* आरोपी फरार पुढील तपास सहाय्यक पो.नि.आरती जाधव करीत आहेत .
परळी वैजनाथ (प्रतिनीधी ):शहरातील एका ४३ वर्षीय विवाहित महिलेला एका नराधमाने चौदा दिवस डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केला. महिलेने कसेबसे तेथून पळ काढत परळी शहर पोलिस ठाणे गाठून आरोपी विरोधात फिर्याद दिली. या प्रकरणी आरोपी शादाब खान रा.बंगला परळी याच्या विरोधात ३७६, ३६५, ३८६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
पिडित महिलेने परळी शहर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी शादाब खान याने २४ जून रोजी आपले अपहरण केले व एका खोलीत कोंडून ठेवत अत्याचार केला. व माझ्या बोटातील सोन्याची चार ग्रॅमची अंगठी बळजबरीने काढून घेतली. याप्रकरणी पिडित महिलेच्या फिर्यादीवरून परळी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पो.नि.आरती जाधव करत आहेत.
No comments:
Post a Comment