Tuesday, December 1, 2020

बीड जिल्हयात " ऑपरेशन मुस्कान -09 " महाराष्ट्र ही विशेष शोध मोहिम सुरु.


बीड  (प्रतिनिधी) ऑपरेशन मुस्कान मा . सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे मा . पोलीस महासंचालक म.रा.मुंबई यांचेकडून " ऑपरेशन मुस्कान ० ९ " ही विशेष मोहीम दिनांक ०१/१२/२०२० ते दिनांक ३१/१२/२०२० या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे . त्या अनुषंगाने मा . पोलीस अधिक्षक , श्री.आर.राजा , अपर पोलीस अधीक्षक तथा विशेष पोलीस अधीकारी , अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष , बीड श्री.एस.के. लाजेंवार यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष , यांचे एक पथक चे काम करत आहे . बीड जिल्हयात २८ पोलीस स्टेशन मध्ये २८ पथके तयार करण्यात आले आहेत . त्या पथकामध्ये एक पुरूष व एक महिला पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . सदर पथकामार्फत त्यांच्या पोलीस स्टेशन च्या हाद्दीमध्ये बेवारस मुलांचा शोध घेवून त्यांचे नाव , गाव विचारुन त्यांची माहिती घेवून त्यांच्या आई - वडीलाकडे त्यांना सुपूद करण्यात येणार आहे . तरी बीड जिल्हयातील जनतेस अवाहन करण्यात येते की , आपणास आई - वडीलांपासून वंचित असलेले , हरवलेले १८ वर्षाखालील मुले - मुली आढळून आल्यास तसेच रेल्वे स्थानके , बसस्थानके , रस्त्यावर भिक मागणारी मुले अथवा कचरा गोळा करणारी मुले , धार्मीक स्थळे , रुग्नालये , हॉटेल्स , दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले अशा मुलांना हरवलेली मुले समजुन त्यांची चौकशी करुन त्यांचे कायदेशिर पालकाच्या तब्यात देण्यात येणार आहे . तरी सामन्य जनतेने यासाठी सहकार्य करणे साठी असे बालके आढळल्यास पोउपनि एस.एस.भारती यांचे पुढील मोबाईल नंबर वर संपर्क करावा . मो.नं. ९ ५५२५०७०३१ , पोहेकॉ / ७८ ९ पी.वाय.वाळके ९ ८२२०७ ९ ७८ ९ . व जे मुले - मुली आपल्या आई - वडीलांपासून दूर गेलेले आहेत हरवलेले आहेत . त्यांना त्यांच्या आई - वडील यांचेशी भेट होवून त्यांना पुढील जीवन जगण्यास मदत होईल यासाठी " ऑपरेशन मुस्कान - ९ " विशेष शोध मोहिम राबविण्यात येत आहे .

No comments:

Post a Comment