परळी वै….
संविधान बचाव कृती समितीच्या वतिने परळीत
केंद्र सरकारने पारित केलेल्या CAA, NRC, व NPR च्या संविधानद्रोही कायद्याच्या विरोधात आज चौथ्या दिवशी हि आंदोलन चालु आहे.आजाद नगर येथील मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.लहान लहान मुलीनी CAA से आजादी,NRCसे आजादी,संविधानाचा जयघोषकरत आंदोलन परिसर दणाणुन सोडला होता.
26 जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन उभारण्यात आले आहे.या आंदोलनात विविध साहजिक संघटनांनी सहभाग नोंदवला आहे.
या आंदोलनात मुस्लीम समाजातील महिला,लहान लहान मुले मुली यांची उपस्थित लक्षणीय होती.CAA, NRCच्या संबंधित कायदे जो पर्यत केंद्र सरकार माघे घेणार नाही तो पर्यत हे बेमुदत आंदोलन चालुच ठेवण्यात येणार असल्याचे संविधान बचाव कृती समितीच्या वतिने सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment