Thursday, January 30, 2020
दिनांक 2 फेब्रुवारी ला 'माऊली सेवा मंडळ नागपूर च्या वतीने झुणका भाकर महानैवैद्य सोहळा नागपुरात .अॕड प्रशांत समर्थ
' नागपूर :दिनांक 30जानेवारी (राजेशबाबू सोनुने ) दिनांक 2 फेब्रुवारी 2020 रोजी गजानन धाम रेशीमबाग मैदान ,नागपूर येथें माऊली बहुउदेशीय सेवा मंडळाच्या वतीने भव्य गजानन भक्त मेळावा रविवारी आयोजित करण्यात येत आहे. या अध्यात्मिक मंगल सोहळ्याच्या सामूहिक सत्संग द्वारे विश्व कल्याण &सामाजिक सद्भाव टिकविण्यासाठी व पर्यावरणावर जनजागृती करण्याचं सामान्य सेवकांचा हा एक चांगला प्रयत्न आहे.विदर्भातील सर्व गजानन महाराज भक्त मिळून श्री गजानन महाराज यांच्या चरणी झुणका भाकर महानैवैद्यासह महाप्रसाद तील सर्व पदार्थ सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सेवक भक्तांच्या हातूनच सामूहिक रित्या तयार केले जातील.नागपुरात प्रथमच शेगाव नगरी अवतरणार आहे .श्री संत गजानन महाराज आपल्या कडून सेवा घडवून येतील व महाप्रसादाचा लाभ सर्व गजानन महाराज भक्तांना व भाविकांना घेता येईल. कार्यक्रम:-शनिवारी दिनांक 1फेब्रुवारी 2020 ला सेवा देणारे गजानन महाराज सेवाधारी दुपारी 3 वाजता उपस्थित राहतील व कलश पूजन,श्री अन्न पूर्णा मातेच्या पूजन व हवना नन्तर महिला सेवेकरी तर्फे झुणका भाकरी सेवेला प्रारंभ होईल.सायंकाळी 7 वाजता श्री क्षेत्र काचूरणा, जयपूर मुंडगाव येथून श्री च्या मुळंचरण पादुका चे शुभ आगमना प्रसंगी स्वागत विठु माऊली वाद्य पथकाचे वादन होईल. रविवारी 2 फेब्रुवारी 2020 ला झुणका भाकर महानैवेद्य सोहळा सकाळी पहाटे 5 वाजता काकड आरती सकाळी 5-30वाजता संत दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचे अखंड वाचन सकाळी 6 वाजता वेद शास्त्र ब्राम्हनाच्या मंत्त्रोउपोचरात श्रीचा अभिषेक सकाळी 9 वाजता कलाभिंय सादर करतील .अभंग,नृत्य आणि संत भक्ती प्रसंग तसेच 10-15 वाजता आनंदी ग्रुप तर्फे देवीचा गोंधळ ,नृत्य दुपारी 12 वाजता महाआरती व दुपारी 12-30वाजता महाप्रसाद होणार आहे पत्रकार परिषदेत माऊली बहुउदेशीय सेवा मंडळाच्या वतीने ऍड प्रशांत समर्थ ,श्रीकांत भुयारकर, प्रफुल्ल पडोळे, भावना कणेरे, संजय काळे,राहुल बोंद्रे, ऍड निलेश आंबिलवादे, लकिसिंग, इक्बाल सिंग, किशोर माकडे, प्रशांत तिजारे, सुरेश सवाई,इत्यादी पत्रकार परिषदेत सहभागी होते .
No comments:
Post a Comment