गेवराई (प्रतिनीधी ): जमिनीचा ताबा घेण्याच्या कारणावरून एका जणावर शस्त्राने हल्ला केल्याची घटना आज सकाळी बगेवाडी शिवारात घडली. यात जखमी झालेल्या इसमास उपचारार्थ बीड येथे दाखल करण्यात आले. घटनास्थळी तलवाडा पोलिस दाखल झाले होते. या प्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
बगेवाडी येथे गेल्या काही दिवसापासून जमिनीचा वाद विवाद सुरू आहे. आज सकाळी खलील मशायक (वय ४०) हा व्यक्ती शेतामध्ये गेला होता. शेतामध्ये गेल्यानंतर समोरच्या काही लोकांनी त्याच्या धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात तो गंभीर रित्या जखमी झाला. त्याला उपाचरार्थ बीडच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनास्थळी तलवाडा ठाण्याचे एपीआय सुरेश उनवणेसह कर्मचारी दाखल झाले होते.
No comments:
Post a Comment