Thursday, May 20, 2021

धक्कादायक घटना आष्टी हादरली!मुलाने झाडल्या बापावर बंदुकीतून गोळ्या.




आष्टी - (प्रतिनीधी) चार दिवसापूर्वीच घडलेल्या हत्याकांडाने जिल्हा हादरला तोच आज आष्टी मध्ये थरारक घटना घडली स्वतःच्या जन्मदात्या बापावर मुलाने राग अनावर झाल्याने बंदुकीतून गोळ्या झाडल्या ही घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे 
याबाबत अधिक माहिती अशी की संतोष किसन लटपटे वय 50 यांना त्यांचा मुलगा किरण संतोष लटपटे याने घरगुती वादातून बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या यात संतोष लटपटे यांच्या पोटावर गोळ्या लागल्या यात ते गंभीर जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथे हलविण्यात आले आहे संतोष लटपटे यांना दारूचे व्यसन होते यामुळे त्यांच्या घरात नेहमीच वादावादी होत असे संतोष लटपटे यांनी पत्नीला मारहाण केली मुलगा किरण लटपटे याला आईला झालेली मारहाण सहन न झाल्याने रागाच्या भरात बापा वरच त्याने त्यांच्याच बंदुकीतून गोळ्या झाडल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment