परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन पुरस्कृत राज्यस्तरीय एमटीएस ऑलंपियाड परीक्षेचा निकाल(इ.१ली) नुकताच जाहीर झाला.सदरील परीक्षेत परळी वै येथील राजर्षी शाहू विद्यालयाची इ.१लीतील विद्यार्थिनी कु.निमिशा नितीन चौधरी हिने एकूण १५० पैकी १३२ गुण प्राप्त करून राज्यातून १०वा, जिल्ह्यातून ०८ वा तर केंद्रातून दुसरा क्रमांक मिळवत रजत पदकाची मानकरी ठरली.
कु.निमिशाने ऑलंपियाड परीक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल तीचे राजर्षी शाहू विद्यालयाचे संस्थापक श्री.प्रभूआप्पा बागल, मुख्याध्यापिका श्रीमती.मनीषा बागल,विद्यालयातील सर्व अध्यापिका तसेच नातेवाईक,मित्रपरिवार यांच्या वतीने कौतुक करण्यात आले.
No comments:
Post a Comment