गोमळवाडा (ता. शिरूर) येथील रहिवासी गणेश कातखडे यांची मुलगी वैष्णवी हिच्या शाळेला सुटी लागली होती. यामुळे सुटीत बीड तालुक्यातील मोची पिंपळगाव येथे मामाच्या गावाला गेली होती. मामाने तिच्यासाठी घरासमोरील अंगणात साडीचा झोका बांधला होता. दरम्यान वैष्णवी झोके घेत असताना साडीला पिळ बसला आणि तिचा गळा आवळला गेला. यामध्ये तिचा श्वास गुदमरला आणि यातच तिचा मृत्यू झाला. आपली मुलगी मृत्युमुखी पडल्याचे कळताच वैष्णवीच्या आईने हंबरडा फोडला.
कुटुंबाला बसला धक्का
वैष्णवी ही मानूरकर महाराज इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. आता ती दुसरीतून तिसरीत गेली होती. वैष्णवीला एक लहान बहीण असून ती शाळेसह घराला आणि गावालाही चटका लावून गेल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment