Friday, May 21, 2021

कोरोना बाधित रुग्णाने केली गळफास घेऊन आत्महात्या.

 


दीप हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णाने घेतला गळफास !

बीड –(प्रतिनीधी ) शहरातील बार्शी रोड भागात असलेल्या दीप हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे .गेल्या आठ दिवसापासून या रुग्णांवर उपचार सुरू होते .

रामलिंग सानप रा तांदल्याचीवाडी यांच्यावर दीप हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचार सुरू होते .शुक्रवारी पहाटे तीन वाजता या रुग्णाने हॉस्पिटलच्या चॅनेल गेटला स्वतःजवळील रुमालाने गळफास लावून आत्महत्या केली .

या घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता .

No comments:

Post a Comment