Wednesday, March 31, 2021

पवनराजे अर्बन बँकेत शिवजयंती उत्साहात साजरी. छञपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणावेत - अभयकुमार ठक्कर.




परळी वैजनाथ (प्रतिनिधी)छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजाच्या हितासाठी लढले. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे जंयतीनिमित्त आज आज बुधवार दिनांक 31 मार्च रोजी पवनराजे बँकेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
आज बुधवार दिनांक 31 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कंडक्टर कॉलनी रोड वर नव्यानेच सुरू झालेल्या पवन राजे मल्टीपर्पज अर्बन बँकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. 
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा अतुल दुबे सर, ज्येष्ठ नेते सतीश जगताप आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे यथोचित स्वागत पवनराजे बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे पाटील सचिव गोविंद भरबडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
यावेळी  बोलताना श्री अभय कुमार ठक्कर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही समाजाच्या विरोधात नव्हते. त्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन विकास करण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज हे अठरापगड जातिधर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करायचे, त्यामुळे आजच्या तरुण पिढीने शिवरायांचे विचार आचरणात आणने गरजेचे असल्याचे श्री ठक्कर म्हणाले.  
कार्यक्रमास पवनराजे बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे ,सचिव गोविंद भरबडे यांच्यासह बँकेतील सर्व संचालकश्री.प्रल्हाद काळे ,श्री.रामेश्वर भोसले ,मयूर जिरगे,शत्रुघन भरबडे, गोविंद मुंडे,शेख खाजा ,सौ.वैजंतीमाला घवले,सौ.सोनाली वैराळे,ज्ञानेश्वर सातपुते तसेच कार्यालयीन कर्मचारी व खातेदार उपस्थित होते.

पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँके चा मान्यवरांच्या उपस्थितीत ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांच्या हास्ते उद्घाटन सोहळा थाटात संपन्न.


* ग्राहकांच्या सेवेस पवनराजे बँक पात्र ठरेल- ह. भ .प .केशव महाराज उखळीकर.

* पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, खा.ओमराजे दादा निंबाळकर, वाल्मीकआन्ना कराड यांनी दिल्या शुभेच्छा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहरात नव्यानेच रुजू झालेल्या पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी ली बँकेचा आज  मंगळवार दि 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध भागवताचार्य ह भ प श्री केशव महाराज उखळीकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

आज मंगळवार दिनांक 30 मार्च रोजी परळी शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ साई प्रेम आर्कड, शॉप नंबर 3 परळी वैजनाथ येथे पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेचा शुभारंभ सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा भागवताचार्य ह भ प श्री केशव महाराज उखळीकर यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा करून व फित कापून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा. वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह-भ-प श्री रामेश्वर महाराज कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रा मधुकर आघाव सर, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष संजय गवळी, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पवन राजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे सर सचिव गोविंद भरबडे ,संचालक श्री.प्रल्हाद काळे ,श्री.रामेश्वर भोसले ,मयूर जिरगे,शत्रुघन भरबडे, गोविंद मुंडे,शेख खाजा ,सौ.वैजंतीमाला घवले,सौ.सोनाली वैराळे,ज्ञानेश्वर सातपुते यांनी केले.
दरम्यान बँक उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ह भ प श्री केशव महाराज उखळीकर यांनी आशीर्वचन पर बोलताना म्हणाले की परळी शहरात नव्याने सुरू झालेली पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँक परळीकरांच्या विश्वासास पात्र ठरेल, सध्या स्पर्धेचे युग असून अशातही पवनराजे बँकेतील सर्व संचालक मंडळ कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन आपली बँक नावारूपास येण्यासाठी तसेच ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असा विश्वास ह-भ-प श्री केशव महाराज उखळीकर यांनी व्यक्त केला. 

यावेळी बोलताना अभा वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह-भ-प श्री रामेश्वर महाराज कोकाटे म्हणाले की पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँक तळागाळातील उपेक्षितांना अर्थकारणाची नवीन दिशा देईल व लवकरच परळी शहरात पवनराजे बँक मोठे नावलौकिक करेल असे सांगितले. दरम्यान आज झालेला उद्घाटन सोहळा कोरोना चे सर्व नियम व अटी पाळून करण्यात आला.

*पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, खा.निंबाळकर व वाल्मिक कराड यांच्यासह मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा,

आज मंगळवारी पवन राजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेचा शुभारंभ प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प केशव महाराज उखळीकर यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना धनंजय मुंडे उस्मानाबादचे खासदार ओमराजे दादा निंबाळकर परळी न.प. चे गटनेते वाल्मीक आन्ना कराड यांच्यासह विविध क्षेत्रातील डॉक्टर्स इंजिनिअर्स वकील पत्रकार व्यापारी नागरिक यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन पवनराजे बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

समाजप्रबोधनकार ह.भ.प. इंदोरीकर महाराजाविरोधातील खटला न्यायालयाने केला रद्द.


इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी १९ जून २०२० संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता.

या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. इंदोरीकर महाराजांचे वकील म्हणून के. डी. धुमाळ काम पहात आहेत. त्यानंतर इंदोरीकर महाराजांविरोधात फिर्याद दाखल करणा-या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भवर यांच्यातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता म्हणून काम पाहणारे अ‍ॅड. बी. जी. कोल्हे यांनी या खटल्यातून माघार घेतली होती. त्यानंतर आज न्यायालयाने निकाल देत खटला रद्द केला.

नांदेड गुरूद्वारा हिंसाचारप्रकरणी 16 अटकेत. 400 जणांविरोधात गुन्हा दाखल.


नांदेड (प्रतिनीधी) देशासह राज्यात करोना स्थिती अधिक चिंताजनक आहे. यामुळे राज्यात विविध ठिकाणी करोनाच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशातच होळीचा सणाच्या निमित्ताने नांदेडमधील गुरुद्वारा परिसरात पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे गुरुद्वारा बोर्ड पदाधिका-यासह 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाजीराबाद पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आता व्हिडीओच्या साह्याने हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.

नांदेड येथील गुरुद्वारातून दरवर्षी होळीच्या निमित्ताने मिरवणूक काढली जाते. पण यावर्षी कोविडमुळे नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळ आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. असं असताना देखील काल गुरद्वारा परिसरात मोठ्या संख्येने शीख बांधवांचा जमाव जमला होता. तसेच त्यांनी हल्ला महला मिरवणूक काढण्याचा हट्ट धरला होता.

त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखल्यानंतर गुरुद्वारा परिसरातील जमावाने पोलिसांवरच हल्ला केला. यामध्ये हल्लेखोरांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोडही केली. होळी सणाला गालबोट लावणाऱ्या या दुर्घटनेत चार पोलीस कर्मचारी जखमी आहेत. सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीना अटक करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी व्हिडीओ पाहून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे.

कांतीकारी साथी जाणुन घ्या आजचे राशी भविष्य. ३१ मार्च २०२१: कसा असेल बुधवारचा दिवस ?


  • आजचे राशी भविष्य ३१ मार्च २०२१: कसा असेल बुधवारचा दिवस?
  • जाणून घ्या कसा जाईल आपला आजचा दिवस?
  • काय आहे आपले आजचे भविष्य?

 

आजचे राशी भविष्य ३१ मार्च २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: द्विधा मनस्थिती राहील. शक्य झाल्यास महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला किंवा मोठ्यांच्या सल्ल्याने निर्णय घ्या. तब्येतीची काळजी घ्या. शुभ रंग – पिवळा.
  2.  
  3. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: महत्त्वाची जबाबादारी हाती घ्यावी लागेल. बढती, प्रगती, पगारवाढीची शक्यता आहे. मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. शुभ रंग – निळा आणि पांढरा.
  4.  
  5. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today:  जीवनाला नवी दिशा मिळेल. दिवस आनंदात घालवाल. कुटुंबाला वेळ द्याल. वाद टाळा. तब्येत सांभाळा शुभ रंग - निळा.
  6.  
  7. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: तणाव वाढण्याची आणि वादाची शक्यता असली तरी दिवस छान जाईल. चांगल्या घटना घडतील. रागावर नियंत्रण ठेवा. मार्ग शोधू शकाल. शुभ रंग - पिवळा.
  8.  
  9. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: मोठ्यांच्या सहकार्याने अनेक अशक्यप्राय आव्हान सहज पार कराल. नाती जपण्याला महत्त्व द्या. शुभ रंग - केशरी किंवा भगवा.
  10.  
  11. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यात गुंतून राहणे हिताचे आहे. मनःशांती लाभेल. तब्येत सुधारेल. शुभ रंग – निळा आणि पांढरा.
  12.  
  13. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: वरिष्ठांची साथ लाभेल. हनुमानाचे पूजन करावे. अडचणींतून मार्ग निघेल शुभ रंग - पांढरा.  
  14.  
  15. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today:  आर्थिक व्यवहार विचार करुन करा. खिसा सांभाळा. बाहेरचे खाणे टाळा आणि तब्येतीची काळजी घ्या. शुभ रंग - लाल.
  16.  
  17. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तब्येत सांभाळा. वाद टाळा. शिक्षण असो वा नोकरी आपण यशस्वी व्हाल. शुभ रंग - पिवळा.
  18.  
  19. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: चुका टाळा. नियम आणि कायदे पाळा. इतरांच्या चुका दाखवण्यापेक्षा स्वतःच्या चुका टाळण्यावर भर द्या. शुभ रंग - हिरवा.
  20.  
  21. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today:  आर्थिक प्रश्न सुटेल. अडचणींतून मार्ग निघेल. थोरांचे सहकार्य घेऊन काम करा. शुभ रंग - पांढरा.
  22.  
  23. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: वेळेचे नियोजन करा. दिवस चांगला आहे. नोकरी अथवा व्यवसाय करणआऱ्यांना लाभ होईल. शुभ रंग – केशरी किंवा भगवा.

Tuesday, March 30, 2021

रामगडाचे मठाधीपती महंत लक्ष्मण महाराज यांचे निर्वाण ! रामगडावर शोककळा !


लक्ष्मण महाराज निवर्तले ! रामगडावर शोककळा !

बीड – तालुक्यातील च नव्हे तर जिल्ह्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बीड जवळील रामगड संस्थानचे प्रमुख लक्ष्मण महाराज यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले .यामुळे भाविक भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .

गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मण महाराज हे आजारी होते,या गडाच्या उभारणीत आणि गडाच्या विकासात त्यांचं खूप मोठं योगदान होतं .प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या गडावरील महाराजांचे अकाली निधन झाल्याने गड पोरका झाला आहे .

बीड तालुक्यातील श्री क्षेत्र रामगड येथील मठाधिपती ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांच्या निधनाने रामगड पोरका झाला असून, वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शोकभावना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण व थोरला गड म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र रामगडाचे महंत लक्ष्मण महाराज यांचे आज (दि. ३०) खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान देहावसान झाले.

आज संत तुकाराम महाराजांची बीज, आजच्या दिवशी लक्ष्मण महाराजांचे देहावसान होणे हा योगायोग स्मरणात राहील. महाराजांच्या जाण्याचे वृत्त दुःखद असून त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी ह.भ.प. लक्ष्मण महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

वाळु माफियाकडुन लाच घेणारे लाचखोर उपजिल्हाधिकारी गायकवाड निलंबित !

 

माजलगाव- (प्रतिनीधी)   वाळू माफियांकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड याच्यावर शासनाने महिन्यानंतर निलंबनाची कारवाई केली आहे .

माजलगाव येथे उपजिल्हाधिकारी असणाऱ्या श्रीकांत गायकवाड याने वाळू ची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तब्बल एक लाख रुपये लाच स्वीकारली होती .या कारवाईने मोठी खळबळ उडाली होती .

गायकवाड याला अटक होण्याच्या एक दिवस अगोदरच त्याचा मित्र बीडचा बीडीओ मिसाळ यालादेखील लाच घेताना रंगेहाथ पडकले होते .दरम्यान त्यांच्या अटकेनंतर शासनाने महिनाभराच्या कालावधी नंतर गायकवाड याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे .

राष्ट्रीयकृत बँका.खाजगी बॕका मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना अँटिजेंन बंधनकारक !

   

बीड - (प्रतिनीधी ) जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने व्यापाऱ्यानंतर आता सर्व राष्ट्रीयकृत बँक,खाजगी बँक मधील अधिकारी आणि कर्मचारी यांना अँटिजेंन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक केली आहे .

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की,गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील सरकारी बँका, खाजगी बँका मध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे .त्यामुळे 2 एप्रिलपर्यंत सर्व बँक अधिकारी कर्मचारी यांनी अँटिजेंन टेस्ट किंवा आरटीपीसीआर करून घ्यावी .

जे लोक या टेस्ट न करता बँकेत काम करताना आढळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे 

Monday, March 29, 2021

पुण्यात 16 वर्षीय मुलीवर गँगरेप; पिडीतेवर गोळीबार केल्याने प्रकार उघडकीस, 5 जणांवर गुन्हा दाखल.


पुणे : पुण्यातील सहकारनगर भागातील एका अल्पवयीन मुलीवर सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किळसवाणा प्रकार म्हणजे या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला आणखी दोघेजण येणार असल्याचे सांगत थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तीने विरोध करत निघून जात असताना तिच्यावर गोळी झाडण्यात आली आहे. गोळीबाराने हा सामूहिक बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने पोलीस दलासह शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी 16 वर्षीय मुलीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 5 जणांवर अपहरण, बलात्कार तसेच इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गेल्या आठवड्यात वारजेत घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जनता वसाहत परिसरात राहते. दरम्यान, गेल्या आठवड्यात तिच्या एका मैत्रिणीने तिला आपल्याला मित्राच्या वाढदिवसाला जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार या दोघी वारजेत वाढदिवसाला गेल्या. त्याठिकाणी वाढदिवस साजरा झाल्यानंतर त्या मुलीला एका खोलीत नेण्यात आले. तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर मुलगी घरी जाण्यास निघाली. पण, आरोपींनी तिला घरी जाऊ नकोस, आणखी दोघे येणार आहेत, असे सांगितले. तिने या आरोपींना नकार दिला आणि घरी जाण्यास निघाली. यावेळी तिने मोबाईल छातीजवळ ठेवला. तसेच निघाली. यावेळी आरोपींने पोट माळ्यावर ठेवलेले बंदूक काढली व तिच्यावर गोळी झाडली. गोळी तिच्या छातीत लागली. पण तिथे मोबाईल असल्याने तिला जास्त जखम झाली नाही. यानंतर आरोपी घाबरले. त्यांनी त्या दुसऱ्या मैत्रिणीला या मुलीला घेऊन जाण्यास सांगितले. तिला रुग्णालयात देखील नेले नाही. त्या दोघींना कात्रज परिसरात सोडण्यात आले. त्या तरुणीने तिच्यावर याठिकाणी उपचार केले. यानंतर त्या घरी आल्या.

अशी झाली घटना उघड
गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक गस्त घालत असताना त्यांना आरोपींकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना पकडले. त्यांना हे पिस्तुल कोठून आणले आणि कुठे याचा वापर केला याची माहिती मिळवण्यासाठी पोलीसी खाक्या दाखवला. यावेळी या सामूहिक बलात्कार व गोळीबाराचा भांडाफोड झाला. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलीचा शोध घेत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर घडलेल्या गोळीबाराने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेने हे आरोपी ताब्यात घेतले आहेत.

मोबाईल ने वाचवला जीव…
अल्पवयीन मुलगी आरोपींच्या तावडीतून घरी जाण्यास निघाली. त्यावेळी तिने मोबाईल छातीजवळ ठेवला होता. आरोपीने रागात तिच्या छातीवर गोळी झाडली. पण ती मोबाईलला लागली आणि त्यानंतर तिच्या छातीत लागली. यामुळे तिला जास्त गंभीर जखम झाली नाही. आणि तिच्यावर रुग्णालयात न जाता उपचार झाले. फक्त मोबाईलमूळे या अल्पवयीन मुलीचा जीव वाचला

 असल्याचे सांगण्यात आले आहे.

विडा येथील ८० वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडीत. जावयाची गाढवावरुन निघणारी मिरवणूक यंदा रद्द.


* जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे यंदा जावयाची गाढवावरुन मिरवणूक निघणार नाही.
बीड :  कोरोनामुळे ८० वर्षांची परंपरा खंडीत, जावयाची गाढवावरुन निघणारी मिरवणूक यंदा रद्द
फाईल फोटो

विडा गावातली ही परंपरा पारतंत्र काळापासून सुरु आहे. तत्कालीन ठाकूर आनंद देशमुख यांचे जावयाला गावकऱ्यांथी थट्टा मस्करीत गाढवावर बसवलं होतं, यानंतर सुरु झालेली ही परंपरा आजतागायत सुरु होती. परंतू कोरोनाच्या प्रादुर्भावाने ही परंपरा खंडीत झाली आहे. गाठवावर बसून जावयाची मिरवणूक काढताना पाहण्यासाठी या गावात मराठवाड्यातील अनेक लोकं यायचे. महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा गाढवावर बसून मिरवणुकीचा मान मिळालेल्या जावयाला पुन्हा हा मान मिळत नाही. जावई कोणत्याही जाती-धर्माचा असो त्याबाबतीत गावकरी भेदभाव करत नाहीत.

प्रत्येक वर्षी जावयाचा शोध घेण्यासाठी दहा जणांची टीम तयार केली जाते. धुळवडीच्या दोन-तीन दिवस आधी गाढवावर कोण बसणार हे ठरवलं जातं. अनेकदा गावकऱ्यांना जावई मिळतही नाही अशावेळी लोकवर्गणीमधून गाडी करुन शेजारच्या गावात जावयाचा शोध घेतला जातो. आतापर्यंत अहमदनगर, माजलगाव, आंबाजोगाई, दिंद्रुड, सिरसाळा अशा ठिकाणांवरुन जावई शोधून आणत त्यांना गाठवावर बसवून मिरवणूकीचा मान देण्यात आल्याचं सरपंच सुरज पटाईत यांनी सांगितलं.

धुळवडीच्या दिवशी जावयाला गाढवावर बसवून गाढवाच्या गळ्यात चप्पल बुटांचा हार घालून त्यावरून जावयाला गावभर मिरवले जाते. गाढवाची मिरवणूक गावातील मंदिराच्या पारावर येऊन थांबवल्यानंतर तेथे जावयाला मनपसंत कपड्यांचा आहेर आणि सासऱ्याकडून सोन्याची अंगठी दिली जाते. जर एखादा सासरा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल तर काही वाटा ग्रामपंचायत लोकसहभागातून उचलते. चप्पलांचा हार आणि गाढव मिरवणूक असल्याने कधी कधी जावयाचा विरोधही होतो अश्या वेळी गावकरी संयम बाळगून लगेच दुसरा जावई शोधतात. मात्र यावर्षी कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे विडा गावातील सर्वच सार्वजनिक कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे त्यामुळे धुळवडीच्या दिवशी होणारा हा कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आला आहे. ही ८० वर्षांतील पहिलीच वेळ आहे. यामुळे यावर्षी हौशी जावायाला आहेर आणि सोन्याच्या अंगठीला मुकावे लागणार आहे.

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य. २९ मार्च २०२१: कसा असेल तुमच्यासाठी धुलीवंदनाचा दिवस.


  • आज धुलीवंदनाचा दिवस, कृष्णपक्ष प्रतिपदा
  • जाणून घ्या कसा जाईल आपला आजचा दिवस?
  • काय आहे आपले आजचे भविष्य.

 आजचे राशी भविष्य २९ मार्च २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन आणि व्यावहारिक विचार करुन निर्णय घेणे हिताचे राहील. तब्येतीचे रागरंग ओळखून निर्णय घ्या. शुभ रंग - लाल. शुभ अंक - ९.
  2.  
  3. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: हट्ट टाळा. शांतपणे विचार करुन निर्णय घ्या. भावनेच्या आहारी वाहून जाणार नाही याची काळजी घ्या. तब्येत सांभाळा. शुभ रंग - निळा. शुभ अंक - ६.
  4.  
  5. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस. थेटपणे आणि मोकळेपणाने बोला. संवाद साधणे हिताचे राहील. गोड बोलून काम साधू शकाल. शुभ रंग - मोरपिशी. शुभ अंक - ५.
  6.  
  7. कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: संयम पाळणे हिताचे राहील. अती घाई संकटाकडे नेई हे लक्षात ठेवा. महत्त्वाचे निर्णय जाणकारांच्या सल्ल्याने घेणे हिताचे राहील. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवणे हिताचे आहे. शुभ रंग - चंदेरी. शुभ अंक - २.
  8.  
  9. सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: कोणालाही वचन देणे, कर्जाला तारण राहणे, लेखी करार करणे आजच्या दिवशी टाळणे हिताचे राहील. दिवस आनंदात जाईल. स्वतःची काळजी घ्या. शुभ रंग - जांभळा. शुभ अंक - १.
  10.  
  11. कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: तब्येतीची काळजी घ्या. कुपथ्य होणार नाही याचे भान बाळगा. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हा विचार अंमलात आणण्याचा हा दिवस आहे हे लक्षात ठेवा. शुभ रंग - पोपटी.  शुभ अंक - ५.
  12.  
  13. तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. भावनिक होऊन निर्णय घेणे टाळा. खरेदी-विक्रीचे व्यवहार आजच्या दिवशी टाळा. शुभ रंग - आकाशी आणि पांढरा.  शुभ अंक - ६.
  14.  
  15. वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: विश्रांतीचा आणि स्वतःला वेळ देण्याचा दिवस आहे हे लक्षात ठेवा. आपल्या छंदासाठी, आवडीनिवडीसाठी वेळ काढणे हिताचे आहे. शुभ रंग - गुलाबी. शुभ अंक - ९.
  16.  
  17. धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. कालाय तस्मै नमः हा मंत्र लक्षात ठेवून वागा. व्यावहारिक राहून वागणे हिताचे आहे. शुभ रंग - सोनेरी. शुभ अंक - ३.
  18.  
  19. मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: धार्मिक, अध्यात्मिक कार्यासाठी दिवस चांगला आहे. शुभ कार्य करण्यासाठी उत्तम दिवस. थोरांचे आशीर्वाद लाभतील. ज्येष्ठांचा आदर करा आणि त्यांचा सल्ला ऐकून घेऊन नंतर सारासार विचाराने निर्णय घेण्याची सवय लावून घेणे हिताचे आहे. शुभ रंग - काळा. शुभ अंक - ८.
  20.  
  21. कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे या विचाराने काम करा. प्रयत्न करणे आपल्या हाती असल्यामुळे प्रामाणिक प्रयत्न करा. मन उत्साही राहील. आनंदात राहाल. शुभ रंग - निळा. शुभ अंक - ८.
  22.  
  23. मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: स्वतःवर विश्वास ठेवून विचारपूर्वक निर्णय घेणे हिताचे आहे. कोण काय बोलेल यापेक्षा आपल्या हिताला प्राधान्य देणे फायद्याचे ठरेल. गोड बोलून स्वार्थ साधू पाहणाऱ्या लोकांपासून दूर राहणे हिताचे आहे. तब्येतीची काळजी घ्या. शुभ रंग - सोनेरी. शुभ अंक - ३.

Sunday, March 28, 2021

विनाकारण घराबाहेर पडाल तर होईल धुलाई. सडकफिऱ्यांना पोलीस प्रशासनाने दिला काठीचा प्रसाद.


बीड  (प्रतिनीधी):- बीड जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठीच जिल्हा प्रशासनाने बीड जिल्ह्यात१० दिवसांचे लॉकडाऊन केलेले आहे. मात्र बीड शहरात काही तरुण कारण नसताना घराबाहेर पडत असून दुचाकीवर सर्वत्र फिरत आहेत. बीड शहरात विनाकारण फिरण्यार्‍या हौशी तरुणांना, पोलिस प्रशासनाकडुन चांगलाच चोप देण्यात आला.

काही कारण नसतांना विनाकारण बाहेर पडणं या तरुणांना चांगलंच महागात पडलंय. शहरातील खासबाग, बशीरगंज ,शिवाजी महाराज चौक यासह अनेक भागात हौशी तरुण मंडळी विनाकारण दुचाकीवर बाहेर फिरत होती.याच विनाकारण फिरणाऱ्यांना काठीचा काठीचा प्रसाद मिळालाय.

यामुळे काही वेळातच शहरातील विनाकारण फिरणारी मंडळी कमी झाली होती.दरम्यान संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिस अधीक्षक आर.राजास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली , बीड शहरासह जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

१० दिवसाचे लॉकडॉऊन मध्ये सामान्य लोकांना स्वस्थ-धान्य राशनाची होणारी समस्याला शासनाने गंभीरीने दखल घ्यावी :- राशन Activist.


परळी वैजनाथ (प्रतिनिधि) :- बीड जिल्ह्यात १० दिवसाचे लॉकडॉऊन  शासनाकडून जाहीर  करण्यात आले. या लॉकडॉऊन मध्ये सामान्य लोकांना भरपूर त्रास सहेन करावा लागायला आहे .
 त्यात स्वस्त धान्य राशनची एक मोठी समस्या समोर येत आहे काही दुकाने उघडत नाही काही उघडते पण आपल्या वेळेप्रमाणे चालत नाही  सामान्य लोकांच्या बोलणा आहे की लॉकडॉऊन मध्ये राशन दुकानदाराला एक मोकळा मार्ग मिळत आहे आणि त्याला भरपूर सूट मिळते.
2020 मध्ये लागलेल्या लॉकडॉऊनात लोकांना खालील प्रमाणे त्रास सहन करावा लागला होता. 
१) पावती नाही मिळत होती
२) त्यावेळी जे शासनाने आदेश काढले होते की एक माणसाला पाच किलो तांदूळ ते प्रमाणे नाही मिळत होता
३) राशन दुकानदार राशन धारकांना बरोबर बोलत नव्हते
४) ऑनलाईन प्रमाणे राशन  धारकांना माल मिळत नव्हता
आम्ही एस-आय-ओ चे सय्यद उमेर व शेख मुदस्सिर (राशन अक्टिविस्टस परळी) शासनाकडून मागणी करतो की शासनानी परळी तालुक्या साठी या १० दिवसाचा लॉकडॉऊन मध्ये सामान्य लोकांना राशनाची समस्या जे २०२०चा लॉकडॉऊन मध्ये झाली होती ते आता होऊ नये यासाठी शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी.

निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा- तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश.



------
*वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सुविधा झपाट्याने कमी पडत असल्याबद्दल  चिंता.
------
*टास्क फोर्सने व्यक्त केली मृत्यू वाढण्याची भीती. 
-----
*मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश.

मुंबई दि २८ : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या. 

*बेड्स, व्हेंटीलेटर कमी पडताहेत- मृत्यूंची संख्या वाढू शकते*

या बैठकीच्या प्रारंभी आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर, व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत अशी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आणले. 
ते म्हणाले की, सध्या ३ लाख ५७ हजार आयसोलेशन खाटापैकी १ लाख ७ हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. ६० हजार ३४९ ऑक्सिजन खाटापैकी १२ हजार ७०१ खाटा , १९ हजार ९३० खाटापैकी ८ हजार ३४२ खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. ९ हजार ३० व्हेंटीलेटर्सपैकी १ हजार ८८१ वर रुग्णांना  ठेवण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच होत नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता  कमी पडते आहे.


*वेळीच चाचणी न केल्याचे गंभीर परिणाम दिसताहेत* 

गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी ३ लाख सक्रीय रुग्ण  होते आणि ३१ हजार ३५१ मृत्यू झाले होते मात्र आता काल २७ मार्च रोजी ३ लाख ३ हजार ४७५ सक्रीय रुग्ण असून मृत्यूंची संख्या  ५४ हजार ७३ झाल्याने चिंता वाढली आहे. विशेषत: संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्य वाढू शकतात आणि यामागे वेळेवर चाचणी न करून रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणे  तसेच होम आयसोलेशनमध्ये असतानाही नियमांचे पालन न करणे ही कारणे असू शकतात असेही टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी निदर्शनास आणले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका दिवशी २४ हजार ६१९ रुग्ण आढळले होते. काल २७ मार्च रोजी एका दिवशी ३५ हजार ७२६ रुग्ण आढळले असून ही संख्या येत्या २४ तासांत ४० हजार झालेली असेल अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली. 

*लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे- मुख्यमंत्री* 

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला  आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले. 

*ऑक्सिजन पुरवठा, खाटांचे प्रमाण त्वरेने वाढवा*  

गेल्या वर्षी आपण टप्प्याटप्प्याने सर्व आरोग्य सुविधा वाढवल्या, फिल्ड रुग्णालये उभारली पण आताच्या या संसर्गात या सुविधा कमी पडतील की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील तसेच ऑक्सिजन उत्पादन ८० टक्के वैद्यकीय व २० टक्के इतर कारणांसाठी राखीव ठेवावे, रुग्णालयांतील खाटांच्या बाबतीत ८०:२० प्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही व रुग्णांची गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 
ई आयसीयूचा मोठ्या प्रमाणावर सुलभतेने वापर होऊ शकतो त्यामुळे त्यादृष्टीने देखील आरोग्य विभागाने त्वरित पाउले उचलावीत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

*केवळ मुंबई, पुणे नाही तर उर्वरित ठिकाणीही सुविधा हवी*

लोकांना कोरोनापेक्षा देखील आपली चाचणी पॉझिटिव्ह आली तर कुठल्याही विलगीकरण केंद्रात नेऊन टाकले जाईल व आपल्याला तिथे सुविधा मिळणार नाही अशी भीती आहे, ती त्वरित काढणे गरजेचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहरातील किंवा परिसरातील सुविधा मिळावी अशी व्यवस्था करा, तसेच केवळ मुंबई-पुणे यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात विलगीकरण सुविधा तसेच आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

*ई आयसीयू वर भर - आरोग्यमंत्री*

यावेळी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्काचा शोधअधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली.  विशेषत: छोट्या श्रांत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान असून ई आयसीयू वर भर देण्यासाठी पाउले उचलण्यात येतील असे सांगितले. महाराष्ट्रातील लसीकरण देशात चांगले असून ग्रामीण भागात उपलब्ध शीत साखळी वापरून उपकेंद्रांवर लसीकरण वाढवले तर अधिक वेग मिळेल असे सांगितले. 
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिरा रुग्णालयांत पोहचत आहेत ही चिंतेची बाब आहे. अगदी  १० ते १८ वयोगटात देखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असून पुढील काळात तरुणांमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
 
*अर्थचक्र प्रभावित होणार नाही- मुख्य सचिव*

यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले की महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे तसेच गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाणही चांगले झाले असल्याचे  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले असून ज्याठिकाणी संसर्ग वाढ जास्त आहे तिथे लसीकरणाचा वेग वाढवण्याची सुचना त्यांनी केल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास कोणताही गोंधळ उडू नये व समन्वय राहावा म्हणून योग्य त्या सुचना प्रशासनास देण्यात येत आहेत तसेच अर्थचक्रही प्रभावित होणार नाही त्याचे संतुलन ठेवण्यात येईल.

*बैठकीतील निर्णय*

• मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती ( एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल. 
• ऑक्सिजनची महत्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा 
• गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणकरण्यावर भर द्यावा 
• मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू , व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे 
• प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी 
• विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत 
• सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे  
०००

महाराष्ट्रात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही ! आरोग्य मंञी राजेश टोपे यांचा इशारा.

मुंबई:  महाराष्ट्रात कोरोना वेगाने वाढतो आहे. या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे. लोकांनी कोरोना विषयक नियम पाळले नाही, तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असे मोठे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 


* आपण लॉकडाऊनच्या दिशेने जात आहोत : 

राज्यात दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत राहणे म्हणजे आपण लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे, असे टोपे यांनी सांगितले आहे. कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.

* आढावा बैठका सुरु राहणार. : राज्यात मागील काही दिवसांपासून 30 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण दररोज वाढत आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात दुपारी 12.30 वाजल्यापासून ते 1.30 पर्यंत बैठक पार पडली. दररोज १०  टक्के प्रति दिवस रूग्णसंख्येत वाढ होतेय. दोन -तीन दिवस आणखी आढावा घेतला जाणार आहे.

शरद पवार आणी अमित शाह यांची गुप्त बैठक ? सब चीजे सार्वजनिक नहीं होती, पवारांशी गुप्त भेटीच्या चर्चांवर अमित शाहांचं सूचक वक्तव्य.


* शरद पवार आणि प्रफुल पटेल यांनी अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे.  

VIDEO | सब चीजे सार्वजनिक नहीं होती, पवारांशी गुप्त भेटीच्या चर्चांवर अमित शाहांचं सूचक वक्तव्य
अमित शाहांनी शरद पवारांशी भेट घेतल्याचं वृत्त

नवी दिल्ली : सब चीजे सार्वजनिक नही होती, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल  यांच्याशी झालेल्या गुप्त बैठकीवर सूचक उत्तर दिलं. राजधानी दिल्लीत पत्रकारांनी पवारांसोबत भेटीबाबत छेडलं असता अमित शाहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत, असं सांगून प्रश्न उडवून लावला.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीत अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. शरद पवार आणि प्रफुल पटेल यांनी अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे.

* अमित शाहांची पवार-पटेलांशी गुप्त भेट?

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

* राष्ट्रवादीने वृत्त फेटाळलं.

अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ही अफवा असल्याचं सांगत भेटीचं वृत्त नाकारलं आहे. शरद पवार यांनी भाजप नेत्यांची भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपने गुजराती वर्तमानपत्रातून अशा बातम्या पेरल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला.

संगमच्या सरपंच वच्छालाबाई कोकाटे यांच्या पुढाकाराने गाव स्वच्छ करून होळी केली साजरी.

परळी वैजनाथ -- परळी तालुक्यातील मौजे  संगम येथे होळी चा सण अनोख्या पद्धतीने सरपंच वच्छालाबाई कोकाटे व लाॅर्ड बुध्दा मिञ मंडळाच्या टिमने  आज गावचा केरकचरा जाळुन होळी साजरी केली गाव स्वच्छ करून कॅरिबॅग,कचरा गोळा करून होळी सकाळी  साजरी केली* परळी वार्ताहर परळी जवळील संगम येथे स्वच्छता मोहीम होळी निमित्त गावातील ऊकंड्यावरच्या कॅरिबॅग,कचरा,ईतर सर्व कचरा जाळुन होळी साजरी कोकाटे महाराज यांची कल्पना यशस्वी कोकाटे महाराज म्हणाले कि गावातील जर प्रत्येक जनांनी जर स्वच्छता केलीतर गाव निरोगी व सुंदर राहिल व कोरोना सारखे आजार येनारया नाहीत डासांचे प्रमाण कमी झाल्याने गाव निरोगी राहील आसे कोकाटे महाराज  होळी निमित्त बोलतांना म्हणाले   , सरपंच वच्छालाबाई कोकाटे व कोकाटे महाराज यांनी व लाॅर्ड बुध्दा मिञ मंडळ  सर्व सहकारी यांनी होळी मध्ये गावातील मेनकापडे कॅरीबाॅग व गावातील घान सर्व जाळुन टाकली संगम येथे  कोरोना जाळुन टाकला गावातील महिलांनी पुढाकार घेतला हातात झाडू टोपले खोरे सर्व गाव स्वच्छ करण्यात आले गावात स्वच्छतेची होळी साजरी करण्यात आली सकाळी उठून गाव स्वच्छ माझे घर स्वच्छ माझे अंगण स्वच्छ माझा परिसर स्वच्छ आसे रामेश्वर महाराज कोकाटे म्हणाले या वेळी पोलिस पाटील पांडुरंग रोडे,प्रभाकर गिराम,  विकास रोडे, देविदास रोडे, वसंत गायकवाड, भारत गायकवाड, विलास गायकवाड, सतीष रोडे, बळी रोडे,दिपक गायकवाड,  प्रल्हाद गायकवाड,साहेबराव भुतांगळे,सुन गिराम   बाबा रोडे,आविनाश गायकवाड,भिमा गायकवाड,  विनोद रोडे,रूपेश रोडे,सुरज रोडे,पंकज रोडे,महादेव रोडे,दादासाहेब भुतांगळे,सचिन रोडे,प्रविण रोडे,बबलू रोडे,किशोर गायकवाड, पार्वती रोडे, सुबाबाई रोडे,अज्ञान रोडे,वंदना रोडे,आलका रोडे,उषा रोडे,शिवनंदा गायकवाड, सुलोचना गायकवाड ,मुक्ताबाई गायकवाड, मंगल भुतांगळे,माय गायकवाड,  यांच्या सह अनेक महिला पुरूष तरून बांधवांनी स्वच्छता मोहीम होळी या निमित्ताने कोकाटे महाराज यांची ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले

Saturday, March 27, 2021

कोरोनाचा विस्फोट ! राज्यात तब्बल 35,726 नवीन रुग्ण सापडले, 166 जणांचा मृत्यू.


* राज्यातील कोरोना संक्रमितांचं प्रमाण कमी होत नाहीये. राज्यात आज 35,726 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 26,73,461 झालीय.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सरकारकडूनही अनेक निर्बंध लादले जात आहेत. आता राज्यात जमावबंदी लागू केले आहेत. तरीही राज्यातील कोरोना संक्रमितांचं प्रमाण कमी होत नाहीये. राज्यात आज 35,726 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 26,73,461 झालीय.

* राज्यात आतापर्यंत एकूण 23,14,579 कोरोना बाधित रुग्ण बरे.

राज्यात आज 14,523 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, राज्यात आतापर्यंत एकूण 23,14,579 कोरोना बाधित रुग्ण बरे झालेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.58 % एवढे झालेय. आज राज्यात 35,726 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 166 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.

सध्या राज्यातील मृत्युदर 2.02% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,91,92,750 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 26,73,461 (13.93 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 14,88,701 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 15,644 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात 35,7326 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 26,73,461 झाली आहे. राज्यात आज एकूण 3,03,475 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

* राज्यात आजपासून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी.

राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्याबाबतची नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीत चौपाट्या, उद्योने, मॉल, सिनेमागृह यांसाठीही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारने आजपासून रात्री 8 ते पहाटे 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. हा निर्णय 15 एप्रिल 2021 पर्यंत लागू असेल.

1) सार्वजनिक उद्यानं, समुद्र किनारे रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहील. या नियमाचं कुणी उल्लघंण केलं तर एक हजाराचा दंड बसेल.

2) नव्या नियमावलीनुसार सिनेमा हॉल, सभागृह, रेस्टॉरंट रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. पण त्यांची होम डिलिव्हरी सुरु राहील.

3) सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे.

4) लग्नासाठी फक्त 50 लोकांना तर अंतिम संस्कारासाठी फक्त 20 लोकांना परवानगी देण्यात आली आहे.

5) अत्यावश्यक सेवेतील कार्यालये वगळता इतर खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थिती ठेवण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.

6) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था काही निर्बंधासह सुरु राहील, असंही नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे,

7) धार्मिक स्थळ आणि त्यांच्या ट्रस्टींनी कमीत कमी भाविकांना मंदिरात दर्शन कसे देता येईल यावर लक्ष केंद्रीत करणे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच शक्यतो ऑनलाईन दर्शनाची सुविधा देण्यात यावी. तसेच मंदिरात येणाऱ्यांनी कोरोना नियमांची त्रिसूत्री पाळली की नाही ते पाहूनच त्यांना मंदिरात प्रवेश देणे, अशी सूचना देण्यात आली आहे.

Friday, March 26, 2021

उखर्डा गावच्या नालेसफाईला मिळेना मुहूर्त.सरपंचांना दिले निवेदन व आंदोलनाचा इशारा .

वरोरा:– तालुक्यातील उखर्डा  येथे पावसाळा गेला हिवाळा गेला आता उन्हाळा सुरू झाला तरी सुद्धा गावातली नाले सफाई झालेली नाही . गेल्या काही काळात ग्राम पंचायत ने नाले सफाई कडे दुर्लक्ष केले आहे त्या मुळे नाले तुंबलेल्या अवस्थेत आहे .
सर्वच गावं– शहरामध्ये पावसाळा च्या आधी नाले सफाई केली जाते . माञ उखर्डा ग्राम पंचायत ला अद्याप तसा मुहूर्त गवसला नाही  , गावातली नाल्याची घाणेरडी दलदल माजली आहे , नाल्याच्यी दुर्गंधी पसरली आहे  नागरिकांना या सगळ्यांचा सामना करावा लागतो आहे , साफ सफाई कडे पूर्णतः दुलक्ष करण्यात आली आहे .  गावातली नाल्यांची साफ सफाई करावी असे निवेदन अभिजित कुडे यांनी सरपंच रुपालीताई ठाकरे व सचिव पंकज थूल याना दीले . जर १० दिवसात नाल्यांची साफ सफाई झाली नाही तर आंदोलनं करण्याचा इशारा अभिजित कुडे यांनी दिला . या वेळी प्रमोद कुडे , गुरू कुडे ,ऋषीकेश कुडे, रोशन भोयर, विनोद कोठारे, विजय कुडे, रंजीत कुडे व गावकरी उपस्थित होते .

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य. २६ मार्च २०२१: पाहा मार्च महिन्यातील शेवटचा शुक्रवार १२ राशींसाठी कसा असणार.


 आजचे राशी भविष्य २६ मार्च २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (Daily Horoscope 26 March 2021 rashifal in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आजचा दिवस साहित्य, लेखनासाठी उत्कृष्ट आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर होईल. पोट दुखण्याची शक्यता आहे. स्वभावात आणि कामात चांगली प्रगती होईल. मनात शंका आणि भीतीचं वातावरण असेल. मानसिक संतुलनात प्रकृती चांगली ठेवावी लागेल. शुभ रंग - लाल.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: कोणत्याही कामात यश मिळण्यासाठी दिवस उत्तम आहे, कामात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. चांगल्या विचारांनी तुम्हांला स्फूर्ती मिळेल. खर्च वाढेल आणि आजारी असलेल्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा होईल. शुभ वार्ता मिळेल. शुभ रंग - पिवळा.
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: तुमचा वेळ मनोरंजन आणि इतरांच्या भेटीगाठीसाठी जाईल. धन प्राप्ती होईल. व्यापारातील वेगमर्यादा वाढतील. जीवनशैलीत मान-सन्मान आणि कार्यात मोठे यश मिळेल. शुभ रंग - केशरी.
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: कोणतंही शुभकार्य करण्याआधी चांगले नियोजन करावे लागेल. तुम्ही खूप चिंतीत राहाल. कोणताही निर्णय घेण्याआधी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या, जेणेकरून तुम्हांला कोणत्याही प्रकाराचा अडथळा येणार नाही. तसंच खर्च वाढण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पांढरा.
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: तणावामुळे थकल्यासारखे जाणवेल. कुठल्याही कार्यात मन लागणार नाही. सहकाऱ्यांकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळतील. कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करावा लागेल, ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. शुभ रंग - हिरवा.
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस तुमच्या कामासाठी लाभदायक असेल. आरोग्य चांगले राहिल. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस शुभ असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल आणि सरकारी कामांमध्ये यश मिळेल. शुभ रंग - पिवळा.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: मित्रपरिवारांसोबत आपला दिवस चांगला जाईल. दाम्पत्यांमध्ये आनंद प्राप्त होईल. आपली पत्नी आणि मुलांना वेळ द्या. जवळच्या प्रेमळ व्यक्तिशी भेट होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - लाल.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: न्यायालयीन कामांसाठी अनुकूल वातावरण असेल. मनात शंका आणि अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे शारीरिक अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. व्यवहारात संयम ठेवा. तुम्ही खूप उत्साहित असाल. खर्च वाढतील आणि गैरसमज होण्यापासून सावध रहा. शुभ रंग - हिरवा.
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आपल्या मित्रपरिवारांसोबत दिवस खूप चांगला जाईल. त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया तुमच्यासाठी आनंददायक ठरतील. धन लाभ होईल. दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल आणि शुभवार्ता मिळेल. शुभ रंग - पांढरा.
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: सुरूवातीला कामात काही अडचणी येतील. पैशांच्या नियमित व्यवहारामुळे चिंता करण्याची गरज नाही. नोकरीत सहकाऱ्यांची चांगली साथ मिळू शकते. मित्रांना भेटून खूप प्रसन्नता वाटेल. कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल. शुभ रंग -  लाल.
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: चिंता करणं थोडं कमी करा. तुम्ही खूप भावूक व्हाल. साहित्य, लेखन आणि कलाक्षेत्रांमध्ये तुमचे कार्य लाभदायक ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून चांगली साथ मिळेल. दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष्य ठेवणं गरजेचं आहे. शुभ रंग - निळा.
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: इतरांशी व्यवहार करताना किंवा बोलताना लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका. तुमच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. थोडीशी अस्वस्थता जाणवेल. मुख्य म्हणजे आहारावर नियंत्रण ठेवा, त्यासाठी मनशांती हा उत्तम मार्ग आहे. शुभ रंग - पिवळा.

Thursday, March 25, 2021

अॕट्रोसिटी ची तक्रार व कॕटीन चालवण्याची परवानगी मिळण्यासाठी महिला स.पो.नि. सह तिघांना लाच घेताना अटक !


परळी वैजनाथ ;- अट्रोसिटी ची तक्रार मागे घेण्यासाठी तसेच कँटीन चालवण्याची परवानगी मिळावी म्हणून एक लाख रुपयांची लाच घेताना रेल्वे च्या सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना जेरबंद करण्यात आले .पकडण्यात आलेली व्यक्ती ही महिला असल्याने खळबळ उडाली आहे .

माधुरी मुंढे,संजय मेंढेकर आणि प्रेमदास पवार या तिघांनी तक्रादारकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती .याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या तिघांना रंगेहाथ पकडले .

सपोनि मुंढे यांच्या अटकेने खळबळ उडाली आहे .रेल्वे पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे .या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .

बनावट दस्ताऐवजाद्वारे जमिनीवर कब्जा करुन फसवणूक केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल.

बीड -( प्रतिनीधी)  जप्ती पारगाव (ता. बीड) येथील शेतकऱ्याची दोन हेक्टर ४३ आर. जमिनीवर बनावट दस्ताऐवजाद्वारे कब्जा करुन फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गौतम खटोडसह पाच जणांवर मंगळवारी (दि. २३) गुन्हा नोंद झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील पारगाव (जप्ती) येथील अनंत कडाजी तिपाले (वय ५०) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, पारगाव (जप्ती) येथील गट क्रमांक ६२ मध्ये त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. ता. सात मे १९८५ रोजी त्यांनी चुलत्याकडून १९ एकर पैकी १० एकर चार गुंठे जमीन खरेदी केली. खरेदी खतामध्ये दक्षिणेकडील जमीन खरेदी करत असल्याची नोंद आहे. सातबारा उताऱ्यावर तसे नमूद आहे. दरम्यान, चुलत्यांचा मृत्यू झाल्यानंतर गट क्रमांक ६२ मधील नऊ एकर जमीन चुलतभावाने विक्री केली. त्यानंतर खरेदीदाराने दोन एप्रिल १९९३ रोजी दोन एकर ४३ आर जमीन झुंबरलाल पन्नालाल खटोड यांना विक्री केली.
दरम्यान, झुंबरलाल खटोड यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र गौतम झुंबरलाल खटोड यांनी मूळ खरेदीदारांशी संगनमत करुन बनावट चतु:सीमा व खरेदीखत तयार करुन दुरुस्तीपत्र केले व फसवणूक केली. यासंदर्भात अनंत तिपाले यांच्या फिर्यादवरुन गौतम झुंबरलाल खटोड, रतनलाल पन्नालाल नहार व इतर तिघांवर बीड ग्रामीण ठाण्यात फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. सहायक निरीक्षक योगेश उबाळे तपास करत आहेत.
दरम्यान, बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांच्या फिर्यादीवरुन शहर ठाण्यात पाच जणांवर गुन्हा नोंद झाला होता. यातही गौतम खटोडचा समावेश होता. बीड शहर ठाण्यातील दोन आरोपींचा बीड ग्रामीण ठाण्यातील गुन्ह्यातही समावेश आहे. त्यामुळे भूमाफियांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

बीड जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा वाढला . बीड 106 अबाजोगाई 90 परळी 31एकूण 335 पॉझिटिव्ह !


बीड - (प्रतिनीधी)  जिल्ह्यातील 2276 रुग्णांची तपासणी केली असता तब्बल 335 पॉझिटिव्ह आढळून आले असून यामध्ये बीड तालुक्यातील 106आणि अंबाजोगाई चे 90 रुग्ण आहेत .बुधवारी देखील बाधितांचा आकडा 300 होता तो आज पुन्हा वाढल्याने चिंता वाढली आहे .

जिल्ह्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 4,शिरूर 4,पाटोदा 11,परळी 31,केज 16,गेवराई 23,धारूर 5,बिर 106,आष्टी 25 आणि अंबाजोगाई मध्ये 90 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले भाषेत .

दिवसेंदिवस वाढत असलेला बाधितांचा आकडा पाहता प्रशासनाने आज रात्री बारापसून लॉक डाऊन चा घेतलेला निर्णय हा आकडा कमी करण्यास मदत ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

राष्ट्रवादीच्या खा.सुप्रिया सुळेंनी घेतली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट.

 

मुंबई : (प्रतिनीधी) -  सचिन वाझे प्रकरण तसेच परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब यामुळे महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे.  विरोधकांच्या एकएक आरोपांमुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule  यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी चर्चेदरम्यान त्यांच्यात राज्यातील घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. सोनिया गांधींनी मार्गदर्शन केल्याबद्दल सुळे यांनी त्यांचे आभार मानले आहे.

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य. २५ मार्च २०२१: जाणून घ्या १२ राशींसाठी आजचा गुरूवार कसा असणार.

 


 आजचे राशी भविष्य २५ मार्च २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (Daily Horoscope 25 March 2021 rashifal in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. मित्रांच्या सहकार्याने रखडलेले काम मार्गी लागेल. व्यवसायात चांगला नफा होईल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील. रंग शुभ - हिरवा. 
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: धन लाभ होईल. प्रवासाचा योग आहे. परदेशात स्थायिक झालेल्या व्यक्तींकडून शुभ वार्ता येतील. धार्मिक कार्यात पैसा खर्च कराल. रंग शुभ - निळा.
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस लाभदायक आहे. मित्रांच सहकार्य मिळेल. एखाद्या सुंदर जागी प्रवास करू शकता. महत्त्वपूर्ण निर्णय पुढे ढकलावे. अनेक विचारांमध्ये व्यस्त असाल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पिवळा. 
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंदाच  वातावरण असेल. वडिलांचा आशिर्वाद मिळेल. सरकारी काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. रंग शुभ - हिरवा.
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. तडजोड केल्यास वाद होणार नाही. प्रवास टाळा. लेखक, कलाकार आणि सल्लागारांसाठी  दिवस शुभ आहे. नवीन काम सुरू करू नये. शुभ रंग - हिरवा.
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आजचा दिवस आनंदाने आणि उत्साहाने भरलेला असेल. नवीन कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबासमवेत गोड जेवणाचा आनंद घ्याल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील. रंग शुभ - पिवळा.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धेमध्ये यश मिळाल्याने विद्यार्थी आनंदीत होतील. प्रशासन आणि राजकारणाशी संबंधित लोकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. लव लाइफ झकास असेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - लाल.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: राजकारणात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस प्रगतीशील असेल. मीडिया आणि आयटीशी संबंधित लोक त्यांच्या कामावर समाधानी असतील. वैवाहिक जीवन उत्तम राहील. गायत्री मंत्र वाचा. शुभ रंग - पिवळा.
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक आहे. आर्थिक फायद्यांबरोबरच नशीबाचीही साथ मिळेल. प्रियजनांशी नातेसंबंधात प्रेम वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे. प्रवासाचा योग आहे . मानसिकदृष्ट्या आनंदी असाल. शुभ रंग - लाल. 
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: कामात खूपच बिझी असताना सुद्धा तुम्ही कौटुंबिक कार्यासाठी वेळ काढाल. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल. श्री विष्णू जीं ची उपासना करा. शुभ रंग - पांढरा.
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्र आणि नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाल्यामुळे आनंद होईल. काम सहजपणे पूर्ण होईल. व्यवसायात फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग - हिरवा. 
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: कुटुंबातील सदस्यांशी होणारे गैरसमज टाळा. वायफळ खर्च होईल. मानसिक गोंधळ झाल्यामुळे आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाही. आरोग्य उत्तम राहील. शुभ रंग - केशरी.

Wednesday, March 24, 2021

आपलेला प्रवासासाठी बाहेरगावी जायचंय ! तर मग हा नमुना अर्ज करा !


बीड (प्रतिनीधी) जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून 4 एप्रिल पर्यंत लावण्यात आलेल्या लॉक डाऊन च्या काळात तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल किंवा बाहेर गावाहून यायचं असेल तर त्यासाठी संबंधित तहसीलदार यांच्या कडे अर्ज करावा लागेल त्यानंतर तुम्हाला प्रवासासाठी पास दिला जाईल अन मग तुम्हाला बाहेरगावी जाता किंवा येता येईल अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप आणि उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी दिली आहे .

अर्जाचा नमुना येथे दिला आहे त्याचा स्क्रीन शॉट काढा तो भरा अन मग बाहेरगावी जा !

बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाने 25 मार्चच्या रात्री बारापसून ते 4 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन ची घोषणा केली आहे .याकाळात कोणाला जर बाहेरगावी जायचे असेल किंवा बाहेर गावाहून यायचे असेल तर त्या त्या तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागणार आहे .

या अर्जासोबत प्रवासाचे कारण,अँटिजेंन टेस्ट किंवा आरटीपीसीआर केल्याचा अहवाल सोबत जोडून द्यावा लागणार आहे,तसेच प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी आपले आधारकार्ड किंवा ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे .

महत्वाची बातमी! बँकांना 'इतक्या' दिवस असेल सुट्टी. बॕकेचे महत्त्वाची कामे आटपून घ्या!


मुंबई(प्रतिनीधी ) 2021 आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता 6 दिवस बाकी आहेत. अशी अनेक कामे आहेत ज्या पीपीएफ खात्यात किमान वार्षिक गुंतवणूक, सुकन्या समृद्धि योजना यासह 31 मार्चपर्यंत सामोरे जाणे आवश्यक आहे. त्याच वेळी, नवीन आर्थिक वर्षात अशी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली जातात, त्यासाठी बँकेत जाणे आवश्यक आहे. बँक संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे कमी दिवस असणार आहेत. 

जर तुम्हाला बँकेत काही महत्त्वाची कामं करायची असतील तर पुढील 3 दिवसात आटपून घ्या. अन्यथा पुढील 10 दिवस गमावतील. खरंतर, 27 मार्च ते 4 एप्रिल 2021 पर्यंत बँका फक्त दोन दिवसांसाठी खुल्या असतील.

या दिवशी बँकांना सुट्टी…

– 27 मार्च महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी बँक बंद

– 28 मार्च रविवार असल्याने बँका बंद

– 29 मार्च होळीमुळे बँक बंद.

– 30 मार्च इतर शहरांमध्ये बँका खुल्या राहिल्या तरी पाटण्यात बँका बंदच राहतील.

– 31 मार्च आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोणतेही सार्वजनिक व्यवहार केले जात नाहीत.

– 1 एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्याने बँक खाते बंद करण्याची घाई.

– 2 एप्रिलला गुड फ्रायडेमुळे बँका बंद असतील.

– 3 एप्रिल रोजी बँक खुल्या असतील.

– 4 एप्रिलला रविवारी बँक बंद राहतील.

' महाराष्ट्रत दलित पँथरचा दबदबा अन्याय अत्याचार विरोधात लढण्यास पॕथर सज्ज - डाॅ.घनःशाम भोसले,दिनेश लोंढे

सातारा (प्रतिनीधी) - महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात दलित पँथर संघटनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढताना दिसत आहे. पुणे, अहमदनगर, भंडारा, बीड,नाशिक,रायगड जिल्ह्यातही इतर राजकीय पक्षांना मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दबदबा असलेले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांच्या उपस्थितीत शेकडो  कार्यकर्त्याचा दलित पँथर सघंटनेत प्रवेश झाला.
     फलटण तालुक्यात दलित पँथरची नुकतीच बैठक पार पडली त्यात नूतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. बैठकीला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  डाॅ.घनःशाम भोसले अध्यक्ष स्थानी उपस्थित होते. फलटण तालुका संपर्क प्रमुख पदी मंगेश इंगळे, फलटण तालुका संघटक पदी - अमोल शिलवंत,फलटण तालुका उपाध्यक्षपदी - बापुराव सावंत यांची निवड करण्यात आली तर झिरपवाडी छावणी शाखेच्या उपाध्यक्ष पदी - रत्नदिप  इंगळे,सरचटणीस पदी - किरणकुमार इंगळे, संघटक पदी -  महेश वायदंडे, उपाध्यक्षपदी - राधेश्याम इंगळे यांची निवड करण्यात आली यावेळी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश आवाडे, इंदापुर तालुका अध्यक्ष सोमनाथ भोसले, सातारा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण काकडे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख विराज भोसले, फलटण तालुका अध्यक्ष मंगेश आवळे, फलटण शहर अध्यक्ष आकाश काकडे तसेच बारामती तालुका अध्यक्ष गौरव अहिवळे, बारामती शहर अध्यक्ष शुभम गायकवाड, तसेच राहुल काकडे उपस्थित होते.
      कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. मास्क, तापमान, ऑक्सिजन पातळी तपासून, सॅनिटायझर देऊनच कार्यकर्त्याना प्रवेश देण्यात येत होता. अन्याय अत्याचार विरोधात पँथर गरूड झेप घेण्यास सज्ज असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांनी यावेळी सांगितले. 
      दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांच्या नेतृत्वाखाली दलित पँथर चे काम अधिक प्रभावी होईल असा दावा दलित पँथरच्या उपस्थित असलेल्या शेकडो नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी केला.

बीड जिल्हातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे जिल्ह्यात १० दिवसांचा कडक लाॅकडाऊन.

 * मात्र या कालावधीत काय चालु काय बंद तेही जाणुन घ्या ?

 बीड  (प्रतिनिधी)  बीड जिल्हा अधीकारी कार्यालयात आज पत्रकार परिषदेत जिल्हा अधिकारी यांनी आदेश दिले की बीड जिल्ह्यात (दि.२५.०३.२०२१ च्या मध्यरात्रीपासून) दि.२६.०३.२०२१ ते ०४.०४.२०२१ बीड जिल्ह्यात लाॅकडाऊन असेल असे आदेश जारी केले त्यामध्ये कोणता व्यवसाय चालु राहतील ते खालील प्रमाणे आहे.

१. सार्वजनिक / खाजगी क्रिडांगणे / मोकळ्या जागा , उद्याने , बगीचे हे संपुर्णतः बंद राहतील . तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning Walk व Evening Walk प्रतिबंधीत राहील . 

२. उपहारगृह , सर्व अनुज्ञप्त्या , रेस्टॉरंट , लॉज , हॉटेल्स , मॉल , बाजार , मार्केट संपूर्णत बंद राहतील . ( कोविड संक्रमित रुग्णांसाठी व इतर रुग्णांसाठी जेवण , नाष्टा , चहा व इतर पुरवठा करण्यासाठी पुर्व परवानगी दिलेले वगळून ) 

३. सर्व केशकर्तनालय / सलुन / ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील . 

४. शाळा , महाविद्यालय , शैक्षणिक संस्था , प्रशिक्षण संस्था , सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील . 

५. सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी , तीन चाकी व चार चाकी संपूर्णतः बंद राहतील . तथापि अत्यावश्यक सेवेतील वाहने , पूर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकिय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहील . सोबत ओळखपत्र / पुर्व परवानगी / वैद्यकिय कारण असेल तर त्यासंबंधीचा पुरावा .

 ६. सार्वजनिक व खाजगी बस सेवा , ट्रक , टेम्पो , ट्रेलर , ट्रॅक्टर इत्यादींसाठी संपूर्णतः बंद राहतील . तथापि कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे बीड जिल्ह्यातील नगरपालिका / नगरपंचायत चे पोलीस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा | देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत . तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी पुर्व परवानगी असलेले घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे.

७ . सर्व प्रकारचे बांधकाम / कंन्स्ट्रक्शनची कामे संपूर्णतः बंद राहतील . तथापि शासकीय बांधकामे चालू राहतील . त्याठिकाणी काम करणा - या कामगार यांना संबंधित शाखा अभियंता , यांनी तात्पुरते पास उपलब्ध करून देण बंधनकार असेल . 

८. सर्व चित्रपटगृह , व्यायामशाळा , जलतरण तलाव , करमणुक उद्योग , नाट्यगृह , प्रेक्षागृह संपूर्णत : बंद राहतील . 

९.मंगल कार्यालय , हॉल , लग्न समारंभ , स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील . 

१०. सामाजिक / राजकीय / क्रिडा / मनोरंजन / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील . 

११. धार्मिक स्थळे / सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णतः बंद राहतील .

१२ . बीड जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालये संपूर्णतः बंद राहतील . परंतु ३१ मार्च २०२१ अखेरीस ताळमेळ , बँकेत चलन भरण्याची कामे करण्यास परवानगी असेल . ( दुकानाचे शटर बंद करून आत क्लोजिंगचे कामे करण्यास जास्तीत जास्त तीन व्यक्तीस परवानगी असेल . ) 

" परिशिष्ठ - ब " 

१ . सर्व किराणा दुकानाची ठोक विक्रेते सकाळी ०७.०० ते ० ९ .०० वाजेपर्यंत सुरु राहतील . किरकोळ विक्रेत्यांना ०७.०० ते ० ९ .०० या वेळेतच केवळ दुकानातुन घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल . त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील .

२. दुध विक्री व वितरण सकाळी १०.०० वाजेपर्यत घरपोच अनुज्ञेय राहील.तथापि दुध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल . त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील.संबंधित दुध विक्रेता व वितरक यांनी अन्टीजन / आरटीपीसीआर केलेली असणे बंधनकारक राहील.

३ . भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी ०७.०० ते १०.०० या वेळेत किरकोळ विक्रेत्यांना विक्री करतील . त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील . किरकोळ विक्रेते एका ठिकाणी न थांबता मास्क लावून गल्लोगल्ली फिरुन सकाळी ०७.०० ते १२.०० या वेळेतच विक्री करतील . 

४. सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकिय सेवा , पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील.सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकरणार नाही . अन्यथा संबंधित व्यक्ति आथवा संस्था कारवाईस पात्र राहील.

५. ऑनलाईन औषध वितरण सेवा व दवाखान्याशी संलग्न असलेली सर्व दुकाने दिनांक ०४ एप्रिल २०२१ पर्यंत २४ तास सुरु ठेवता येतील . 

६.सर्व मा . न्यायालये व राज्य शासनाचे केंद्र शासनाचे कार्यालये तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक संस्थेची कार्यालये राष्ट्रीयकृत बँका शासन निर्देशानुसार ५० टक्के उपस्थिती मर्यादिनुसार सुरु ठेवता येतील . शक्य असल्यास Work From Home चा पर्याय वापरण्यात यावा . शासकीय कर्मचा यांसाठी आवश्यक पासची आवश्यकता राहणार नाही , तथापि स्वतःचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकार असेल . 

७.बीड शहरातील पोलीस पेट्रोल पंप , नगर रोड , बीड , साई पेट्रोल पंप , बार्शी रोड , बीड हा पेट्रोल पंप २४ तास चालू राहील . तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी एकच पेट्रोल पंप २४ तास चालू ठेवणे बाबत संबंधित तहसिलदार यांनी त्यांचे स्तरावरून निर्णय घ्यावा . सदर ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील उदा.पोलीस , आरोग्य व इतर शासकीय विभागांची वाहने , अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे शासकीय कर्मचारी यांचे वाहने , अत्यावश्यक सेवा पुरविणारे खाजगी आस्थापनाचे उदा.घरगुती गॅस वितरक , पिण्याचे पाणी पुरविणारे वाहने यांनाच इंधन पुरवठा करण्यात यावा . 

८.एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार सुरु राहील.कर्मचाऱ्यांना गणवेश , ओळखपत्र बंधनकारक असेल . 

९.दैनिक वर्तनामपत्रे , नियतकालीक यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल / प्रिंटमिडीया यांची कार्यालय शासकीय निमयानुसार सुर राहतील . वर्तमानत्रपाचे वितरण सकाळी ०६.०० त ० ९ .०० या वेळेमध्येच अनुज्ञेय राहील . 

१०. संस्थात्मक अलगीकरण / विलगीकरण व कोविड केअर सेंटर करता शासनाने ताब्यात घेतलेल्या व मान्यता दिलेल्या कार्यालयाच्या जागा , इमारती विहीत निर्बध व नियमानुसार सुरु राहतील . 

११. संपुर्ण बीड जिल्ह्यातील मा . न्यायालयाचे न्यायीक अधिकारी / कर्मचारी , वकील , शासकीय राज्य / केंद्र शासनाचे कर्मचारी शासन अंगीकृत कर्मचारी , डॉक्टर , नर्स , अंगणवाडी कर्मचारी , आशा वर्कर , फार्मा व औषधी संबंधित मेडीकल शॉपचे कर्मचारी , दुध विक्रेते , अत्यावश्यक सेवा जसे कृषी , बी - बियाणे , खते , गॅस वितरण , पाणी पुरवठा , आरोग्य व स्वच्छता करणारे शासकीय व खाजगी कामगार , अग्निशमन सेवा , जलनिःसारण तसेच पुर्वपावसाळी व पावसाळ्या दरम्यान करावयाची अत्यावश्यक | कामे करणारे व वीज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी , नगरपरिषद / नगरपंचायत चे कर्मचारी,पोलीस विभागाचे कर्मचारी , महसूल विभागाचे कर्मचारी तसेच कन्टेंमेंट झोन करीता नियुक्त कर्मचारी | यांनाच चार चाकी , दुचाकी ( स्वतःकरीता फक्त ) वाहन वापरण्यास परवानगी राहील . या सर्व कर्मचारी / अधिकारी यांनी स्वतःचे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे . वाहन फक्त शासकीय कामासाठी अथवा कामाचे जबाबदारीनुसार व शासकीय अथवा संस्थेने दिलेल्या वेळेतच वापरता येईल .

 १२. औषध व अन्न उत्पादन , संलग्न प्रक्रीया आणि निर्यात उद्योग व त्याचे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील . 

१३. माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापनांनी Work From Home चा पर्याय वापरावा . 

१४. सर्व वैद्यकिय व्यवसायीक , परिचारीका , पॅरामेडीकल कर्मचारी , सफाई कर्मचारी व अॅम्बुलन्स यांना जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी परवानगी असेल .

 १५. वृध्द व आजारी व्यक्तीकरीता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुर राहतील . 

१६. अंत्यविधीसाठी २० व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी असेल . 

१७. शेतीच्या मशागतीसाठी मुभा असेल . 

१८. मग्रारोहयोची कामे सुरु राहतील . कामाच्या ठिकाणी शारिरिक अंतर पाळणे बंधनकारक आहे . 

१९ . स्वस्त धान्य दुकाने १२.०० वाजेपर्यंत चालू राहतील त्यादरम्यान शारिरिक अंतर पाळणे , मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल . 

२०. या आदेशापुर्वी बाहेरगावी / परराज्य / देशात जाण्यासाठी रेल्वे / विमानाचे तिकीट बुकींग केले असेल , त्यांना रस्ता प्रवासास परवानगी असेल , सोबत ओळखपत्र व तिकीट असणे आवश्यक आहे . 

२१ . अत्यावश्यक सेवेशी निगडीत असलेले कारखाने / उद्योग कामाच्या ठिकाणी मजूरांच्या राहण्याची व जेवणाची सोय असेल तरच सुरु ठेवता येतील . 

२२. पाणी पुरवठा ( जार , टॅकर ) दुपारी १२.०० वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील . 

२३. इंटरनेटसारख्या संपर्क साधनांसंबंधी ( बँकींग , पोस्ट , एलआयसी , व इतर महत्वाच्या शासकीय कार्यालय व इतर आस्थापना यांना ) सेवा पुरविणा - या संस्थांना त्यांच्या आस्थापना आवश्यकतेनुसार सुरु ठेवता येतील .. 

२४. सर्व ऑनलाईन सेवा पुरविणारे CSC नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या वेळेप्रमाणे सुर राहतील . त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील . 

२५. अत्यावश्यक सेवेतील संस्था , घरगुती गॅस वितरक यांना दैनिक व्यवहार किंवा पुरवठादार कंपनीशी

आर्थिक व्यवहारासाठी बँकेत ये- जा करणेसाठी व व्यवहार करणेसाठी परवानगी असेल.बँकेतील व्यवहारासाठी ये जा करणा - या व्यक्तीस संस्थेचा गणवेश अथवा ओळखपत्र किंवा आवश्यकतेनुसार दोन्ही बाबी बंधनकारक राहतील . 

२६. जी व्यक्ती लसीकरण व अॅन्टीजन / आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी जाणार आहे अशा व्यक्तीजवळ जर आरोग्य विभाग यांचे पत्र किंवा लसीकरण व अॅन्टीजन / आरटीपीसीआर तपासणी बाबत एसएमएस ( मॅसेज ) प्राप्त असले त्यास मुभा असेल . 

२७. इतर जिल्ह्यात जाणा - या वाहनांना प्रवेश अनुज्ञेय राहील . 

२८. जड वाहतुकीस जिल्ह्यातून परवागनी असेल . 

२९ . बाहेरच्या जिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तीने अॅन्टीजन / आरटीपीसीआर तपासणी केलेले असणे बंधनकारक असेल . अशा कोणत्याही व्यक्तीस अॅन्टीजन / आरटीपीसीआर तपासणी न करता प्रवेश अनुज्ञेय राहणार नाही . त्यानुसार सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , सदरील आदेशाचे काटेकोर पालन करावे . आदेशाचा भंग करणा - या व्यक्तीविरुध्द दंडात्मक तसेच कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल .असे आदेशित केले आहेत

कांतीकारी साथी जाणुन घ्या आजचे राशी भविष्य.२४ मार्च २०२१: असा जाईल तुमचा बुधवार.





  • मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:  शारीरिक किंवा मानसिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे.
  • तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आज तुम्ही सामाजिक तसेच सार्वजनिक क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी कराल
  • कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today:  तुमच्या प्रभावशाली वाणीच्या सहाय्याने सर्वांची मनं जिंकाल.

 आजचे राशी भविष्य २४ मार्च २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (Daily Horoscope 24 March 2021 rashifal in marathi aajche rashi bhavishya)

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today:  शारीरिक किंवा मानसिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा तसेच वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या. आर्थिक अडचण जाणवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - हिरवा.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: कुटुंबात वाद होण्याची दाट शक्यता आहे. वाद-विवाद टाळा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांच्या भेटी होतील. जोडीदारासोबत फिरण्याची योजना आखाल. आजचा शुभ रंग - लाल.
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today:  व्यवसायात भागिदारी करण्यासाठी उत्तम योग आहे. आज उद्योग धंद्यात चांगले यश प्राप्त होईल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. समाजात तुमच्या कार्याचा गौरव होईल. आजचा शुभ रंग - पिवळा. 
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यवसायात असलेल्या स्पर्धेमुळे धावपळ वाढेल. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. व्यापाराच्या संदर्भातील कार्यात चांगला लाभ होईल. प्रवासासाठी आजचा दिवस शुभ आहे. आजचा शुभ रंग - तांबडा
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today:  आजचा दिवस तुमच्यासाठी थोडाचा त्रासदायक जाण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. अशक्तपणा जाणवेल आणि त्यामुळे कार्यातील उत्साह कमी होईल. आजचा शुभ रंग - तपकीरी
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today:  धार्मिक कार्य लवकरच घरता पार पडेल. नोकरी किंवा व्यवसायात काही प्रमाणात वाद होण्याची शक्यता आहे. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - राखाडी
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आज तुम्ही सामाजिक तसेच सार्वजनिक क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी कराल. धन लाभ होण्याचा उत्तम योग आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. समाधानकारी व्यवहार अधिक लाभदायक असतील. आजचा शुभ रंग - लाल.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: परिवारातील सदस्य किंवा जवळील मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन व्यवहारात सावधानता बाळगा किंवा असे कार्य करणं आज टाळा. पैसे अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या. अपमान होणार नाही याकडे लक्ष द्या. आजचा शुभ रंग - हिरवा.
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आजचा दिवस थोडा त्रासदायक जाण्याची शक्यता अधिक आहे. मित्रांच्या भेटी होतील. कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - नारंगी.
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today:  तुमच्या प्रभावशाली वाणीच्या सहाय्याने सर्वांची मनं जिंकाल. उत्पन्नापेक्षा अधिक पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात कामगिरी चांगली असेल. ठराविक कार्यात यश कमी मिळेल. आजचा शुभ रंग - जांभळा.
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today:  आज परमेश्वराच्या कृपेने तुम्ही ठरवलेले कार्य पूर्ण कराल. आरोग्य चांगले राहील. भोजनात गोड खाद्य मिळेल. प्रवासाचा योग लवकरच निर्माण होईल. वायफळ खर्च टाळा. आजचा शुभ रंग - मोरपंखी