शिवसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा म्हणजे एकविसाव्या शतकातील आश्‍चर्य आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी, शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यांनी आताही प्रस्ताव दिला तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही. देर आए दुरुस्त आए ,सुबह का भुला श्‍याम को आया, असे आम्ही समजू. तसेच मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्‍यकता नाही आणि तसा प्रस्तावही मनसेकडून आलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले. समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपची भूमिका असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

दिनांक 2 फेब्रुवारी ला 'माऊली सेवा मंडळ नागपूर च्या वतीने झुणका भाकर महानैवैद्य सोहळा नागपुरात .अॕड प्रशांत समर्थ

'                नागपूर :दिनांक 30जानेवारी (राजेशबाबू सोनुने ) दिनांक 2 फेब्रुवारी 2020 रोजी गजानन धाम रेशीमबाग मैदान ,नागपूर येथें माऊली बहुउदेशीय सेवा मंडळाच्या वतीने  भव्य  गजानन भक्त मेळावा रविवारी आयोजित करण्यात येत आहे. या अध्यात्मिक मंगल सोहळ्याच्या सामूहिक सत्संग द्वारे विश्व कल्याण &सामाजिक सद्भाव टिकविण्यासाठी व पर्यावरणावर जनजागृती करण्याचं सामान्य  सेवकांचा  हा एक चांगला प्रयत्न आहे.विदर्भातील सर्व गजानन महाराज भक्त मिळून श्री गजानन महाराज यांच्या चरणी झुणका भाकर महानैवैद्यासह महाप्रसाद तील सर्व पदार्थ सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सेवक भक्तांच्या हातूनच सामूहिक रित्या तयार केले जातील.नागपुरात प्रथमच शेगाव नगरी अवतरणार आहे .श्री संत गजानन महाराज आपल्या कडून सेवा घडवून येतील व महाप्रसादाचा लाभ  सर्व गजानन महाराज भक्तांना व भाविकांना घेता येईल.                         कार्यक्रम:-शनिवारी दिनांक 1फेब्रुवारी 2020 ला सेवा देणारे गजानन महाराज सेवाधारी दुपारी  3 वाजता उपस्थित राहतील व कलश पूजन,श्री अन्न पूर्णा मातेच्या पूजन व हवना नन्तर  महिला सेवेकरी  तर्फे झुणका भाकरी सेवेला प्रारंभ होईल.सायंकाळी  7 वाजता  श्री क्षेत्र काचूरणा, जयपूर मुंडगाव येथून श्री च्या  मुळंचरण पादुका चे  शुभ आगमना प्रसंगी स्वागत विठु माऊली वाद्य पथकाचे  वादन  होईल.        रविवारी  2 फेब्रुवारी  2020 ला  झुणका भाकर महानैवेद्य सोहळा सकाळी पहाटे 5 वाजता काकड आरती सकाळी 5-30वाजता संत दासगणू विरचित  श्री गजानन विजय ग्रंथाचे  अखंड वाचन सकाळी 6 वाजता  वेद शास्त्र ब्राम्हनाच्या मंत्त्रोउपोचरात श्रीचा  अभिषेक  सकाळी 9 वाजता कलाभिंय सादर  करतील .अभंग,नृत्य आणि संत भक्ती प्रसंग तसेच 10-15 वाजता   आनंदी ग्रुप तर्फे  देवीचा गोंधळ ,नृत्य  दुपारी  12 वाजता  महाआरती व दुपारी 12-30वाजता महाप्रसाद  होणार आहे पत्रकार परिषदेत माऊली बहुउदेशीय सेवा मंडळाच्या वतीने ऍड प्रशांत समर्थ ,श्रीकांत भुयारकर, प्रफुल्ल पडोळे, भावना कणेरे, संजय काळे,राहुल बोंद्रे, ऍड निलेश आंबिलवादे, लकिसिंग, इक्बाल सिंग, किशोर माकडे, प्रशांत तिजारे, सुरेश सवाई,इत्यादी पत्रकार परिषदेत सहभागी होते .

*परळीत श्री संत मन्मथ स्वामी महाराजांचा जन्मोत्सव थाटात साजरा.*वेदांताचार्य श्री सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांचे आशिर्वचन.


*परळी वैजनाथ (प्रतिनिधी)*

येथील श्री  गुरूलिंग स्वामी मठ संस्थान (बेलवाडी) मध्ये वीरशैव लिंगायत
समाज परळीच्या वतीने श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांच्या
जन्मोत्सव आज गुरुवार  दि.30 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित शेकडो महिलांनी पाळना म्हणला व पुजा केली.यावेळी श्री
सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामींच्या जन्मोत्सवानंतर आरती झाली व प्रवचन झाले. यावेळी संत शिरोमणी मन्मथ
स्वामींच्या कार्यावर श्री सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांनी प्रकाश टाकला.
श्री गुरूराज माऊली, श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय अशा जयघोषात श्री सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांचे आशिर्वचन झाले. 
दरम्यान याच कार्यक्रमात सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या हस्ते नुकताच दै.मराठवाडा साथीच्या वतीने परळी भूषण व विशेष गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल वीरशैव लिंगायत समाजातील परळीचे नायब तहसीलदार सदानंद बरदाळे, पत्रकार संतोष जुजगर व आदर्श शिक्षिका सौ.चेतना गौरशेटे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. 
श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी जन्मोत्सव साजरा करण्यासाठी महिलांची प्रचंड संख्या होती. सकाळी पारायण दुपारी जन्मोत्सव व महाप्रसाद झाला व तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता  झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव लिंगायत समाज परळीच्या महिला, पुरूष व युवकांनी अथक परिश्रम घेतले.

*शिवनामात रंगला अवघा भक्तरंग*

परळी हे प्रभू वैद्यनाथ प्रभूंच्या वास्तव्याने पुणित झालेले शहर असून या शहराच्या कानाकोपऱ्यात नेहमीच अध्यात्मिक कार्यक्रम होत असतात. त्यातही श्रीं च्या पायथ्याशी असलेल्या श्री गुरूलिंग स्वामी मठात नुकतीच संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास असलेली महिलांची मोठी उपस्थिती, भक्तीपूर्ण आणि ओजस्वी वाणीतील शिव प्रवचन यामुळे हा कार्यक्रम भक्तीरसात नान्हून निघाला. सातत्याने होणाऱ्या शिवनामात अवघा भक्तरंग भरला गेला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल उपस्थित भाविकांनी संयोजकांचे आभार व्यक्त करण्यासोबतच असे कार्यक्रम मानवी
जीवाला शुद्ध करण्यासोबत अंत:करणात श्रद्धेचे बीजारोपण करतात अशी
प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

सौ.राजश्री धनंजय मुंडें यांच्या वतिने परळीत हळदी-कुंकू समारंभ.


मकर संक्रांतीनंतर महिलांच्या स्नेहाचा, हळदी कुंकू व तीळ गुळासह स्नेहाच्या देवाण घेवाणीचा हळदी कुंकू समारंभ आज परळी येथील राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या पंढरी या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी मुंडे कुटुंबियांच्या वतीने सर्व महिलांना हळदी कुंकू, तिळगुळ व वाण देऊन स्वागत केले.
यावेळी पंडित कल्याणजी गायकवाड प्रस्तुत सारेगमप फेम कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. आज या हळदी कुंकू समारंभाचा पहिला दिवस असून परळी तालुक्यातील असंख्य महिलांनी सहभाग घेतला होता. तर या समारंभाचा उत्तरार्ध उद्या होणार असून उद्या शहरातील महिला सहभागी होणार आहेत. परळीतील महिला वर्गाने आमच्या कुटुंबावर भरभरुन प्रेम केले आहे, हा समारंभ म्हणजे आमच्यातील स्नेह वृद्धिंगत होण्याचे एक माध्यम आहे अशा शब्दात सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या समारंभात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्याताई शिरसाट, धनंजय मुंडे यांच्या भगिनी सौ. उर्मिलाताई केंद्रे, सौ. शकुंतला ताई केंद्रे, सौ. प्रेमिलाताई केंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर मुंडे कुटुंबियांच्या वतीने सौ. राजश्रीताई यांच्यासह सौ. मनीषा अजय मुंडे, सौ. सरिता विजय मुंडे, सौ. अमृता रामेश्वर मुंडे व सौ. सोनाली अभय मुंडे यांनी महिलांचे स्वागत करत हळदी कुंकू, वाण व तिळगुळ देऊन स्वागत केले.

जात-धर्म विसरून सरकारला ढसळलेल्या अर्थव्यवस्था बेकारी इत्यादी विविध प्रश्नावर जाब विचारा.;- डाॕ .राजेश इंगोले

परळी -  प्रतिनीधी
   अमित शाह आणि नरेंद्र मोदी गुजरात निवडणुकीवेळी हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे तंत्र वापरायचे, तेच तंत्र ही जोडगोळी देशभर वापरत आहेत. त्यामूळ सर्वांनी आपले डोके ठिकाणावर ठेवत धर्म बाजूला सारून सरकारला जीवनावश्यक समस्या, ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढत चाललेली बेरोजगारी, संपत चाललेल्या सरकारी नोकऱ्या यावर प्रश्न विचारायला हवेत असे आवाहन प्रसिध्द मानसरोग तज्ञ डाॅ राजेश इंगोले याने केले. सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ सुरू असलेल्या साकळी धरने आंदोलनात मंगळवारी डाॅ इंगोले बोलत होते. 

शहरातील संविधान संरक्षण भुमी नेहरू चौक तळ  मंगळवारी सायंकाळी 7 ते 9 या सत्रात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते वैजनाथ सोळंके, वृत्तसंपादक दत्तात्र्य काळे, ओमप्रकाश अप्पा बुरांडे, नगर सेवक शरद भाऊ मुंडे, संजय आघाव, विठ्ठल दंडे, संयोजन समितीचे अध्यक्ष पी एस घाडगे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डाॅ इंगोले म्हणाले अर्थव्यवस्था ढासळत असताना देशातील जनतेला भ्रमित करण्यासाठी केंद्र सरकारने एनआरसी आणि सीएए लागू केला आहे. याविरोधात सर्वांनी जात धर्म विसरून एकत्र यावे. यावेळी मुफ्ती अशफाक यांनी मुस्लिम समुदायाने या कायद्यांविरोधातील आंदोलने गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गावर राहूनच करावीत असे आवाहन केले.

Wednesday, January 29, 2020

परळी न.प.राष्ट्रवादी चे गटनेते मा.वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 251 न .प.कंत्राटी कामगारांना टिफिन चे वाटप .

परळी नगर परिषदेचे गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या 51 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगर परिषदेच्या सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने नगर पालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना 251 टिफिन बॉक्स चे वाटप करण्यात आले.नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, तथा नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते!*

CAA, NRCच्या विरोधात परळीत बेमुदत धरणे आंदोलन.आज चौथा दिवस . महिलांची लक्षणीय उपस्थिती .


परळी वै….

संविधान बचाव कृती समितीच्या वतिने परळीत
केंद्र सरकारने पारित केलेल्या CAA, NRC, व NPR च्या संविधानद्रोही कायद्याच्या विरोधात आज चौथ्या दिवशी हि आंदोलन चालु आहे.आजाद नगर येथील मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.लहान लहान मुलीनी CAA से आजादी,NRCसे आजादी,संविधानाचा जयघोषकरत आंदोलन परिसर दणाणुन सोडला होता.
26 जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन उभारण्यात आले आहे.या आंदोलनात विविध साहजिक संघटनांनी सहभाग नोंदवला आहे.
या आंदोलनात मुस्लीम समाजातील महिला,लहान लहान मुले मुली यांची उपस्थित लक्षणीय होती.CAA, NRCच्या संबंधित कायदे जो पर्यत केंद्र सरकार माघे घेणार नाही तो पर्यत हे बेमुदत आंदोलन चालुच ठेवण्यात येणार असल्याचे संविधान बचाव कृती समितीच्या वतिने सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीय परमार,पवार क्षत्रिय समाजाचे महाअधिवेशन संपन्न .विविध ठरावांना मंजुरी .



गोंदिया: राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभा व पवार राममंदिर टड्ढस्ट बैहर तसेच राजाभोज स्मारक समितीच्यावतीने मध्यप्रदेशातील बैहर येथे राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेच्या २८ जानेवारीला पार पडलेल्या अधिवेशनात विविध ठरावांना मंजुरी देण्यात आली.यामध्ये मध्यप्रदेशातील मालवा प्रदेशातील परमार समाजाचे पवार समाजासोबत एकीकरण करणे,बैहर येथील राम मंदरी ट्रस्ट्रच्या परिसरात आर्युवैद महाविद्याल सुरु करणे यासह वसंत पंचमीला शासकीय सुट्टी मिळण्यासोबतच येत्या होऊ घातलेल्या जनगणनेत ओबीसींचा प्रवर्ग तयार करुन जातनिहाय जनगणना करुन पोवारी भाषेचा उल्लेख करण्याचा ठराव सर्वसमंतीने घेण्यात आला.या अधिवेशनाला महाराष्ट्र,मध्यप्रदेश,छत्तीसगड,राजस्थान,हरियाणासह विविध राज्यातील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या अधिवेशनाची सुरवात ध्वजारोहण करुन करण्यात आली.अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे राष्ट्रिय अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे होते.अधिवेशनाच्या सुरवातील महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशजी देशमुख यांनी स्वागतपर विचार व्यक्त करतांना महासभेने गेल्या अधिवेशनापासून आजपर्यंत समाजपयोगी हिताचे निर्णय घेतले असून देशातील सर्व पवार,परमार समाजाला एकत्र आणण्यावर भर देत असल्याचे सांगितले.जुर्ले २०१८ पासून ते आजपर्यंतच्या झालेल्या महासभेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या ठरावांचे वाचन महासभेच्या महासचिव पुष्पा निरजंन बिसेन यांनी केले.त्याचप्रमाणे ठरावासंह समाजातील विवाहपध्दतीत होत असलेले अवडंबर,महासभेला गावपातळीवर नेणे आदी सामान्य सभेतील विषयाचे सविस्तर वाचन महासभेचे छत्तीसगड राज्याचे उपाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी केले.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष इंजि.टेंभरे यांनी राष्ट्रीय महासभा सर्वांना सोबत घेऊन काम करीत असून गावपातळीवर जाऊन महासभेचा विस्तार करण्यावर भर असल्याचे सांगितले.सोबतच गावपातळीवरील आणि इतर पवार समाजातील संघटनांना महासभेशी जोडण्यात येणार असल्याचे सांगितले.१९६४मध्ये भोयर पवार या शाखेचे पवार(पोवार)समाजासोबत एकीकरण करण्यात आले असून या दोन्ही शाखेत आज सामाजिक व्यवहार व संबध स्थापित झालेले असून मध्यप्रदेशातील मालवा भागात असलेल्या परमार समाजाची विचारधारा,संस्कृती,राहणीमान ही सर्व आपल्यासारखीच असून ते सुध्दा राजाभोज यांनाच मानत असल्याने त्या समाजाला सुध्दा आपल्यासोबत जोडून घेण्यासंबधी आजच्या अधिवेशनात चर्चा सर्वांच्या उपस्थितीत होत असल्याचे जाहिर केले.जुमदेवपंथ स्विकारणाèया समाजातील लोकांना आपल्या समाजासोबत जोडण्यावरही त्यांनी भर दिला.तसेच राममंदीर ट्रस्टच्या जागेवर आयुर्वेद महाविद्यालय स्थापन करणे आणि येत्या २०२१ च्या जनगणनेत आपल्या समाजाची ओबीसी प्रवर्गामध्ये जनगणना व्हावी यासाठी सर्वांनी प्रगणकासोबतच शासनाकडे पोवारी,भोयर-पवारी,आपल्या मातृभाषेचा उल्लेख करण्याचे आवाहन केले.
मंचावर उपस्थित  राष्ट्रीय महासचिव पुष्पा बिसेन,शिवनी जि.प. अध्यक्ष मिना बिसेन,राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेश देशमुख,राजेंद्र पटले,अशोक बिसेन, मोतीलाल चौधरी,राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेचे माजी अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे,अखिल भारतीय भोयर पवार महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.डी.राऊत, गौरीशंकर टेंभरे,शंकरलाल पवार,मालवा येथील बन्नोqसह परमार,जालंधर येथील जालमqसह सोडा,हरियाणातील वेदपालqसह परमार,पुणे येथील मनोहर पवार,देवासचे कुंजीलाल परमार,आष्टाचे आनंद परमार,डॉ.गुलाब परमार,शैलेंद्रqसह परमार,भवानीqसहजी परमार,एन.आर.डोंगरे,माजी आमदार हेमंत पटले,माजी आमदार मधु भगत,प्रभाकर खौसी,देविका कटरे,किरणलता चोपडे,पुष्पलता बारंगे,राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रल्हाद पटले,कोषाध्यक्ष रमेश टेंभरे,सिवनी पवार समाज संगठन अध्यक्ष हरकचंद टेंभरे,कारंजाचे भगवान बन्नगरे,वारासिवनीचे जे.एल.बिसेन,गोमती ठाकूर,मोसम हरिणखेडे,लेखqसह राणा,रायपूर सगंठन अध्यक्ष किरणकुमार चव्हाण यांच्यासह अनेकांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले.अधिवेशनाच संचालन राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय संगठन सचिव खेमेंद्र कटरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक बिसेन यांनी मानले.या राष्ट्रिय अधिवेशनाला राष्ट्रीय महासभेचे सर्व पदाधिकारी,कार्यकारीणी सदस्य,देशातील विविध राज्यातील व जिल्ह्यातील पवार समाज संघटनेचे पदाधिकारी यांच्या समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा,राम मंदिर ट्रस्ट व राजाभोज स्मारक समितीसह बैहर येथील नगर संगठनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

राज्यात नव्या 22 जिल्ह्यांचा प्रस्ताव, लातूरमधून उदगीर, बीड मधुन अंबेजोगाईच नाव .


राज्यात नवे 22 जिल्हे आणि 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठमोठ्या जिल्ह्यांचं विभाजन, त्रिभाजन करुन हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे.
/लातूर : राज्यात नवे 22 जिल्हे आणि 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठमोठ्या जिल्ह्यांचं विभाजन, त्रिभाजन करुन हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते.  या समितीने महाराष्ट्रात नवे 22 जिल्हे आणि 49 नवे तालुके असा प्रस्ताव या समितीसमोर होते.

अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण जिल्ह्याच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. तर मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण असे दोन नवे जिल्हे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

लातूरमधून उदगीर जिल्हा निर्मितीच्या हालचालींना वेग

लातूर जिल्ह्यातील उदगीरला जिल्हा म्हणून मान्यता देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कर्नाटक सीमावर्ती भागाला लागून असलेला उदगीर तालुका हा शिक्षण, व्यापार आणि अन्नधान्याची बाजारपेठ यासाठी प्रसिद्ध आहे. उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी सातत्याने आंदोलन करण्यात आली आहेत. आता सरकारने विभागीय आयुक्तांना उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्याने, उदगीर आता जिल्हा होण्याची चिन्हं आहेत.

उदगीर जिल्हा झाला तर लातूर जिल्ह्यातील देवणी आणि जळकोट हे तालुके त्यात समाविष्ट होतील, तर नळेगाव हा नव्याने तालुका होईल आणि नांदेड जिल्ह्यातील मुकरमाबाद हा नव्याने तालुका होऊन उदगीरमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर आणी मुखेड देखील उदगीरला जोडता येऊ शकते. उदगीर जिल्हा करताना साधारणतः 60 किमी अंतरावरील मोठ्या लोकसंख्येच्या गावांना तालुका म्हणून मान्यता दिली जाऊ शकतो.

कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मितीचा प्रस्ताव?

नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण

ठाणे जिल्ह्यातून- मीरा-भाईंदर आणि कल्याण

बुलडाणा जिल्ह्यातून खामगाव

यवतमाळ जिल्ह्यातून पुसद

अमरावती जिल्ह्यातून अचलपूर

भंडारा जिल्ह्यातून साकोली

चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर

गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी

जळगाव जिल्ह्यातून भुसावळ

लातूर जिल्ह्यातून उदगीर

बीड जिल्ह्यातून अंबेजोगाई

नांदेड जिल्ह्यातून किनवट

सातारा जिल्ह्यातून माणदेश

पुणे जिल्ह्यातून शिवनेरी

पालघर जिल्ह्यातून जव्हार

रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड

रायगड जिल्ह्यातून महाड

अहमदनगर – शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर

आज होणारा भारत बंद आम्हीं पाळणार नाहीत – व्यापारी महासंघ


परळी वैजनाथ(प्रतिनिधी) सततच्या बंद चा परिणाम आता थेट व्यापाऱ्यांवर दिसू लागला आज बुधवार रोजी असलेला भारत बंद आम्ही पाळणार नाहीत असे निवेदन परळी शहर व्यापारी महासंघाने प्रशासनाला दिले आहे.सरकार विरोधात असलेल्या आंदोलनाचा परिणाम सर्वसामान्य जनता आणि व्यापार्‍याला भोगावा लागतो. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक हानी होत आहे 2019 मध्ये जवळजवळ वीस एक वेळा व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली आहेत. असे निवेदनात म्हटले आहे.

सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान तर झालेच आहे,शिवाय मोठ्या मॉल्स संस्कृती,ऑनलाईन खरेदी मुळे व्यापारी आपल्या व्यवसायात तोटा सहन करत असून येथून पुढे होणाऱ्या कुठल्याही बंदमध्ये आम्ही व्यापारी सहभागी असणार नाही असे या निवेदनात म्हटले आहे. पोलीस प्रशासनाने व शासनाने आम्हाला सुरक्षा द्यावी आणि दुकान चालू ठेवण्यासाठी सहकार्य करावे.तसेच काही अनुचित प्रकार झाल्यास बंद संघटनाना जवाबदार धरून होणारी नुकसान भरपाई त्यांच्याकडूनच शाससनाने भरून घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.हे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार,परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. या निवेदनावर परळी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड यांच्यासह शहरातील शेकडो व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून बुधवारी परळी बंद मध्ये व्यापारी सहभागी नसून नेहमीप्रमाणे बाजारपेठ सुरू राहणार असल्याची माहिती व्यापारी महासंघाकडून देण्यात आली आहे.

Tuesday, January 28, 2020

पत्रकारीतेतील मित्तभाषी व्यक्तीमहात्व ;- मा.श्री .संतोषजी जुजगर



आमचे परम मिञ अष्टपैलु व्यक्तीमहात्व मित्तभाषी सदैव लोकांच्या अडचणी मध्ये कामी येणारे आमचे मिञ मा.श्री.संतोष जुजगर यांना दैनिक मराठवाडा साथीचा परळी भुषण विशेष गौरव पुरस्कार    जाहीर झाला त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !म्हणतात ना रक्ताच्या पलीकडं च ही एक नात आसत ते म्हणजे मैञीच या नात्यात स्वार्थ नसतो असते ते निखळ प्रेम आणी ते कसे निभवायचे ते शिकावे संतोष कडुन. कधी गर्व नाही आभिमान नाही  नेहमी सामाजिक ,धार्मिक.सांस्कृतिक पत्रकारीतेत सदैव आपल्या  कार्याच्या माध्यमातून प्रसिद्धीला प्राधान्य देणारे संतोषजी जुजगर यांनी तीन  दशके दैनिक मराठवाडा  साथीमध्ये सेवा कराताना  आपल्या  कर्तव्यच्या निष्ठेच्या जोरावर आपली स्वःताची एक वेगळी ओळख निर्माण  केली  आणि यापुढे ही करतील , त्यांच्या या कार्याचा गौरव होत असताना . मिञ म्हणून मला अत्यंनांद होत आहे. संतोषराव आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे , आपण 27 वर्ष एकाच कार्यलयात  टिकून राहिलात . कधीही स्वतः चा स्वार्थ  पहिला नाही .आणी त्याच कार्याची पावती म्हणून आज आपलेला विशेष कार्य गौरवाने सन्मानीत करण्यात येत आहे. आपण अशीच प्रगती करत राहो.हीच पुन्हा एकदा शुभेच्छा .देतो व यापुढे ही असेच यश मिळत राहो ही सदिच्छा .देतो.व थाबतो.             

      बालाजी ढगे

मुकनायक शताब्दी महोत्सवा निमित्त परळी पत्रकार संघाच्या वतिने पुरस्कारांची घोषणा.


मान्यवरांच्या हस्ते दि.31 रोजी वितरण
परळी (प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली सुरु केलेल्या मुकनायक या वृत्तपत्रास यावर्षी शंभर वर्षे पुर्ण होत असुन मुकनायक शताब्दी वर्षानिमित्त परळी पत्रकार संघाच्या वतिने परळी शहरातील पत्रकारिता व छपाई क्षेत्रात कार्य करणार्या एबीपी माझा चे गोविंद शेळके,प्रा.रविंद्र जोशी,धनंजय आढाव,प्रा.प्रविण फुटके,प्रा.राजु कोकलगावे,दत्तात्रय काळे,जगदीश शिंदे,विठ्ठल साबळे या आठ जणांना दि.31 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मुकनायक या वृत्तपत्रास यावर्षी शंभर वर्षे पुर्ण होत असुन या निमीत्ताने वृत्तपत्रांच्या माध्यमातुन समाज जागृती करणार्या पत्रकारांचा व छपाई क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन परळी येथे दि.31 जानेवारी रोजी सकाळी 11 वा.होत असलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पो.नि.बालासाहेब पवार यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सरोजिनी हालगे तर प्रमुख अतिथी म्हणुन निवासी नायब तहसिलदार डॉ.क्षितीजा वाघमारे,स.पोनि.आरती जाधव,डॉ.रविंद्र गायकवाड,माजी उपनगराध्यक्ष आयुब पठाण,न.प.कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे,प्रा.दयानंद कुरुडे,औ.वि.केंद्राचे जनार्धन सुर्यवंशी,अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रा.विलास रोडे, फुले आंबेडकरी अभ्यासक जयपाल कांबळे,सामाजीक कार्यकर्ते चेतन सौंद॓ळे,संपादक सतिश बियाणी,बालासाहेब कडबाणे,प्रकाश सुर्यकर,रामप्रसाद गरड,राजेश साबने,ज्ञानोबा सुरवसे आदींची उपस्थिती राहणार असुन या कार्यक्रमात एबीपी माझा चे गोविंद शेळके,दै.पुढारीचे प्रा.रविंद्र जोशी,दै.दिव्य मराठीचे धनंजय आढाव,दै.सकाळ चे प्रा.प्रविण फुटके,दै.लोकमत टाईम्स चे प्रा.राजु कोकलगावे,दै.मराठवाडा साथीचे दत्तात्रय काळे,दै.बीड संकेत चे जगदीश शिंदे,मातोश्री ऑफसेट चे संचालक विठ्ठल साबळे या आठ जणांचा गौरव करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन परळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, शहराध्यक्ष संभाजी मुंडे, कार्याध्यक्ष धीरज जंगले,निमंत्रक रानबा गायकवाड,मोहन व्हावळे,महादेव गित्ते,इंजि.भगवान साकसमुद्रे,महादेव शिंदे,सुनिल धिमधिमे,गणेश आदोडे,शेख बाबा,श्रीराम लांडगे, बालाजी ढगे आदींनी केले आहे.

विधानपरिषद सदस्य मा.संजय दौंड यांचा शपथविधी संपन्न .




विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय दौड यांचा आज विधान परिषद सदस्य म्हणून मुंबईत सभापती राम राजे निंबाळकर यांच्या दालनात शपथविधी संपन्न झाला
यावेळी उपसभापती नीलम ताई गोरे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार सतीश चव्हाण , माजी मंत्री पंडितराव दौड, माजी आमदार पृथ्वीराज साठे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणून पहिलीच सही; , अन ‘त्या’ पाच अंध जणांना प्रजासत्ताक दिनी ,प्रत्यक्ष प्रत्येकी एक लाखाच्या मदतीचे वाटप
बीड दि. २६….. : सोशल मीडियावर प्रचंड गाजलेल्या बीड तालुक्यातील साक्षाळ पिंप्री येथील त्या पाच अंध व्यक्तींना तसेच सबंध बीड जिल्ह्याला आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या गतिमान कारभाराची प्रचिती आली.
दोन दिवसांपूर्वी आर्थिक मदतीची घोषणा, समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची तत्पर कारवाई आणि रात्री १ वाजता पालकमंत्री म्हणून पहिली सही देऊन अवघ्या ४८ तासात त्यांना प्रत्यक्ष मदतीचे धनादेश वाटप! होय हे सत्य आहे!
आज पोलीस मुख्यालयाच्या मैदानात आयोजित शासकीय ध्वजारोहनाच्या मुख्य कार्यक्रमात साक्षाळपिंपरी येथील त्या पाच अंध जणांना शासकीय मदतीच्या प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
समाजामध्ये दृष्टिहीन म्हणून वावरणाऱ्या निराधार यादव क्षीरसागर, विठ्ठलबाई क्षीरसागर, सम्राट क्षीरसागर, राजाबाई साठे, मुरलीधर साठे, या पाचही लोकांना प्रजासत्ताक दिनी आयोजित समारंभात हे धनादेश म्हणजे अनपेक्षित आणि सुखद धक्काच म्हणावा लागेल.
दोन दिवसांपूर्वी बीड येथील शासकीय विश्राम गृहात या 2 अंध कुटुंबातील 6 व्यक्तींनी सर्वांनी एकत्रित ना. मुंडे यांची भेट घेतली होती, त्यावेळी श्री. मुंडे यांनी समाज कल्याण उपायुक्त सचिन मडावी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एडके यांना निर्देशित करून दिव्यांग बीज भांडवल योजना व समाज कल्याण विभागाच्या शेष निधीतून भरीव आर्थिक मदत करण्याबाबत सूचित केले होते.
त्यानंतर काल (दि. २५) तब्बल रात्री एक वाजता सबंधितांना पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या ‘अपंग कल्याण’ निधीतून प्रत्येकी एक लक्ष रुपये मदतीच्या आदेशावर पालकमंत्री म्हणून पहिली सही ना. मुंडे यांनी केली. तर त्याच परिवारातील सहावा सम्राट याला १८ वर्ष पूर्ण नसल्याने मदत निधी न देता त्याचा शिक्षण व पूरक खर्चसाठी शिष्यवृत्ती देण्याचेही घोषित केले आहे.
त्यानंतर आज ना. मुंडे यांच्या हस्ते त्या पाचही जणांना ध्वजारोहण समारंभात या मदतनिधीच्या प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे आज वाटप करण्यात आले. यावेळी श्री. मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, समाज कल्याण उपायुक्त सचिन मडावी, समाज कल्याण अधिकारी श्री राजू येडके, आ. संदीप क्षीरसागर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या शिवाजी शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
*धनंजय मुंडे यांच्या रूपाने नगद नारायण पावला – दृष्टीहीनांच्या भावना*
नारायण गडाच्या पायथ्याशी वास्तव्य असणाऱ्या व समाजाकडून कायम उपेक्षा मिळालेल्या त्या पाचही जणांनी पालकमंत्र्यांकडून इतक्या तत्परतेने मिळालेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त करताना भावुक होऊन ‘मुंडे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला श्री. नगद नारायण पावले!” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्या गतिमान कारभाराचे व त्यांच्यातील संवेदनशील व्यक्तिमत्वाचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.

Monday, January 27, 2020

परळी मुंबई प्रवास झाला सुखकर परळी आगारातून सुरू केली सेमी स्लीपर बससेवा .


परळी वैजनाथ प्रतिनिधी :
आता परळी मुंबई प्रवास सुखकर होणार असून   राज्य परिवहन महामंडळाने  खास प्रवाशांच्या सोईसाठी २ सेमी स्लीपर  बस  परळी ते मुंबई आज दिनांक २७ जानेवारी रोजी सुरू केली आहे. या बस सेवेचा शुभारंभ जेष्ठ पत्रकार धनंजय आरबूने यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. या प्रसंगी आगर प्रमुख आर. बी. राजपूत, स्थानक प्रमुख अनिल बिडवे, वाहतूक निरीक्षक रामचंद्र सोनवणे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक दत्ता मुंडे उपस्थित होते.

 परळी मुंबई या प्रवासासाठी  या नवीन गाडीचे भाडे  रुपये ८८५ आहे. या बस मध्ये १५ स्लीपर सीट उपलब्ध असून बसण्यासाठी ३० आसन आहेत. या गाडीसाठी कुठलेही सवलतीचे तिकीट चालत नाही. परळी स्थानकातून पहिली सेमी स्लिपर गाडी जाताना या गाडीचे चालक ननावरे आणि वाहक म्हणून नागरगोजे व उल्हास पवार  हे होते. 
या शुभारंभ प्रसंगी परळी शहर पत्रकार संघाचे शहराध्यक्ष महादेव शिंदे, संपादक संघाचे अध्यक्ष प्रकाश सुर्यकर, सचिव आत्मलिंग शेटे, बाबुराव दहीभाते, अनंत कुलकर्णी, संजीब रॉय, सुकेशनी नाईकवाडे,जगदीश शिंदे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. स्थानकातील प्रवाशी, आगारातील समस्त यांत्रिक कर्मचारी आणि सहकारी उपस्थित होते.

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मा.पंकजाताई मुंडे यांचे एकदिवशीय लाक्षणीक उपोषण .

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे यांचं उपोषण होणार आहे. या उपोषणासाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. दरम्यान हे उपोषण सत्तेच्या विरोधात नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष जावं म्हणून हे उपोषण करत असल्याच्या पंकजा मुंडे म्हणाल्या.

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण असणार आहे. सकाळी साडेदहा वाजता पंकजा मुंडे या उपोषणाला सुरुवात करतील. दिवसभर मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर लढा देणारे तज्ज्ञ मार्गदर्श करणार आहेत. दरम्यान, या उपोषणस्थळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत मराठवाड्यातील भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. उपोषणस्थळी मराठवाडा पाण्यापासून कसा वंचित राहिला आहे, याचं चित्रप्रदर्शन लावण्यात आलं आहे. वॉटर ग्रीड हा महत्वाकांक्षी प्रकल्प अपूर्ण राहिल्याचंही इथं नमूद करण्यात आलं आहे. दुपारी साडेतीन वाजता पंकजा मुंडे उपस्थितांना संबोधित करणार आहे.

" जिल्हा परिषद शाळा बोळींज येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

 " जिल्हा परिषद शाळा बोळींज येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरावसई ;- दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषद शाळा बोळींज विरार तालुका वस‌ई जिल्हा पालघर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात भारताचा तिरंगा फडकविण्याचा मान वस‌ई विरार शहर महानगरपालिका चे प्रभाग समिती ' ए ' बोळींज चे सभापती श्री. सखाराम महाडीक साहेब यांना मिळाला या प्रसंगी बोळींज चे विद्यमान नगरसेवक अजित नाईक, माजी नगरसेवक नितीन मुळे, सिमा काळे मॅडम, माजी सरपंच मन्सुर शेख, नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील व बोळींज गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या या वेळी शाळेतील विद्यार्थी नी देशभक्ती गीत व लेझिम पथके सादर केले तसेच श्री. भालचंद्र वझे लिखित व्यसनमुक्ती पथनाट्य विद्यार्थी नी सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यसन विरोधी पथनाट्य स्पधे॔त शाळेने सहभाग घेतला होता व उत्तेजनर्थ बक्षिस मिळवले होते. यावेळी नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य चे मुंबई संघटक दिशा कळंबे मॅडम यांनी व्यसनमुक्ती ची शपथ दिली तर व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी केले व भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे अशा संदेश जिल्हा परिषद शाळा बोळींज चे शाळेच्या प्रमुख शिक्षिका सौ. मृणाली पाटील यांनी केले तर सोफिया रॉंडीग्ज यांनी पाहुण्यांचे आभार व विद्यार्थी चे कौतुक केले हा कार्यक्रम शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आले होते.

Sunday, January 26, 2020

दै.मराठवाडा साथीच्या 40 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजीत बालधमाल 2020 चे थाटात उद्घाघाटन.

परळी  दि.26 दैनिक मराठवाडा साथीच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त बाल-धमाल 2020
चे आयोजन करण्यात आले आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर उदघाटन संपन्न झाले. उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक सर, तहसीलदार डॉ.विपीन पाटील सर, नगराध्यक्षा सौ.सरोजिनिताई हालगे, दैनिक मराठवाडा साथीचे संपादक चंदुलाल बियाणी,विजयप्रकाशजी तोतला, नायब तहसीलदार बी.एल.रुपणर, मंडळ अधिकारी श्री राजुरे, महादेव शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांत प्रचंड उत्साह आहे. ज्यू चार्ली आणि मिकी माऊस हेही विशेष आकर्षण ठरत आहे.

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -पालकमंत्री धनंजय मुंडे.


– *मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात दिला विश्वास*

बीड, दि. 26 ——- बीड जिल्ह्याचा कृषि, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग व क्रीडा आदि विविध क्षेत्रांत चौफेर विकास होईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असा विश्वास देत जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करु या, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील, बीडचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर आदि उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलाय. अशा शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषित केली आहे, असे स्पष्ट करून पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी 30 जानेवारीपर्यंत आपले कर्जखाते आधारसंलग्न करुन घ्यावे. या योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत व वेळापत्रकानुसार ही योजना पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सूचित केले.

पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, यापुढे भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे नागरिकांच्या मनात भारतीय संविधानातील मूलतत्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची रुजवणूक होऊन जबाबदार, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, प्रत्येक सुजाण मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्याला विकासाच्या नवीन पर्वाकडे नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने वाटचाल सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सैन्यदल भरतीचा लाभ घेऊन देशसेवेसाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. इंदु मिल येथील स्मारकामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची एकूण उंची वाढवण्याच्या निर्णयाबद्दल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा मंत्री म्हणून त्यांनी राज्य शासनाचे विशेष आभार व्यक्त केले. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, शालेय विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग यांचा उल्लेख करून प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीतवादन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परेड निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. पोलिस दल, गृहरक्षक दल, महिला पोलीस, होमगार्ड, एनसीसी, सैनिकी शाळा, स्काऊट गाईड, आरएसपी, शारीरिक शिक्षण महाविद्यालय यासह 17 प्लाटूननी संचलन करून त्यांना मानवंदना दिली. संचलनाचे नेतृत्त्व आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी केले. द्वितीय कमांडर म्हणून जी. वाय, शेख यांनी काम पाहिले. पोलीस वाहन वज्र, आरसीपी वाहन, महिला दामिनी पथक, रूग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन, सामाजिक वनीकरण विभागाचा चित्ररथ यांनी संचलनात सहभाग घेतला.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर, विद्यार्थ्यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध विभाग प्रमुख, आजी-माजी अधिकारी, पदाधिकारी, पालक, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती संगिता धसे व ए. बी. शेळके यांनी केले.

वैद्यनाथ कारखाना येथे खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण.


परळी वैजनाथ दि. २६…
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., पांगरी येथे बीडच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वैद्यनाथ कारखाना परिसरात खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संविधान उद्देशाचे वाचन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कारखान्याचे सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

काॕग्रेस किसान सेलच्या मराठवाडा सचिव पदी अॕड .डि.पी.कडबाने यांची नियुक्ती .

परळी वैजनाथ ;- दि.26  परळी येथील गेल्या अनेक वर्षा पासुन वकिली क्षेञातील नामवंत व्यक्तीमत्व म्हणून सुपरिचित असलेले मा.श्री .अॕड .डि.पी.कडबाने साहेब यांची राष्ट्रीय काॕग्रेस पक्षाने काॕग्रेस किसान सेल च्या मराठवाडा सचिव पदी नियुक्ती केली .अॕड .कडबाने साहेब हे जनसंर्पक असलेले .अनेक पतसंस्था.मल्टी स्टेट बॕक .अर्बन बॕकेच्या कायदेशीर सल्लागार म्हणून प्रसिध्द आहेत .त्याच्या या निवडी बद्दल त्याचे सर्वञ अभिनंदन होत आहे.
  काॕग्रेस पक्षाने मला दिलेली जवाबदारी मी निष्ठेने पार पाडील व भविष्यात काॕग्रेसचे विचार तळागाळा पर्यत पोहचविल व  काॕग्रेस पक्ष वाढविल .असे प्रतिक्रिया त्यांनी या वेळी दिली .

Saturday, January 25, 2020

मिलींद कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा . जनजागृती रॕलीने झाला समारोप.

परळी(प्रतिनिधी)÷
25जानेवारी,2020रोजी”राष्ट्रीय मतदार दिवस”साजरा करण्याचे प्रपत्र ,निवडणुक आयोग,भारत सरकार नवी दिल्ली यांनी जारी केल्याप्रमाणे,मिलिंद ज्यू.काॅलेज परळी येथे “राष्ट्रीय मतदार दिवस”दि.25जानेवारी2020 रोजी सकाळी 9ते 12या वेळात विविध स्पर्धाचें आयोजन करुन साजरा करण्यात आला.
सकाळी 9वाजता “मतदार जनजागृती रॅली” मिलिंद ज्यू.काॅलेजमधुन सुरु होऊन पेठ मोहला,नटराज रंग मंदिर,टाॅवर ,महिला काॅलेज मार्गे परत मिलिंद काॅलेज मध्ये विसर्जित झाली.या रॅलीला प्राचार्य के एन पवार यांनी हिरवा झेंडा दाखवुन सुरुवात करुन दिली. या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थायांनी मतदारांनी मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्या पार पाडण्याच्या विविध घोषणा दिल्या.विद्यार्थियांच्या हातात घोषणांचे व काॅलेजचे बॅनर्स होते.
रॅलीच्या विसर्जनानंतर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणुन लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
मतदार दिवसानिमित्त काॅलेजच्या मुलां-मुलींच्या रांगोळी स्पर्धा(घोषवाक्य),भाषण स्पर्धा(मी मतदान का ?करणार),निंबध स्पर्धा(मतदान करा,राष्ट्र बळकट करा)इ चें आयोजन करण्यात आले
या सर्व कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी प्राचार्य के एन पवार,प्रा सौ एस एम जगतकर ,प्रा बी डी फड,प्रा डि टी सोनोने,प्रा बेग एम आर ए,प्रा एस व्हि जाधव,प्रा एस डी डोंगरे,प्रा.सौ कर्‍हाळे मॅडम,प्रा सौ कांबळे मॅडम इ.नी परिश्रम घेतले.या सर्व कार्यक्रमाचे यशस्वी संचालन नोडल आॅफिसर प्रा विलास रोडे यांनी केले