मुंबई : (प्रतिनीधी) - सचिन वाझे प्रकरण तसेच परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब यामुळे महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. विरोधकांच्या एकएक आरोपांमुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी चर्चेदरम्यान त्यांच्यात राज्यातील घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. सोनिया गांधींनी मार्गदर्शन केल्याबद्दल सुळे यांनी त्यांचे आभार मानले आहे.
No comments:
Post a Comment