Wednesday, March 27, 2024

धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना नोटीसा; कार्यालयीन वेळेत राहतात गैरहजर.रुग्णांची गैरसोय.

धाराशिव :(प्रतिनिधी) वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यालयीन वेळेत गायब असलेल्या डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील अशा ३ डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याचा खुलासा लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश देण्यात आले. 
धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामानिमित्त वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकूंडवार आणि प्रशासकीय अधिकारी उदयकुमार पाद्य हे २२ मार्च रोजी बाहेरगावी होते. याची माहिती मिळताच काही डॉक्टरांसह कर्मचारी दिवसभर गायब झाले होते. यामुळे कार्यालयीन कामकाजासह रुग्णांची गैरसोय झाली होती. या कारणाने डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. 

तर प्रशासकीय कारवाई 

मनमानी रोखण्यासाठी वैद्यकीय अधिष्ठाता व प्रशासकीय अधिकारी मुंबई येथून आल्यावर महाविद्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. यामुळे डॉक्टरांसह काही कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदर कारणे दाखवा नोटीस संदर्भात तसेच खुलासा समाधानकारक नसेल तर त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे नोटीस मध्ये म्हटले आहे.


No comments:

Post a Comment