धारूर (प्रतिनिधी)   एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका फोटो स्टुडिओत घडली असून दोघा आरोपीच्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यामध्ये पोस्को ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

धारूर शहरातील एका फोटो स्टुडिओत पासपोर्ट फोटो काढण्यासाठी अल्पवयीन गेली असता यातील आरोपीने पासपोर्ट फोटो काढून त्या दिवशी न देता फिर्यादीला दुसऱ्यादिवशी बोलावून घेऊन तिचे इच्छे विरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध केले व ही गोष्ट कोणास सांगितल्यास मी तुझ्या भावाला खल्लास करेल अशी धमकी दिली. तसेच आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादी व दोन्ही आरोपी हे एका दिवशी तिघेजण फोटो स्टुडिओ मध्ये गप्पा मारत बसले असता आरोपी क्रमांक एक हा फोटो काढण्याच्या कामासाठी बाहेर गेला. यावेळी यातील आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादी सोबत शारीरिक संबंध ठेवले व ही गोष्ट कोणालाही न सांगण्याची धमकी दिली याप्रकरणी गु.र.न.22/2022 नुसार धारूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी मधूर बालासाहेब फरतडे व सहदेव चाळक दोन्ही रा. धारुर यांच्यावर कलम 376, 504 भादवि व कलम 4,5 पोस्को अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत