याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेचा किरकोळ कारणावरुन आपल्या पतीसोबत वाद झाला होता. त्यामुळे रागाच्या भरात माहेरी जायला निघाल्या. माहेरी जात असताना विवाहितेला एका तरुणाने रस्त्यात अडवले. यावेळी त्याने तुम्हाला गावी सोडतो म्हणून दुचाकीवर बसवले.
त्यानंतर रस्त्यातच तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे.
विशाल रविंद्र कदम (वय 22) असे या आरोपीचे नाव असून तो बीड तालुक्यातील शाहबाजपूर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या संतापजनक घटनेने बीड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी होताना दिसत आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment