यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईची भीषणता आतापासून जाणविण्यास सुरवात झाली आहे. बीड जिल्ह्यात देखील याची दाहकता अधिक जाणवत आहे. अनेक गावांमध्ये ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. बीड तालुक्यातील जवळपास 60 गावांचे टँकर प्रस्ताव प्रशासनाकडे आतापर्यंत आले असून, गेवराई तालुक्यातील 40 गावांचे प्रस्ताव येण्याच अंदाज आहे. तर माजलगाव तालुक्यातून अन अंबाजोगाई 5, परळी 5, केज 4, धारूर 3, शिरूर कासार 10, आष्टी 5 व पाटोदा तालुक्यातून 8 प्रस्ताव येण्याचा अंदाज आहे.
बीड जिल्ह्यात पाणी टंचाई जनविण्यास सुरवात झाली असून ही दाहकता अधिक वाढण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. यात पुढील महिन्याच्या शेवटी वाढ होण्याचा अनुमान आहे. त्यानुसार पाहणी करून परिस्थितीनुसार टँकर मंजुरीबाबत निर्णयाची कार्यवाही होणार आहे; अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment