बीड (प्रतिनिधी) मा.पोलीस अधीक्षक साहेब,बीड यांचे आदेशाप्रमाणे दिनांक 27/11/2020 व दि .28 / 11 / 2020 रोजी पोलीस स्टेशन स्तरावर विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी अवैध धंद्यांची माहिती काढून केसेस करणे बाबत आदेशीत केले होते . त्या अनुषंगाने बीड जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचे अधिपत्याखालील वेगवेगळी पथके तयार करुन अवैध धंद्याची माहिती काढून नमुद कालावधीमध्ये अवैध दारु विक्री संदर्भाने ( 42 ) गुन्हे दाखल करुन ( 42 ) लोकांना ताब्यात घेवून त्यांचेकडून 1,90,718 / -रु . चा मुद्येमाल जप्त केला . तसेच अवैध जुगाराच्या ( 20 ) केसेस करुन ( 33 ) लोकांना ताब्यात घेवून त्यांचेकडून 39,431 / -रु . चा मुद्येमाल जमा करण्यात आला आहे . यापुढेही संपुर्ण जिल्हाभर विशेष मोहिम राबवून अवैध धंद्यावर केसेस करण्याचे प्रस्तावित आहे . सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , बीड यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment