बीड (प्रतिनिधी) 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणुन सर्वर्त्र पाळला जातो. जागतीक एड्स दिन 2020 ची थीम जागतिक एकता आणि सामायिक जबाबदारी”ü (Global solidarity, shared responsibility) हे आहे. हे उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी मा.प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या एक महिन्याच्या कालावधीत राबविले जाणार आहे.
जागतीक एड्स दिन 2020 ची थीम “जागतिक एकता आणि सामायिक जबाबदारी”ü (Global solidarity, shared responsibility) हे उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी खालील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक केबल, टीव्ही/चॅनल वर स्क्रोलींग जाहीरात करुन एचआयव्ही/एड्स जनजागृती करणे तसेच फलेक्स बॅनर द्वारे बसस्थानकात व मुख्य चौकात जनजागृती करणे.
एचआयव्ही/एड्स या विषयावर तज्ञांची टिव्ही वर मुलाखत घेणे.
ऑनलाईन स्पर्धेचे विषय- 1) एचआयव्ही/एड्स बाबत जनजागृती. 2) मातेकडुन होणाऱ्या बाळाला एचआयव्ही/एड्स संसर्गापासुन प्रतिबंध (EMTCT). 3) स्वत:चे एचआयव्ही स्टेटस जाणुन घ्या (Know your status) आणि जागतिक एकता आणि सामायिक जबाबदारी (Global solidarity, shared responsibility) या तिन्ही विषयावर ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करणे. ऑनलाईन स्पर्धा 1) सोशल मिडीयावर एक मिनीटाचा प्रचारात्मक व्हीडीओ बनविने 2) जीआयएफ/मीम्स 3) सेल्फी विथ स्लोगन 4) मास्क डिझाईन स्पर्धा.
स्थानिक वृत्तपत्रातुन एचआयव्ही/एड्स विषयी लेख प्रकाशित करणे.
आकाशवाणी रेडीओ वर मातेकडुन होणाऱ्या बाळाला एचआयव्ही/एड्स संसर्गापासुन प्रतिबंध (EMTCT) विषयी मुलाखत देणे. (जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी/जिल्हा पर्यवेक्षक, वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी)
पत्रकार परिषदेचे आयोजन करुन मातेकडुन होणाऱ्या बाळाला एचआयव्ही/एड्स संसर्गापासुन प्रतिबंध (EMTCT) आणि मोफत तपासणी माहिती प्रसिध्द करणे.
तज्ञांचे व्याख्यान (ऑलाईन) महाविद्यालयात आयोजीत करुन एचआयव्ही/एड्स विषयी मुलभुत माहिती, कलंक आणि भेदभाव, एचआयव्ही तपासणी आणि औषधोपचार या विषयावर माहिती देणे.
शहरात उपलब्ध असलेल्या एलईडी स्क्रीन (LED) वर त्यांच्या सहकार्याने माहिती देणे.
अतिजोखीम गट, स्थानिक रिक्षा, स्थानिक प्रवासी वाहन/टॅक्सी चे चालक व क्लिनर आणि घरेलु कामगार महिला, पुरुष व ईतर यांचे करिता एचआयव्ही/एड्स विषयी संवेदीकरण कार्यशाळा आयोजीत करणे. (सदर उपक्रम राबवितांना महाराष्ट्र शासनाच्या कोवीड-19 च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे.)
जिल्हाधिकारी कार्यालय, झेडपी, महानगर पालीका, नगर पालीका, आरटीओ, स्थानिक-राज्यपरिवहन, वन विभाग, सामाहिक न्याय विभाग तसेच आदिवासी कल्याण विभाग इ.व इतर विभागासोबत त्यांच्या सहकार्यातुन नाविन्यपुर्ण एचआयव्ही/एड्स जनजागृती उपक्रम राबविण्यात यावे. (सदर उपक्रम राबवितांना महाराष्ट्र शासनाच्या कोवीड-19 च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे.)
महाराष्ट्र शासनाच्या कोवीड-19 च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम राबविले जाणार आहे. सदरील कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाअर्तगत आयसीटीसी, एआरटी, रक्तपेढी, सुरक्षा क्लिनीक, नेहरु युवा केंद्र व अशासकीय संस्थेच्या सहाय्याने
कार्यक्रमाचे आयोजन 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या एक महिन्याच्या कालाधीत शहरी व ग्रामिण भागात केले जाणार आहे. महाविद्यालयातील युवक-युवतींनी यावर्षी रॅली काढण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी व ऑनलाईन स्पर्धेत सहभाग घेऊन उत्सपुर्त प्रतिसाद दयावा. तरी सर्व महाविद्यालयीन युवक-युवती, नेहरु युवा केंद्रे, अतिजोखीम गट, ऊसतोड कामगार, घरेलु कामगार, शासकिय व निशासकिय कर्मचारी, ट्रकर्स, रिक्षा/टॅक्सी चालक, इत्यादी नागरीकांनी एचआयव्ही/एड्स जनजागृतीमध्ये सहभाग नोंदवावा. तसेच एचआयव्ही/एड्स विषयी काही शंका असल्यास राष्ट्रीय हेल्पलाईन 1097 या नंबरवर फोन करावा किंवा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय बीड येथे संपर्क करावा.
सदर विविध उपक्रमामध्ये जास्तीत जास्त युवकांनी, महाविद्यालयीन युवक-युवतींनी सहभाग नोंदवुन राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी करण्याचे अवाहन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय बीड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment