परळी वैजनाथ ( प्रतिनिधी)भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ या निवासस्थानी समाजविघातक व विकृत मानसिकता असलेल्या लोकांकडून झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून या विघातक मानसिक वृत्तीच्या आरोपींचा शोध घेऊन राज्य सरकारने कठोरात कठोर कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.डाॅ. विनोद जगतकर यांनी केली आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील ‘राजगृह’ निवासस्थान हे देशातील तमाम जनतेसाठी एक महत्वाचं ऊर्जा केंद्र आहे. या निवासस्थाची केलेली तोडफोड ही अत्यंत निंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात खोलवर रुजलेले आहे. त्यामुळे कोणतीही विघातक मनोवृत्ती हे विचार कदापी संपवू शकत नाही. त्यामुळे अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन केले पाहिजे. राज्यातील व देशातील नागरिकांनी संयम ठेवून शांतता पाळावी असे आवाहन प्रा.डाॅ. विनोद जगतकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment