Sunday, May 14, 2023

बीड जिल्ह्यात महिला सुरक्षा वाऱ्यावर? लग्नाचा तगादा लावत तरुणाची अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण.

वडवणी (प्रतिनिधी) : "तू मला खूप आवडतेस" असे म्हणत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन छेड काढली. यावेळी मुलीने नकार देताच पीडितेसह कुटुंबीयांना मारहाण केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. बीडच्या चिंचाळा येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडवणी तालुक्यातील चिंचाळा तांडा येथील रहिवासी असणारा तरुण सुनील दत्ता राठोड हा गावातीलच 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. यात 2 दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या घरासमोर येऊन, 'तू मला खूप आवडतेस, माझ्या सोबत लग्न कर किंवा पळून जाऊ', असे म्हणत हात धरला.
तू माझ्या सोबत नाही आलीस तर जीवे मारून टाकीन', असे म्हणत विनयभंग केला. याबाबत मुलीच्या वडिलांनी विचारणा केली असता सुनीलची आई सुमन, वडील दत्ता आणि भाऊ अनिल राठोड यांनी मुलीच्या नातेवाईकांना मारहाण केली.

दरम्यान, याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील दत्ता राठोड यांच्यावर कलम 354,354 (ड) तर सुमन दत्ता राठोड, दत्ता मुन्ना राठोड व अनिल दत्ता राठोड यांच्यावर 324, 323, 504, 506, 34 भादंवि सह कलम 12 पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment