अंबाजोगाई (प्रतिनिधी)अंबाजोगाई शहरातील वाहतुक समस्ये सह अन्य प्रश्नावर अप्पर जिल्हाधिकारी सौ मंजुषा मिसकर यांनी बोलवलेल्या बैठकीत उपस्थित विविध कार्यालयाच्या प्रतिनिधींना खडे बोल सूनवत आपआपली यंत्रणा सक्षम करण्या संदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या.
अंबाजोगाई शहरातील अतिक्रमणे, वाहतूक समस्या, वाढत्या चोऱ्या, न प च्या कृपेने शहरात लागणारे शहर विद्रुपीकरण करणारे डिजिटल बोर्ड या संदर्भात नागरिकांतून मोठ्या प्रमानावर ओरड होत असल्याने यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी सौ मंजुषा मिसकर यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गव्हाणे, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे शुभम तांगडे, वीज वितरण कंपनीचे संजय देशपांडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, नगर अभियंता लहाने, बी अँड सी चे शाखा अभियंता गोविंद शेळके व सहाय्यक अभियंता विनोद गुरव, अंबाजोगाई आगाराचे आगार प्रमुख नवनाथ चौरे, महसूल विभागाचे नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड, अव्वल कारकून महेश राडीकर, विलास तपसे, स्वामी मॅडम, फुले मॅडम रोटरी क्लबचे डॉ निशिकांत पाचेगावकर, स्वप्नील परदेशी, मोईन शेख, पत्रकार दत्तात्रय अंबेकर, अ र पटेल, संतोष लोमटे पो कॉ घोडके यांच्या सशेह अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बैठकी मधील विषय व चर्चेतुन समोर आलेल्या मुद्यानुसार नगर परिषद तर्फे शहरात कुठेही सी सी टि व्ही बसवलेले नाहीत शहरात जे रोटरी क्लबच्या वतीने शिवाजी चौक, सावरकर चौक, सदर बाजार चौक या ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात आले आहेत ते सर्व सुरळीत सुरू करण्यात आले आहेत. शिवाय लवकरच शहरातील गुन्हेगारी, चोऱ्या यावर प्रतिबंद बसावा या साठी पोलीस विभागा अंतर्गत शहरातील 42 ठिकाणी 132 कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव असुन या सर्व कॅमेराचे कनेक्शन शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनला जोडण्यात येनार आहे त्या साठी कंत्राट देण्यात आलेले आहे.
शहरातील वाहतूक समस्या सुरळीत करण्यासाठी नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग यांच्या मालकीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्या संदर्भात ज्या त्या विभागाने लवकरात लवकर नियोजन करण्या संदर्भात सूचना देण्यात आल्या तर आज घडीस पोलीस यंत्रणेने उपलब्ध मनुष्य बळाचा वापर करून वाहतूक समस्या कशी दूर करता येईल, सम विषम तारखे नुसार पार्किंग व्यवस्था कशी करता येईल याचे नियोजन करण्यात यावे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही जड वाहने, राखेच्या गाड्या यावर फोकस करून आठ दिवसातून एक वेळ याचे नियोजन करावे व वेळप्रसंगी दंडात्मक कार्यवाही करावी या संदर्भात सूचना देण्यात आल्या. या वेळी वाहतूक समस्ये मध्ये अडथळे निर्माण करणारे विजेचे खांब वीज वितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर काढण्या संदर्भात ही सूचना देण्यात आल्या याच मुद्याशी निगडित शहरातील डीजिटल बोर्ड यावर नगर परिषदेने आपला अंकुश ठेऊन दंडात्मक कार्यवाहीच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
अंबाजोगाई बसस्थानका मधील स्वच्छता गृह व स्वच्छते विषयी असलेल्या तक्रारी विषयी उत्तर देताना आगार प्रमुख चौरे यांनी दिड महिन्यात बसस्थानकाचे काम पूर्ण होईल व त्या नंतर सर्व सुरळीत होईल तरीही परिसर अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय योजना करता येतील असे अश्वासन दिले.
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी सौ मंजुषा मिसकर यांनी अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता.म.रा.वि.वि., पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी नगरपरिषद, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आगार प्रमुख यांना निमंत्रित केले होते मात्र या वेळी न प चे मुख्याधिकारी, आगार प्रमुख हे दोन सक्षम अधिकारी वगळता बाकी सर्वांनी आपले प्रतिनिधी पाठवले या वरूनच त्यांची शहर समस्ये विषयी असंवेदनशीलता दिसुन येते.
No comments:
Post a Comment