बीड (प्रतिनीधी )- बीड शहरातील जुना नगरनाका भागात राहणारे ५० वर्षीय पोलिस कॉन्स्टेबल सध्या अंमळनेर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते म्हणून ते तेथील पीआय यांना सुट्टीबाबत विनंती करत होते. पीआय यांनी ‘तुमच्या स्वॅबची तपासणी करून नंतर सुट्टीवर जा’, असे सांगितले. जेव्हा संबंधित पोलिसाचा स्वॅब घेण्यात आला तेव्हा ते पॉझिटिव्ह आल्याने पोलिस ठाण्यातही खळबळ उडाली. संबंधित पोलिसाच्या संपर्कात आलेल्या अन्य पोलिस कर्मचार्यांना क्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पिंपळवंडी (ता. पाटोदा), अंमळनेर पोलिस स्टेशनसह परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. या भागात पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे
No comments:
Post a Comment