बीड (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विवाहितेचे राहत्या घरातून अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला, इतकेच नव्हे तर अत्याचारानंतर पीडितेला गावच्या चावडीत बांधून ठेवून आरोपी फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दोन दिवस दहशतीचे सावट.
सकाळी शुद्धीवर आल्यावर पीडितेने मदतीसाठी याचना केली. मात्र सुरुवातीला तिला कोणाकडूनही दाद मिळाली नाही. नंतर नातेवाईकांनी तिला मुक्त करून घरी नेले. आरोपीच्या भीतीपोटी पीडितेने दोन दिवस ही घटना गुपित ठेवली होती. अखेर, धैर्य एकवटून पीडितेने आई व मामासोबत पिंपळनेर पोलिस ठाणे गाठून वैभव पटेकर या व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस आणि पिंक पथक तपास करत आहेत.
या प्रकरणाचा व्हिडिओ पिंपळनेर परिसरात व्हायरल झाला होता. याची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मधुसूदन घुगे यांनी संशयित असलेल्या वैभव पटेकर याला ताब्यात घेतले. त्यानंतर पीडिताही नातेवाईकांसह ठाण्यात आली. त्यांनी तक्रार देताच पटेकर याला अटक करण्यात आली.
आरोपीला अटक केली आहे. पिंपळनेर पोलिस आणि पिंक पथक याचा तपास करत आहोत.- मधुसूदन घुगे, सहायक पोलिस निरीक्षक, पिंपळनेर
No comments:
Post a Comment