Monday, January 15, 2024

लातूर जिल्ह्यात १५ दिवसांत ६ खून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस यंत्रणेला कडक शब्दात अक्षरश: झापले.


लातूर (प्रतिनिधी) लातूर काही दिवसापुर्वी डीपीडीसीच्या ऑनलाईन बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस यंत्रणेला लातूरचा बिहार होऊ देऊ नका अशा कडक शब्दात अक्षरश: झापले होते. पण जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून नुतन वर्षाच्या सुरूवातीलाच तीन खुनाने हादरलेल्या लातूर जिल्ह्यात नुतन वर्षातील दुस-या आठवड्याचा शेवट ही तिन खुनानेच झाला आहे. १५ दिवसांत जिल्ह्यात ६ खुन झाले. खुनांची नुतन वर्षातील सुरु असलेली मालिका पाहता लातूर जिल्ह्याचा बिहारच होतोय असे आता प्रत्येक जण अपसूक पणे बोलून जातो आहे.

नुतन वर्ष २०२४ च्या सुरुवातीला पहिल्याच आठवड्यात लातूर शहरातील मुकड्या नामक गुंडाचा, तर दुस-या घटनेत रेणापूर तालुक्यातील बेपत्ता झालेल्या तरुणाचा त्याच्या पत्नीने व तीच्या अल्पवयीन प्रियकराने खुन केल्याची तर तिस-या घटनेत जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा भोसकून खुन केल्याची घटना औसा तालुक्यात घडली होती. या खुनाचा उलगडा होतानाच नुतन वर्षाच्या दुस-या आठवड्याच्या शेवटी शनिवारी जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथे महेश उत्तम सूर्यवंशी व त्याचा चुलत भाऊ विकास शिवाजी सूर्यवंशी या भावंडाचा गावातीलच पाच जणांनी छातीत व पोटात चाकूने सपासप वार करुन खुन केल्याची तर याच दिवशी उदगीर तालुक्यातील कुमठा खु, येथील शाळकरी अल्पवयीन मुलगा संतोष गोविंद घुगे याचा निर्घृण खुन कल्याची घटना समोर आली. या घटंनामुळे जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.

पहिल्या आठवड्यातील तीन खुनानंतर डीपीडीसीच्या ऑनलाईन बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस यंत्रणेला लातूरचा बिहार होऊ देऊ नका, अशा कडक शब्दात अक्षरश: झापले होते. पण पुन्हा तीन खुनांच्या घटना घडल्याने जिल्ह्यात भयभीत झालेला प्रत्येक जण जिल्ह्यात सुरु असलेल्या खुनाच्या मालीकेबद्दल बोलताना जो तो लातूरचा बिहार होतोय असेच बोलतोय.

No comments:

Post a Comment