मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे आडागळे यांच्या राहत्या घरची भिंत पाण्यात पूर्णपणे भिजली होती. आज सुमन आडागळे या चुलीपुढं काम करत असतांना त्यांच्या अंगावर भिंत कोसळली.
यावेळी पती शेषेराव आडागळे यांनी त्यांना बाहेर काढून गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी बीड येथे पाठवल्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. दरम्यान या दुर्दैवी घटनेने धोंडराई आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment