Tuesday, March 10, 2026

अवैध पद्धतीने साठवलेल्या गुटखा गोदामा वर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा दीड लाखाच्या मुद्देमालासह आरोपीस अटक.


बीड(प्रतिनिधी) पत्र्याच्या शेडमध्ये अवैध पद्धतीने साठवलेल्या बशीरगंज परिसरातील गुटखा गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून दीड लाखाचा मुद्देमालासह व आरोपीस अटक केली आहे.

शहरातील बशीरगंजमध्ये शेख इरफान जब्बार रा. जुनी भाजी मंडई बुंदेलपुरा, बीड याने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी सलमान रफिक बागवान रा. बशीरगंज, बीड याच्या सांगण्यावरून स्वतःच्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच सोमवारी दुपारी या ठिकाणी छापा मारला. या छाप्यामध्ये एक लाख साठ हजार 240 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला. यावेळी शेख इरफान या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. तर सलमान रफिक बागवान हा फरार झाला आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. युनूस बागवान, गोविंद राख, अंकुश वरपे, स्वाती मुंडे, अशपाक सय्यद, मनोज परजणे, बबन सलगर, चालक नितीन वडमारे यांनी केली.

No comments:

Post a Comment