सिरसाळा (प्रतिनीधी) गेल्या दिड वर्षापासून आपल्या भारत देशासह जगभरात कोरोना या महामारीने थैमान घातले असून, अत्ता पर्यंत या महामारीत लाखो लोकांनी आपला जिव गमावला आहे या महामारीत सुरूवाती पासून लाॅकडाऊन परिस्थीती असल्याने बीड जिल्ह्यात मा.जिल्हा अधीकारी रविंद्र जगताप यांच्या आदेशानुसार काल गुरूवार रोजी सिरसाळा येथील ग्रामपंचायत कडून तिन कृर्षी सेवा केंद्रावर व भाजी विकेते फ्रूट विक्रेते यांना दंड देण्यात आला.
लक्षीमी ट्रेडर्स, योगेश्वरी कृषी सेवा केंद्र, बालाजी कृर्षी सेवा केंद्र ह्या तिन्ही दुकानदाराना प्रत्येकी १०,००० रू. व भाजी विक्रेते व फ्रूट विक्रेते यांना प्रत्येकी ५०० रू. दंड आकारण्यात आला. दंड वसुल करताना ग्रामसेवक शेख, कारकून विश्वंभर देशमुख, संगनक परिचालक असेफ पठाण, आदी ग्रामपंचायत चे कर्मचारी होते.
No comments:
Post a Comment