Tuesday, March 10, 2026

बीड मध्ये दिव्यांगांसाठी तीनचाकी स्कूटर ची 'इन कॅमेरा' सोडत.डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी ११ वाजता होणार.


बीड (प्रतिनिधी) जिल्हा           परिषद  बीड अंतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी ५% दिव्यांग कल्याण निधीतून राबविण्यात येणाऱ्या तीनचाकी स्कूटर वाटप योजनेची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ‘इन कॅमेरा’ पद्धतीने सोडत (लॉटरी) काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रारंभी १३ जानेवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार २३ जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, अनेक दिव्यांग संघटना आणि लाभार्थ्यांच्या मागणीचा विचार करून ही मुदत २ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले असून, गटविकास अधिकाऱ्यांनी १८ फेब्रुवारीपर्यंत हे सर्व अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर केले आहेत. उत्पन्न प्रमाणपत्र किंवा यूडीआयडी कार्ड नसणे, केवळ अस्थिव्यंग प्रवर्ग अपेक्षित असताना इतर प्रवर्गातून अर्ज करणे, ऑनलाइन प्रमाणपत्र नसणे आणि वयोमर्यादा ५० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यांना दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले आहे. त्यामुळे त्रुटींची पूर्तता झाल्यास पात्र अर्जांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सदरील सोडत बीड शहरातील नगर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

अर्जांची सद्यस्थितीएकूण पात्र अर्ज: ७२२अपात्र अर्ज : ४६२

No comments:

Post a Comment