गेवराई (प्रतिनिधी) : "श्री. गोरकर सर आणि श्रीराम शेळके यांनी माझा फेब्रुवारीचा पगार बंद केला, त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला आहे. हे दोन व्यक्ती माझ्या संसाराला कारणीभूत आहेत..." अशी हृदयद्रावक सुसाइड नोट लिहून अर्धामसला येथील एका ५५ वर्षीय शिक्षकाने आपले जीवन संपवले. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, याप्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुसाइड नोटमध्ये नावांचा उल्लेख.
पोलिसांना मिळालेल्या पहिल्या चिठ्ठीत उघडे यांनी पगार बंद झाल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे, तर दुसऱ्या चिठ्ठीत "गोरकर सर आणि श्रीराम शेळके हे माझ्या संसाराच्या विनाशाला कारणीभूत आहेत," असा गंभीर आरोप केला आहे. आर्थिक कोंडी आणि मानसिक त्रासामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे.
No comments:
Post a Comment