Wednesday, May 31, 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्याच्या पुतळ्यास ठक्कर, धर्माधिकारी,प्रा.दुबे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ येथील श्री वैजनाथ मंदिर येथे आज बुधवार दिनांक31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती ढोल ताशाच्या गजरात भंडारा उधळत उत्साहात साजरी करण्यात आली. 
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे )बीड उप जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा. अतुल दुबे सर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
याप्रसंगी बोलताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता,पराक्रमी योद्धा,आणि सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या, होळकर घराण्याचा 'तत्वज्ञानी राणी ' म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या अश्या ह्या महाराणी राजमाता होत्या असे सांगितले.
बाजीराव भैया धर्माधिकारी म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला, एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता,पराक्रमी योद्धा,आणि सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या, होळकर घराण्याचा 'तत्वज्ञानी राणी ' म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या होत्या असे सांगितले.
प्रा.अतुल दुबे म्हणाले की,ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर होत्या.सर्वधर्मसमभाव ,अस्पृश्यता उच्चाटन ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क ,प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला होता असे सांगितले.
यावेळी माजी शहर संघटक संजय कुकडे,माजी नगरसेवक अनिल अष्टेकर,वैजनाथ सोळंके,जालिंदर नाईकवाडे, उपशहर प्रमुख किशन बुंदेले, तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, शिवाजीनगर  विभाग प्रमुख सुरेश परदेशी, प्रा. उद्धव मुळे,अमित कचरे, योगेश जाधव,जगदीश पवार, योगेश घेवारे, व्यंकटेश चव्हाण, सचिन लोढा, रवि देवकर, लक्ष्मण बोले, रघुनाथ बोले, शंकर गवते, राजाभाऊ गवते,अनिल बोले, आकाश गाडे, रवि बोले, अनंत बोले, सोमनाथ गवते, गणेश जावडे, गणेश होळकर, भगवान बोले, सुरेश होळकर, प्रकाश देवकर, लक्ष्मण मुंडे हे उपस्थित होते.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त कर्तुत्ववान महिलांन चा सन्मान.

वरोरा (प्रतिनिधी):- राजमाता अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम होत्या. पराक्रम, प्रशासन आणि प्रजाहितवादी कार्याची सांगड घालून त्यांनी आदर्श शासक म्हणून लौकिक प्राप्त केला. त्यांनी केलेले न्यायिक व सामाजिक कार्य आजही प्रेरणादायी आहे असे अभिजित कुडे म्हणाले .                    
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभाराने प्रजाहितदक्षतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी स्त्रीशिक्षण, हुंडाबंदी, पर्यावरण रक्षण असे सुधारणावादी तसेच ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या योजना, प्रकल्प जाणीवपूर्वक राबविले. नदीचे घाट, वाटसरूंसाठीच्या धर्मशाळा, मंदिरांची उभारणी-त्यांचा जिर्णोद्धार अशा अनेक गोष्टी आजही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत उभ्या आहेत असे प्रतिपादन ग्राम सेवक पंकज थुल यांनी केले व उपस्थित महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल माहिती दिली. 
आदर्श गाव उखर्डा  येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.   महिला व बालकल्याण  मध्ये  उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व 500 रुपये धनादेश देवून सत्कार करण्यात आला.  ग्राम पंचायत उखर्डा येथे ग्राम सेवक पंकज थुल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.  आशा वर्कर्स उखर्डा सौ.  नंदाबाई  रमेश  कुडे , आशा वर्कर्स केळी  सौ. मायाताई  सागर ढोके  यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी राजकुमार नगराळे,  सागर तिजारे,  मंदाताई  उसरे, दुर्गाताई  हिवरकर , कोल्हे मॅडम व महिला उपस्थित होत्या. .

हातावर 'स्नेहा' नावाचे टॅटू असलेल्या अनोळखी इसमाचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडेखेल शिवारात राम नगर तांड्याजवळ मंगळवारी रात्री तरुणाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृताची अद्याप ओळख पटली नसून पोलीस तपास करत आहेत.

माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. अद्याप मृताची ओळख पटली नाही. मृताच्या अंगात निळी जीन्स पॅन्ट, बदामी रंगाचे शर्ट व कमरेला बेल्ट, पायात बुट आहे. तसेच हातावर स्नेहा नाव गोंदविलेले आहे. हा प्रकार खुनाचा असावा, तसेच मृत इतर ठिकाणाचा रहिवासी असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

पोलिसांनी सुरू केले ओळख पटविण्यासाठी प्रयत्न.

आंबाजोगाईच्या  अपर पोलीस अधीक्षक कविता  नेरकर , उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले ,  परळी ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री सुरेश चाटे  यांच्या मार्गदर्शनाखाली   सपोनी  नारायण गीते , पोउपनि  गणेश झांबरे, हवालदार केकान, पोलिस नाईक नवनाथ हरगावकर, सुनील अन्नमवार, येरडलावार, एकुलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णाची वार्डातच आत्महत्या.

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक ६ मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांनी खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बाळू बहिर (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. 

बाळू बहिर हे गेल्या काही दिवसांपासून किडनी निकाम्या झाल्याच्या आजारावर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. आजाराने त्रस्त असल्याने ते नैराश्यात गेल्याने त्यांनी हे कृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री कधी आत्महत्या केली हे कोणाच्या लक्षात आले नाही. सकाळी राउंडसाठी नर्स गेल्या असता त्यांच्या निदर्शनास ही घटना आली.
वार्डात रुग्णाने आत्‍मत्‍या केल्‍यामुळे खळबळ उडाली असून आत्महत्या करताना हॉस्पिटलमधील कर्मचारी स्टाफने पाहिले कसे नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान यावरून जिल्हा रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

नातीसमोरच सासऱ्याने सुनेला क्रूरपणे संपवलं.अनैतिक संबंधांना विरोध केल्याने हत्या.

पुणे (प्रतिनिधी) : सासऱ्याने नातीसमोरच सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाफगाव येथे ही घटना घडली आहे. अनैतिक प्रेम संबंधाना सुनेचा विरोध असल्याने सासऱ्यांना तिचा अशा पद्धतीने काटा काढला आहे.

दिनकर कोळी असं आरोपी सासऱ्याचं नाव आहे. दिनकर कोळी याचे एक महिलेशी अनैतिक प्रेम संबध होते. या प्रेम संबधांना सुनेने वारंवार विरोध केला होता. मात्र सुनेचा विरोध सासऱ्याला मान्य नव्हता. 

दरम्यान याच रागातून सासरा दिनकर कोळी याने घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत सुनेची हत्या केली. आपल्या चिमुकल्या नातीच्या समोरच सून मेघा कोळी हिच्या तोंडात बोळा कोंबून गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी दिनकर कोळी याच्यावर राजगुरुनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tuesday, May 30, 2023

बीडमध्ये रस्ता रुंदीकरणामुळे 100 वर्ष जुन्या झाडांवर चालणार कुऱ्हाड!


बीड (प्रतिनिधी) : सार्वजनिक आणि खाजगी ठिकाणी झाडे लावायचे फार मोठे महत्त्व आहे. देशभरामध्ये शासन स्तरावरून दरवर्षी करोडो रुपये झाडे लागवडीसाठी खर्च केले जातात. मात्र सध्याच्या विकासाच्या काळामध्ये अनेकदा झाडांची तोडणी देखील केली जाते. आता बीड जिल्ह्यातील नगर रस्त्यावरील एक दोन नव्हे तर तब्बल 372 झाडांचा रस्ता रुंदीकरणामुळे बळी जाणार आहे.

रस्ता रुंदीकरणासाठी हिरवा कंदील. 

बीड - नगर या रस्त्यावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. पुण्याला जाणं असो की मुंबईला सर्वाधिक बीड जिल्हावासिय मागील अनेक वर्षांपासून याच राज्य महामार्गाचा वापर करत आलेले आहेत. मात्र मागील दीड वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली होती. हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी अनेकदा आंदोलन देखील झाली. मात्र त्यानंतर राज्य शासनाने या रस्ता रुंदीकरणासाठी आता हिरवा कंदील दाखवलाय.

मोठ्या प्रमाणात वृक्षतोड

या रस्त्याच्या रुंदीकरण दरम्यान बीड नगर रस्त्यावरील दूर्मिळ झाडे तोडली जाणार आहेत. नगर रोडच्या रुंदीकरणाचे काम काही दिवसात सुरू होणारा असून यात नवगण राजुरी फाट्या नजदीक गर्द सावली देणाऱ्या वडांच्या झाडावरही पहिली कुराड चालवली जाणार आहे. शिरापूर फाटा ते जरूड फाट्यापर्यंत 372 झाडांचा रस्ता रुंदीकरणामुळे बळी जाणारे आहे.

असं होणार रस्ता रुंदीकरण

काही दिवसातच या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होणे अपेक्षित असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चराटा पाट्यादरम्यान दोन्ही बाजूंनी 12 मीटर रस्ता होणार आहे. यामध्ये 10 मीटर काँक्रीट असून 2 मीटर डांबरी रस्ता होणार आहे. तसेच ड्रेनेजही केले जाणार असून त्यावरील स्लॅबचा फुटपाथ म्हणून वापर होऊ शकेल. चर्होटा फाट्यापासून पुढे हा रस्ता 7 मीटर असून नुतीकरणानंतर 10 मीटर होणार आहे. वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या या रोडचे नुतनीकरण व सुसज्ज असे रुंदीकरण होणार असल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त केले जाते.


पर्यावरण प्रेमींचे म्हणणे काय ?

पर्यावरण प्रेमी शिवराम घोडके यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून नेहमी प्रवास करणाऱ्यांचे अगदी घनिष्ठ मित्र झालेले प्रसिद्ध अशी वडाची झाडे मात्र रुंदी कारणामुळे तोडावी लागणार आहेत. नगर बीड या राज्य महामार्ग वरील 372 झाडांची तोडणी झाल्यानंतर 744 झाडे पुन्हा लावणार आहेत. मात्र यामधील शंभर वर्षांपेक्षा अधिक महा वटवृक्ष लावणे शक्य नाही. कारण हा वृक्ष वाढायला एक मोठा कालावधी लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने या झाडांचे रिप्लांटेशन करने गरजेचे आहे. जेणेकरून हे घनदाट सावली देणारे वृक्ष लवकर वाढीस येऊन पुन्हा एकदा गर्द सावली देतील.

टाळ्या वाजवून पैसे मागितले, परीक्षा दिली अन् यश मिळवले, तृतीयपंथीय सेजलची भरारी.

नांदेड (प्रतिनिधी) : समाजात तृतीयपंथी यांना दुजाभावाची वागणूक मिळते. ते जवळ आले की नागरिक त्यांच्याकडे डोळे वटारत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो. मात्र अशाही परिस्थितीत आयुष्याशी संघर्ष करत नांदेड शहरातील एका तृतीयपंथीयाने बारावीच्या परीक्षेत ६२ टक्के गुण प्राप्त करत यश मिळवलं आहे. या तृतीयपंथीयाच्या यशाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अमोल सर्जे उर्फ सेजल असं या तृतीयपंथीयाचं नाव असून एक ट्रान्स वुमेन आहे.
अमोल उर्फ सेजल ही काही वर्षांपासून तरोडा भागात आपल्या गुरू सोबत वास्तव्यास आहे. इतर तृतीयपंथीयांप्रमाणे तो टाळ्या वाजवून आपला उदरनिर्वाह करते. अशा परिस्थितीतही सेजलने आपलं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पहिली ते १०वी पर्यंत त्याचं देगलुरला शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर अकरावी आणि बारावीपर्यंतचं शिक्षण आश्रमशाळा शिवजी तांडा जळकोट येथे पूर्ण केलं.

नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत अमोल याने ६२ टक्के गुण प्राप्त केले. विशेष म्हणजे कुठलंही खासगी शिकवणी न लावता त्याने हे यश गाठलं आहे. बारावी परीक्षेत यश संपादन करणारी सेजल ही मराठवाड्यातील पहिली तृतीयपंथीय असल्याचा दावा केला जात आहे.

वयाच्या सतराव्या वर्षी ट्रान्सजेंडर

सेजल आधी अमोल होता. अमोल मुलगा होता पण त्याचे हावभाव मात्र तृतीयपंथीयासारखे होते. त्यामुळे त्याने वयाच्या सतराव्या वर्षी लिंग परिवर्तन केलं. या शस्त्रक्रियेनंतर त्याने आपलं नाव बदलून सेजल असं ठेवलं. परीक्षा काळात सेजलला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र लोक काय म्हणतील, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा राहील या गोष्टीची पर्वा न करत तिने बारावीची परीक्षा दिली आणि त्यात तिने यश देखील मिळवलं. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. 
एकीकडे समाजात वेगळी वागणूक मिळत असताना शासनाच्या वतीने त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तृतीयपंथीयांच्या उत्कर्षासाठी सुविधा केंद्र चालविण्यासाठी दिले आहे. त्यातच आता नुकताच बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सेजलने पोलीस दलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
एकीकडे समाजात वेगळी वागणूक मिळत असताना शासनाच्या वतीने त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तृतीयपंथीयांच्या उत्कर्षासाठी सुविधा केंद्र चालविण्यासाठी दिले आहे. त्यातच आता नुकताच बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सेजलने पोलीस दलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तीस दिवसात रोखले तब्बल ३७ बालविवाह बीड जिल्ह्यात मे महिन्यात प्रशासनाकडून काम.

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह होत असल्याची नोंद शासन दरबारी आहे. हीच वाढत असणारी आकडेवारी  कमी करण्यासाठी प्रशासन आणि चाईल्ड लाईन कामाला लागले आहेत. या मे महिन्याच्या ३० दिवसांमध्ये तब्बल ३७ बालविवाह रोखण्यात चाईल्ड लाईन आणि प्रशासनाला यश आले आहे
सध्या ऊस तोडीवरून कामगार हे आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे बालविवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आता प्रशासन हे चाईल्ड लाईनच्या मदतीने ग्राउंडवर फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिथं माहिती मिळेल तिथं जाऊन संबंधित पालकांचे समुपदेशन करून हे होणारे बालविवाह रोखण्यात येत आहेत.

आजही रोखला विवाह

बीड जिल्‍ह्यात आज देखील एक होणारा बालविवाह चाईल्ड लाईनचे तत्त्वशील कांबळे आणि ग्रामसेवकाने रोखला आहे. दरम्यान बालविवाहाची भीषणता बीड जिल्ह्यात पाहायला मिळत असताना आता बालविवाह रोखण्यात प्रशासनाने चाईल्ड लाईनच्या मदतीने पाऊल उचललं असल्याने बालविवाहाची आकडेवारी कमी होण्याची शक्यता आहे.

Monday, May 29, 2023

आरोप सिद्ध करावा, अन्यथा राजीनामा द्यावा.पालकमंत्री अतुल सावेंचे आमदार आजबेंना खुले आव्हान

बीड (प्रतिनिधी) : बीडचे पालकमंत्री निधी देण्यासाठी टक्केवारी घेतात. असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी केला होता. त्यावर आता मंत्री अतुल सावेंनी त्यांना खुले आव्हान दिलं आहे. तुम्ही आरोप सिद्ध करा, अन्यथा पदाच राजीनामा द्यावा; असं म्हणत अतुल सावे यांनी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांना पत्रक काढत खुलं आव्हान दिलं आहे. 
मंत्री अतुल सावे यांनी या काढलेल्या पत्रकात म्हटले, की आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी बिनबुडाचे आरोप राजकीय आकसातून केले आहेत. पालकमंत्री म्हणुन बीड जिल्ह्यात कामे करतांना सर्व आमदारांना विकास निधीचे वाटप केले आहे. विकास निधी देतांना आम्ही राजकिय दुराग्रह केला नाही. या उलट अजबे यांची सत्ता असतांना आमच्या आमदारांना विकास निधी मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

बीडच्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राला भीषण आग; 1 हजार दुर्मिळ झाडे जळून खाक.

बीड (प्रतिनिधी) : बीडच्या शिरूर तालुक्यात असणाऱ्या पाडळी येथील सर्पराज्ञी वन्यजीव प्रकल्पाला भीषण आग लागली होती. या लागलेल्या भीषण आगीत दुर्मिळ असणारी 400 प्रजातीची, तब्बल 1000 झाडे जळून खाक झाले आहेत.
त्याचबरोबर प्रकल्पात असणारे काळवीट, ससे, रानडुकरे, मुंगूस यासह दोन गाई होरपळल्या आहेत. यासह परिसरात असणारे ठिबक, तुषार संच, सोलर देखील जळून खाक झाले आहे.

तर ही अचानक लागलेली भीषण आग सर्पराज्ञी परिसरात शेती असणाऱ्या शेतकरी सुदाम लव्हाळे यांच्या निष्काळजीपणामुळे लागल्याचं समोर आलंय. शेतकरी सुदाम लव्हाळे यांनी त्यांचा बांध पेटवला होता.

या दरम्यान अचानक जोरदार वारा आल्याने ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली. बघता बघता रौद्र रूप घेतलेल्या या आगीने सर्पराज्ञी परिसराला आग लागली. यामध्ये ही दुर्घटना घडल्याचं सर्पराज्ञी वन्यजीव प्रकल्पाचे संचालक सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितले. 


रामेश्वर महाराज कोकाटे यांची कन्या बाल किर्तनकार ह.भ.प.जनाई महाराज कोकाटे यांचे किर्तन.भाविक भक्तांनी लाभ घ्यावा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) प.पू.गुरूवर्य श्री ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज चाकरवाडीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त किर्तन महोत्सवात बाल किर्तनकार ह.भ.प.कु.जनाई महाराज कोकाटे यांचे दि.1 जुन रोजी धडाकेबाज किर्तन होणार आहे. संगम येथील रामेश्वर महाराज कोकाटे यांची कन्या असून प्रसिद्ध किर्तनकार आहे. परळी शहरातील औ.वसाहत सभागृहात संध्याकाळी 8 ते 10 वेळेत होणार आहे. सर्वात कमी वयाची असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी किर्तनाचा लाभ घ्यावा. या किर्तन महोत्सवाला अनेकांचे किर्तन होणार आहे. 
तरी या किर्तन महोत्सवाला व अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहण्याचे आवाहन दै.मराठवाडा साथी, बियाणी परिवार व अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य वीर सावरकर जयंती साजरी.वीर सावरकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज -प्रा.अतुल दुबे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारत राष्ट्र, भारतातील जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे ही राष्ट्र निर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब आहे. आज देशाला स्वा. सावरकरांच्या विचारांची आवश्यकता असून, नव्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक तथा जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अतुल दुबे यांनी व्यक्त केले.
जय महाराष्ट्र प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित वीर सावरकर जयंती  रविवार दिनांक 28 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रा.अतुल दुबे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे श्री दुबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करत अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रा.अतुल दुबे  म्हणाले, गावांमध्ये अस्पृश्यता पाळली जाते. भारतातून ही जातीयता जेव्हा नष्ट होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज, राष्ट्र सुस्थिर होईल. भारतीय जातीव्यवस्था, अस्पृश्यता निर्मूलनासाठी स्वा. सावरकर यांनी रत्नागिरीत केलेली कार्ये अत्यंत महत्वाची आणि गौरवपूर्ण आहेत. स्वा. सावरकर यांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत ही राष्ट्रीय परिषद होत आहे, ही उल्लेखनीय गोष्ट आहे. स्वा. सावरकर हे सामाजिक समतेचे मोठे पुरस्कर्ते होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे बबन ढेंबरे, अमित कचरे,सचिन लोढा, बजरंग औटी,मनिष जोशी,लक्ष्मण मुंडे,योगेश घेवारे, सिद्धार्थ गायकवाड,माऊली मुंडे, नरेश मैड,योगेश जाधव, प्रकाश देवकर, जगन्नाथ तुपसौंदर, सोमनाथ गायकवाड, पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर, आकाश जाधव, जगदीश पवार, विकास देवकर, आदींनी परिश्रम घेतले.

पोहण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू,

माजलगाव (प्रतिनिधी) : मित्रासह विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा श्वास रोखल्याने मृत्यू झाला आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या पुंगणी परिसरात ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे.
साई सयाजीराव सौंदर वय 15 असं मयत मुलाचे नाव आहे. पुंगणी येथील साई सौंदर हा त्याच्या मित्रांसह त्याच्याच शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. पण त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
दरम्यान या प्रकरणी बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाची गुंडागिरी, तरुणावर जीवघेणा हल्ला.

धारुर (प्रतिनिधी)  : क्षुल्लक कारणावरून भाजप कार्यकर्ता असणारा उपसरपंच बिभीषण बडे यांनी गुंडांकडून कुऱ्हाडी व कोयत्याने तरुणांवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या गावंदरा गावात उघडकीस आला आहे. यात रामप्रभू बडे हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
मारहाण करून हातात कोयता घेवून गावात दहशत निर्माण करणाऱ्याचा व्हिडिओ कैमेऱ्यात कैद झाला आहे. तसेच हा गोंधळ मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
विशेष म्हणजे गावात मिरवणूक सुरू असताना ही मारहाण करण्यात आलीय. पाच ते सात जणांनी कोयत्याने व कुऱ्हाडीने हल्ला केला. यावेळी गावातली काही मंडळी धावल्याने रक्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला सोडून त्यांनी पळ काढला. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री पीडित तरुणाच्या घरावर दगड फेक केली व पळून गेले. दरम्यान या हल्ल्यामुळे कुटुंबात दहशत निर्माण झाली आहे. 

Friday, May 26, 2023

मरणाची खूप घाई केलीस बाळा !थोडा धीर धरायला हवा होता! परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने घेतला गळफास; निकाल मात्र लागला पासचा.


*आपल्या सोबतचे विद्यार्थी पास होतील, मात्र आपणच नापास होऊ या भीतीने बारावीची परीक्षा दिलेल्या एका मुलीने निकालाच्या आदल्या दिवशी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

सेलु (प्रतिनिधी) : आपल्या सोबतचे विद्यार्थी पास होतील, मात्र आपणच नापास होऊ या भीतीने बारावीची परीक्षा दिलेल्या एका मुलीने निकालाच्या आदल्या दिवशी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

सदरील घटना परभणीच्या सेलू शहरांमध्ये घडली आहे. संयुक्ता बालाजी उबाळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. संयुक्ताने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा बारावीचा निकाल आला यामध्ये ती पास असल्याचं समोर आलं.

या घटनेमुळे उबाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मूळचे हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील बालाजी उबाळे हे आपल्या परिवारासह दहा वर्षांपूर्वी सेलू शहरात स्थायिक झाले होते.

त्यांची मुलगी संयुक्ता उबाळे शेलू शहरातील नूतन महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. नुकतीच पार पडलेली बारावीची परीक्षा तिने दिली होती. परीक्षेदरम्यान तिची तब्येत ठीक नसल्याने तिला रुग्णालयात देखील नातेवाईकांनी नेहमी होते.

नुकत्याच दिलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये आपल्या सोबतचे विद्यार्थी पास होतील आणि आपणच नापास होऊन अशी भीती तिच्या मनामध्ये काही दिवसापासून होती. शिक्षण विभागाने बारावीचा निकाल 25 मे ला जाहीर होणार असल्याची घोषणा केली.

आपण बारावीच्या परीक्षेमध्ये नापास होणार या चिंतेत असलेल्या संयुक्ता उबाळे हिने 24 मे रोजी सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहते घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. मुलीने आत्महत्या केली असल्याची बाब बाहेरून घरी परतल्यानंतर आईच्या लक्षात आली त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

याप्रकरणी बालाजी उबाळे यांनी सेलू पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे दुसऱ्या दिवशी बारावीचा निकाल लागल्यानंतर संयुक्ता उबाळेही बारावीच्या परीक्षेमध्ये पास झाली होती.

घटनेची माहिती मिळताच शेलु पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तर मयत मुलीचे शेलु उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. या घटनेमुळे उभाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त


३७२ उत्तरपत्रिकांत सारखे हस्ताक्षर प्रकरणात दोघां प्राध्यापकांनवर गुन्हा.



*भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांत हस्ताक्षर बदल प्रकरणाने १५ दिवसांपासून विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून दिली. 

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) बोर्डाची झोप उडवून टाकणाऱ्या त्या ३७२ उत्तरपत्रिकांचा गुंता अखेर निकालाच्या दिवशीच सुटला. याप्रकरणी फर्दापूर ठाण्यात सोयगाव तालुक्यातील दोन प्राध्यापकांसह त्यांना मदत करणाऱ्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एका प्राध्यापिकेचाही समावेश आहे, हे विशेष!

याप्रकरणी राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळा (ता. सोयगाव) येथील प्रा. राहुल भगवानसिंग उसारे आणि याच महाविद्यालयाच्या धनवट येथील प्रा. मनीषा भागवत - शिंदे यांच्यासह पडद्यामागील साथीदारांवर ४२०, ४६८, ४६९, ४७१ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांत हस्ताक्षर बदल प्रकरणाने १५ दिवसांपासून विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून दिली. या उत्तरपत्रिका प्रामुख्याने बीड व हिंगोली जिल्ह्यातील आहेत. बोर्ड अधिकाऱ्यांनी ९ ते १३ मे दरम्यान सुमारे ४००हून अधिक विद्यार्थ्यांची सुनावणी घेतली. विद्यार्थी व पालकांनी या प्रकरणाशी आमचा कसलाही संबंध नसल्याचे चौकशीदरम्यान लेखी दिले. त्यानंतर बोर्डाने केंद्र संचालक, कस्टोडियन, पर्यवेक्षकांची चौकशी केली. तरीही या प्रकरणाच्या मुळापर्यंत बोर्डाला पोहोचता आले नाही. त्यानंतर यापैकी ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखेच हस्ताक्षर असल्याचा निष्कर्ष तदर्थ समितीने काढला आणि संपूर्ण यंत्रणाच हादरून गेली. उत्तरपत्रिकांना नेमके पाय फुटले कसे व कोठून, उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडला की, त्याच्या संमतीने दुसऱ्याने कोणी उत्तरे लिहिली, हे सारेच प्रश्न अनुत्तरीत होते.

दरम्यान, प्रा. राहुल उसारे आणि प्रा. मनीषा शिंदे यांच्याकडे या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी देण्यात आल्या होत्या. १३ मार्चपर्यंत या उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे आदेश असताना या दोघांनी त्यानंतर तब्बल २५ दिवस त्या स्वतःकडे ठेवून घेतल्या. नंतर ८ एप्रिल रोजी त्या बोर्डाकडे जमा केल्या. बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिकांत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचा हा प्रसंग समोर आला. दरम्यान, या प्रकारामुळे त्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अनिश्चितता व्यक्त होत होती. मात्र, बोर्डाने हस्ताक्षरातील मजकूर वगळून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केलेे व त्यांचा निकाल जाहीर केला.

आता पोलिस या उत्तरपत्रिकांत का, कशासाठी आणि कोणी उत्तरे लिहायला लावली, याचा शोध घेतीलच. परंतु, या प्रकरणात संशयाची सुई थेट विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा जाऊ शकते. त्यामुळे या दोन शिक्षकांशिवाय अनेक लोक या प्रक्रियेत सहभागी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मोठी बातमी ! बीडमध्ये रात्री 10 नंतर हॉटेल्स, दुकानं बंद राहणार!

बीड (प्रतिनिधी) : बीडमधील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बीड शहरात रात्री 10 नंतर एकही दुकान, हॉटेल अथवा इतर आस्थापना उघड्या ठेवू नयेत, असे आवाहन बीड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
रात्री 10 नंतर पोलिसांकडून गस्त सुरू करून दुकाने बंद करण्यासंदर्भात आवाहन केले जात आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी बीड शहरात किरकोळ वादामधून जातीय वळून देण्याचा प्रयत्न केला होता.
यामुळे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या सूचनेनुसार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रात्री 10 नंतर जिल्ह्यातील हॉटेल, दुकाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या सूचनेचे पालन केले नाही, तर दंड अथवा थेट फौजदारी कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान या निर्णयाचे काही लोकांनी स्वागत केले आहे, तर काहींनी विरोध केला आहे. 

सरकारी डॉक्टरांच्या बदल्यांत घोळ; खोटी माहिती भरूनही उपसंचालकांकडून ग्रीन सिग्नल?


*जर याची वेळीच दखल घेऊन दुरूस्ती झाली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

बीड : (प्रतिनिधी) राज्यातील सरकारी डॉक्टरांच्या बदल्या पहिल्यांदाच ऑनलाईन होत आहेत. परंतू यात अनेक डॉक्टरांनी खोटी माहिती भरल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे असे असतानाही कसलीही खात्री न करता उपसंचालकांकडूनही त्याला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. यामुळे या बदल्यांमध्ये ऑनलाईन घोळ झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी उपसंचालक व संचालक कार्यालयातून आर्थिक उलाढाल झाल्याचीही माहिती आहे.

राज्यातील वैद्यकीय अधिकारी (गट अ वर्ग २) या पदाच्या डॉक्टरांच्या ऑनलाईन बदल्या पहिल्यांदाच होत आहेत. यासाठी खासगीतून होणारा खर्च टळल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतू आरोग्य विभागाने आक्षेप नोंदविल्यानंतर २६ मे रोजी अंतीम यादी प्रकाशित करण्यात आली. परंतू यात अनेकांनी खोटी माहिती भरून प्रशासनाची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. शिरूर तालुक्यातील खालापुरी आरोग्य केंद्रात सध्या एकमेव डॉ. संजीवणी गव्हाणे या नियमित वैद्यकीय अधिकारी आहेत. परंतू याच संस्थेत मागील ११ वर्षांपासून कार्यरत असल्याची माहिती एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऑनलाईन अर्जात टाकली आहे. विशेष म्हणजे, यावर कसलाही आक्षेप न नोंदविता लातूर उपसंचालक कार्यालयातून ती पुढे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे उपसंचालक कार्यालयातील कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. असेच प्रकार इतरांनीही केल्याचा आरोप होत असून याची खात्री करावी, अशी मागणी होत आहे.

बीडमधील डॉक्टर आक्रमक.

ज्यांना हा प्रकार समजला त्यांनी याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाला धारेवर धरले. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन तक्रारी करण्याचाही निर्णय घेतला आहे. जर याची वेळीच दखल घेऊन दुरूस्ती झाली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही बीडच्या डॉक्टरांनी दिला आहे. जर असे झाले तर या बदल्यांना पुन्हा स्थगिती येऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.


कोण काय म्हणतंय...

खालापुरी आरोग्य केंद्रात डॉ.संजिवणी गव्हाणे यांच्याशिवाय एकही महिला अधिकारी कार्यरत नाहीत, असे शिरूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गवळी यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते म्हणाले, संबंधित महिला डॉक्टर बीडच्या अस्थापनेवर नाहीत. तर लातूरचे उपसंचाक डॉ.प्रदीप ढेले म्हणाले, आणखी प्रक्रिया सुरूच आहे. जिल्हास्तरावील अस्थापनेला बोलावून त्या अंतीम केल्या जातील. जर असे कोणी खोटी माहिती भरून दिशाभूल केली असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाईल, असे सांगितले.

चुकीचे समर्थन नाही. 

खोटी माहिती भरून प्रशासनाची दिशाभूल करणे चुक आहे. चुकीचे समर्थन आम्ही करणार नाहीत, परंतू असेच प्रकार जिल्ह्यात अथवा राज्यात इतर ठिकाणी झाले आहेत का? याचीही प्रशासनाने तपासणी करावी. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, एवढीच मागणी आहे.- डॉ.नितीन मोरे, कार्याध्यक्ष, मॅग्मो बीड

माझी भूक भागवा म्हणत चालकानेच काढली महिलेची छेड.धावत्‍या ट्रॅव्‍हलमधील धक्‍कादायक प्रकार.

बीड (प्रतिनिधी) : ट्रॅव्हल्समध्ये कुटुंबातील महिलांना पाठवत असाल तर सावधान.. असं म्हणण्याची वेळ सध्या आली आहे. धावत्या ट्रॅव्हल्समध्ये महिलेची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माझी भूक भागवा असं म्हणत ट्रॅव्हल्स चालकाने प्रवासी महिलेची छेडछाड केली आहे. ही संतापघटना गंगाखेड पुणे चालणाऱ्या स्वराज ट्रॅव्हल्समध्ये घडली आहे
पोलीस सूत्रांकडून मिळलेल्या माहितीवरून परळी येथील पीडिता ही सध्या भोसरी (पुणे) येथे राहते. त्या २४ मे रोजी येरवडा पुणे ते (Parali) परळी वैजनाथ असा गंगाखेड पुणे- गंगाखेड चालणाऱ्या स्वराज ट्रॅव्हल्सने प्रवास करत होत्या. यादरम्यान आरोपी चालक दत्ता विठ्ठल मोहिते (रा. गंगाखेड) याने वाईट हेतुने फिर्यादीस ट्रॅव्हल्समध्‍ये पाठीमागे चला नाहीतर मी सीटवर येवु का? तुमचा पर्सनल मोबाईल नंबर मला द्या, तुम्ही मला खुप आवडतात असे म्हणाला.

ट्रॅव्हल्स जेवणासाठी थांबली, चालकाने साधली संधी

दरम्‍यान प्रवासादरम्यान ट्रॅव्हल्स जेवणासाठी थांबली असता चालकाने पीडितेला ‘तुम्हाला जेवण खावु घालतो, तुम्ही माझी भुक भागवा'. असे म्हणत ट्रॅव्हल्स चालकाने पीडितेची छेड काढली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात आरोपी चालक दत्ता मोहिते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यामुळे ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.


Thursday, May 25, 2023

आष्टी बस स्थानकातून महिलेची सोन साखळी चोरून गाठला माळशेज घाट.दोन चोरटे अटकेत.


*स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माळशेज घाटातील एका बंद पडलेल्या हॉटेलमधून घेतले ताब्यात. 

आष्टी (प्रतिनिधी) - बसची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून नेल्याची घटना १८ रोजी घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे  शाखेने खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून दोघांच्या माळशेज घाटात एका बंद पडलेल्या हॉटेलमधून बुधवारी रात्री मुसक्या आवळल्या. दोन्ही आरोपींना आष्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अल्पवधीत आरोपी ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक केले जात आहे.

आष्टी तालुक्यातील मुर्शदपूर येथील विजया विश्वनाथ शिंदे या १८ मे रोजी पुण्याला जाण्यासाठी दुपारच्या दरम्यान आष्टी बसस्थानकात आल्या होत्या. बसची वाट पाहत असताना यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. अज्ञात चोरटय़ांविरुद्ध १९ रोजी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या बीडच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन याची माहिती घेतली.

 दरम्यान, पथकाने रविवार पासून तपासाला सुरुवात केली. त्यानंतर खबऱ्याच्या माहितीवरून पथकाने बुधवारी रात्री माळशेज घाटातील एका बंद पडलेल्या गणेश दिनकर झिंजुर्डे व किशोर भाऊसाहेब शेळके ( दोघे रा. पाथर्डी जि.अहमदनगर ) यांना ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हाची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना आष्टी पोलीसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरु आहे.

 ही कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, पोलीस उपनिरीक्षक पोलीस भगतसिंग दुल्लत,हेडकॉन्स्टेबल मनोज वाघ ,पोलीस नाईक सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे ,सलीम शेख, अशोक सुरवसे ,अशोक कदम यांनी केली.


वेतनासाठी महिला कामगार आक्रमक बीड नगरपालिकेत ५० कर्मचाऱ्यांना कोंडले. मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने ठोकल्या बोंबा.



बीड (प्रतिनिधी) : येथील नगरपालिकेतील रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचे तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. याच वेतनासाठी महिन्यापूर्वी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले होते. त्यानंतरही आजपर्यंत वेतन न मिळाल्याने गुरुवारी दुपारी महिला कामगार आक्रमक झाल्या. तळपत्या उन्हात आंदोलन करत त्यांनी पालिकेच्या गेटला पुन्हा एकदा कुलूप लावून ५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोंडले. तसेच मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यामुळेच वेतन मिळत नसल्याचा आरोप करत बोंबा मारल्या.

बीड शहरातील स्वच्छतेची जबाबदारी खासगी कंत्राटदाराला देण्यात आलेली आहे. परंतु त्यांना पालिका वेळेवर बिल देत नाही, त्यामुळे आमचे पगार वेळेवर होत नाहीत. याच मुद्द्यावर ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती. तेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी महिनाभरात प्रकरण निकाली काढू, असे अश्वासन दिले होते. परंतु सीईओंकडून आश्वासन पूर्ण न झाल्याने गुरुवारी महिला कामगार आक्रमक झाल्या. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांनी अचानक पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. त्यामुळे पालिकेचे जवळपास ५० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यालयातच अडकले. शिवाय विविध कामांसाठी पालिकेत गेलेले सामान्य नागरिकही अडकून पडले होते. या प्रकारानंतर पाेलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली, परंतु आतील लोक बाहेर काढण्यात त्यांनाही यश आले नाही. महिलांनी जोपर्यंत वेतन होत नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा घेतला होता.

सीईओ अंधारेंविरोधात संताप.

बीड पालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्याविरोधातच कामगारांचा जास्त रोष होता. त्या कार्यालयात कधीच बसत नाहीत. त्यांच्यामुळेच आमचे वेतन रखडले आहे. शिवाय सध्याच्या नांदेड येथील कंत्राटदाराला बाजूला करत जुन्याच कंत्राटदाराला स्वच्छतेचे कंत्राट देण्याचा घाट त्या घालत आहेत. यासाठी त्यांनी लाखो रुपये घेतल्याचा आरोपही या कर्मचाऱ्यांनी केला. तसेच सीईओ अंधारे यांच्या नावानेच या महिलांंनी बोंबा मारून आपला संताप व्यक्त केला. याबाबत अंधारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वणी नॉट रिचेबल होता.

बिग ब्रेकिंग ! बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९१.२५ टक्के.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.

मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थी, पालकांना दुपारी दोन वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल.

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकाला निकालानुसार यंदा बारावीचा ९१. २५ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्के घट झाली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.१ टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१३ टक्के लागला. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्क्यांन अधिक आहे. 

 विभागाचा निकाल

पुणे : 93.34
नागपूर : 90.35
औरंगाबाद : 91.85
मुंबई : 88.13
कोल्हापूर : 93.28
अमरावती : 92.75
नाशिक: 91.66
लातूर : 90.37
कोकण : 96.01
एकूण : 91.25

शाखानिहाय निकालाची टक्केवारी

शाखा : उत्तीर्णतेची टक्केवारी

विज्ञान : ९६.०९ टक्के

कला : ८४.०५ टक्के

वाणिज्य : ९०.४२ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम : ८९.२५ टक्के

संभाजीनगर येथे उद्या स्व. मोहनलालजी बियाणी स्मृती व्याख्यानमालेचे दहावे पुष्प.


*'कला, गुण, छंदाचे महत्त्व' या विषयावर व्याख्यान तसेच ज्येष्ठ कलावंत सुधीर कोर्टीकर यांचे दुर्मीळ नाण्यांचे, टपाल तिकिटांचे प्रदर्शन. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  दैनिक मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व. मोहनलालजी बियाणी (काकाजी)यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे दहावे पुष्प छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ कलावंत सुधीर कोर्टीकर हे हे ''कला, गुण, छंदाचे महत्व' या विषयावर गुंफणार आहेत. शुक्रवार, दि. २६ मे रोजी सायं. ५.३० वाजता कै.नारायणराव उजळंबकर वाचनालय सिडको एन-४ संभाजीनगर  येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त प्राचार्या सौ. सुनीता चंद्रशेखर पाठक यांच्या हस्ते होणार आहे.
 यानिमित्ताने प्रसिद्ध नाणे, टपाल तिकिट संग्राहक हे मुलांसाठी दुर्मीळ नाण्यांचे आणि टपाल तिकिटांचे प्रदर्शन आयोिजत करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेनुसार या वर्षीपासून स्व. मोहनलालजी बियाणी (काकाजी) यांच्या स्मृत्यर्थ मासिक व्याख्यानमाला आरंभ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व बंसल क्लासेसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक ज्येष्ठ सिनेपत्रकार अशोक उजळंबकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष डाॅ. प्रभू गोरे यांच्यासह कार्यकारिणीने केले आहे. अिधकाधिक मुलांनी याचा लाभ घ्यावा.

सरकारी डॉक्टरांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया खोळंबली.


बीड (प्रतिनिधी) : वैद्यकीय अधिकारी (गट अ वर्ग २) या पदाच्या डॉक्टरांच्या ऑनलाईन बदल्या केल्या जात आहेत. यासाठी सर्वांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. याची सेवा ज्येष्ठता यादी २४ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत प्रकाशित करणे अपेक्षित होते. परंतू दुपारपर्यंत एकही यादी प्रकाशित झाली नव्हती. याबाबत संचालक व आकाश एन्टरप्रायजेस या खासगी कंपनीला विचारणा करण्यात आल्यावर रात्रीपर्यंत प्रकाशित करू असे सांगण्यात आले.

परंतू २५ मे रोजी सायंकाळी ६ पर्यंत आक्षेप नोंदविण्याची मुदत आहे. जर आज उशिरा याद्या प्रकाशित झाल्यावर एका दिवसात कसे आक्षेप नोंदविणार? असा सवाल उपस्थित होत आहे. सरकारी डॉक्टरांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया खोळंबली; दुपारपर्यंत ज्येष्ठता यादीच नाहीशासकीय डॉक्टरांच्या पहिल्यांदाच ऑनलाईन बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात होते. या बदल्यांसाठी नाशिक येथील आकाश एन्टरप्रायजेस ही कंपनी नियूक्त करण्यात आली आहे. पहिल्यांदा प्रशासकीय बदल्यांसाठी १७ मे पर्यंत मुदत होती. नंतर ती १९ आणि २१ मे पर्यंत वाढविण्यात आली. २२ व २३ मे रोजी उपसंचालक कार्यालयाने सर्व अर्ज तपासून लॉक करायचे होते. त्यानंतर २४ मे रोजी सकाळी १० वाजता अंतरीम यादी प्रकाशित करायची होती. २५मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत होती तर २६ मे रोजी आक्षेपांचे निराकरण केले जाणार होते. असे हे वेळा पत्रक सहसंचालक सुभाष बोरकर यांनी काढले होते. परंतू २४ मे रोजी दुपारपर्यंत कसलीही यादी प्रकाशित आलेली नव्हती. ही यादी नसल्याने आक्षेप कसे नोंदविणार? असा सवाल बीडच्या डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. आता आक्षेपासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही होत आहे.

कोण काय म्हणतात...

याबाबत संचालक डॉ.स्वप्नील लाळे यांना विचारणा केली असता याद्या प्रकाशित व्हायला हव्या होत्या. काय अडचण आहे मी विचारतो असे सांगितले. तर आकाश एंटरप्रायजेसचे मनोज भिसे यांना विचारणा केल्यावर ते संतापले. उपसंचालकांचे काम झाले तर आम्ही काय करणार?बुधवारी रात्रीपर्यंत याद्या प्रकाशित करू, असे सांगितले.

वेळ वाढवून द्या .

२४ मे रोजी सकाळी १० वाजता याद्या प्रकाशित व्हायला हव्या होत्या, परंतू दुपारपर्यंत त्या प्रकाशित झालेल्या नाहीत. आता आक्षेप नोंदविण्यास गडबड होईल. त्यामुळे वेळ वाढवून द्यावा. तसेच या प्रक्रियेत गती ठेवावी.- डॉ.नितीन मोरे, कॅग्मो, बीड

कामानिमित्त शेतात गेलेल्या पती-पत्नीचा वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळ्याने खळबळ आष्टी तालुक्यातील घटना



याबाबत प्राथमिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील ईश्वर गुंड हे पत्नी श्रतुजा यांच्यासह मंगळवारी सकाळी शेतात कामासाठी गेले होते. सायंकाळी दोघेही घरी परतले नाहीत. यामुळे नातेवाईकांनी गावात शोध घेतल्यानंतर रात्री शेतात शोधाशोध केली. यावेळी प्रथम ईश्वर गुंड याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तर श्रतुजाचा शोध लागला नाही. दरम्यान, आज सकाळी शेतातच श्रतुजाचा देखील मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. 

या हृदयद्रावक घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पतीचा आणि पत्नीचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने ही आत्महत्या की घातपात अशी चर्चा सुरु झाली आहे. अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून अधिक तपास सुरु आहे. 

खोटा गुन्हा दाखल केला म्हणत घेतले पेटवून.अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी ५२ टक्के भाजला; आता मागतोय पाणी.


*खोटा गुन्हा दाखल केला म्हणत पोलिस अधीक्षक कार्यालयात घेतले होते पेटवून. 

बीड ( प्रतिनिधी) : माझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत एकाने चक्क पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन पेटवून घेतले होते. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घडली होती. यामध्ये तो ५२ टक्के भाजला असून जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्षात तो सध्या पाणी पाणी करत आहे. आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


संदीप पिंपळे (रा. कबाडगल्ली, बीड), असे पेटवून घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. माजलगाव येथील एका हॉटेलात मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या महिलेने संदीपसह बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही आहेर धानोरा, ता.बीड) आणि इतर चार अनोळखी लोकांनी अत्याचार केल्याची फिर्याद १६ मे रोजी बीड शहर ठाण्यात दिली होती. संदीपवर अत्याचार करून त्याचे व्हिडीओ बनवीत ब्लॅकमेल केल्याचा आरोप होता. हेच व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवत त्याने आणि त्याचे दोन सहकारी बालाजी इंगोले व गोरख इंगोले यांनी अत्याचार केला होता. त्यानंतर आपल्या चार मित्रांकडूनही त्याने अत्याचार केल्याचे फिर्यादीत होते. २०१४ ते २०२१ अशी सात वर्षे या महिलेवर अत्याचार केल्याचाही आरोप पीडितेने केला होता.

या प्रकरणात पोलिसांकडून एकही आरोपी अटक नव्हता. अशातच मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता संदीप हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आला आणि अंगावर डिझेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर जळीत कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याने पेटवून घेतल्याने दोन्ही पाय, उजवा हात आणि पाठीचा मागचा सर्व भाग जळाला आहे. जवळपास तो ५२ टक्के भाजला असून पाणी मागत आहे. सध्या तरी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्याविरोधातही आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. इतर सर्व आरोपी अद्यापही फरार असून, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यांना वेळीच अटक न केल्यास तेदेखील संदीपसारखे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही चर्चा आहे.

Wednesday, May 24, 2023

शिवसेना जिल्हाप्रमुखपदी रत्नाकर शिंदे यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना शहर प्रमुख राजेश विभूते यांच्या वतीने भव्य सत्कार.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बीड जिल्हा प्रमुख पदी निष्ठावंत शिवसैनिक रत्नाकर शिंदे यांची पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबद्दल परळी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश विभुते यांच्या वतीने श्री शिंदे यांचा केज येथे नुकताच भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांनी सांगितले की , विश्व हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविणार असून, लवकरच गाव तेथे शाखा स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बीड जिल्हा प्रमुख पदी केज येथील गेल्या तीन दशकापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले निष्ठावंत शिवसैनिक रत्नाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल परळी शहर शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ नेते नारायणराव सातपुते माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल तसेच शहर प्रमुख राजेश विभुते यांच्या हस्ते श्री शिंदे यांचा भगवी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना श्री रत्नाकर शिंदे म्हणाले की, विश्व हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार आपण घरोघरी पोहोचविणार असून 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करून विद्यार्थी, सर्वसामान्य गोरगरीब लोकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख श्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते माजी खा चंद्रकांतजी खैरे साहेब, शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा घरोघरी पोहोचवून गाव तेथे शाखा स्थापन करणार असल्याचेही श्री रत्नाकर शिंदे यांनी सांगितले.

*शाखा सचिव ते जिल्हा प्रमुख*

केज तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी असलेले रत्नाकर शिंदे हे १९९० पासून शिवसेनेत कार्यरत आहेत.. १९९० साली शाखा सचिव, २००१ साली शाखा प्रमुख, २००२ साली तालुकाप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. या दरम्यान त्यांनी अनेक आंदोलने केली. त्यांच्यावर एमपीडीए नुसार कारवाई केल्याने त्यांना काही महिने तुरुंगवासही भोगावा लागला. मात्र एकनिष्ठतेचे फळ म्हणून आता जिल्हा प्रमुख पदावर वर्णी लागली आहे. केज, धारूर, माजलगाव, अंबाजोगाई, परळी या तालुक्यांचा कार्यभार त्यांच्याकडे असणार आहे.

प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या; दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर होणार.

मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल  कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून  लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. 

* गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे.  उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे. 

उद्या दुपारी दोन वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. 

पुनर्मूल्यांकनासाठी काय कराल?

फेब्रुवारी-मार्च 2023 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक राहिल. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.


Tuesday, May 23, 2023

उसनवारी करून कांदा पिकवला भाव पडल्याने शेतकऱ्याने नैराश्यात जीवन संपवले.


आष्टी (प्रतिनिधी) - उसनवारी करून कांदा पिक घेतलं पण त्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतीतुन आर्थिक उन्नती झाली  नाही.लोकाचं कर्ज डोक्यावर वाढत गेलं आलेल्या नैराश्यातून एका शेतकर्‍याने रविवारी शेतात विषारी द्रव्य प्राशन केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. अंकुश बाबुराव एकशिंगे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी अंकुश बाबुराव एकशिंगे ( ४४ ) यांनी कांदा लागवड केली होती. काढणी केलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने लोकांचे घेतलेले उसनवारीचे पैसे देखील देण्यासाठी हातात आले नसल्याने  याच विवंचनेत असताना रविवारी २१ रोजी सायंकाळी शेतात विषारी औषध प्राशन केले. लोकांच्या लक्षात येताच त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल केले . मात्र उपचारा दरम्यान मंगळवारी पहाटे त्याचे निधन झाले.त्यांच्यावर दुपारी  चिंचोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे 

दुर्लक्षित चालुक्य कालीन ठेवा. केसापुरीतील पुरातन मंदिराचे होणार पुनर्निर्माण.



*माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी येथे हा स्थापत्य केलेचा उत्कृष्ट ठेवा दुर्लक्षित झाल्याने मोडकळीस आला आहे.

माजलगाव (प्रतिनिधी) : चालुक्य काळात बांधण्यात आलेल्या मंदिराची पुरातत्व विभागाकडून शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या मंदिराचे पुनर्निर्माणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार असुन येत्या दोन वर्षात हे मंदिर पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे. 

माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी येथे हा स्थापत्य केलेचा उत्कृष्ट ठेवा दुर्लक्षित झाल्याने मोडकळीस आला आहे. या वास्तू शिल्पाचे जतन व्हावे यासाठी गावकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करून यावर आवाज उठवला होता. त्यानुसार, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे, सेवानिवृत्त असलेले जतन समितीचे बालाजी बनसोडे, अभियंता नितीन चारुडे, वास्तू विशारद योगेश कासार आणि आकाश कराड यांनी या ठिकाणी पाहणी केली. या वास्तू शिल्पाचे पुनर्निर्माण करण्याचे ठरवत प्रत्यक्ष कामास सुरवात केली. येत्या दोन वर्षात या स्थापत्य शिल्पास गत वैभव मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट केले.

सदरील स्थापत्य शैलीत विविध प्रकारची शिल्पे कोरलेली असून तिचे संवर्धन होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी वेळोवेळी केली होती. त्यानुसार पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. या कामात लोकसहभाग लाभल्यास लवकरात लवकर या वस्तूला गत वैभव प्राप्त होऊ शकते. दोन अडीच वर्षापुर्वी बारव संवर्धन समितीचे सदस्य, साहित्यिक श्रीकांत उमरीकर यांनी या मंदिरास भेट दिल्यानंतर  येथील माजी सरपंच विलास साळवे यांच्यासोबत चर्चा केली होती. यापुर्वी काही परदेशी अभ्यासक ही निरिक्षण करुन गेले. मागील महिन्यात डॉ. संजय बोरूडे यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. या सर्व कामात कवी प्रभाकर साळेगावकर यांचा महत्वाचा वाटा आहे. जावेद देशमुख यांचेही सहकार्य लाभलेले आहे.

असे होणार काम.

पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या वास्तू शिल्पाची पाहणी करून  या करावे लागेल, याचा अंदाज आराखडा काढण्यात आला. ड्रोनद्वारे वस्तुस्थितीचे छायांकन करून समिती काही दिवसांतच आवश्यक सुधारणा लवकर करणार आहे.      ३ कोटींचा खर्च अपेक्षित. 

वास्तू शिल्पाची पाहणी झाली असून कामाचा आराखडा तयार करण्यात येत आहे.  लवकरच त्याचे काम देखील सुरू करण्यात येणार आहे.मंदिर उभारण्यासाठी अंदाजित 3 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.- अमोल गोटे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग,छत्रपती संभाजीनगर

परळी नवीन औष्णिक विद्युत केंद्राच्या कोळसा हाताळणी विभागात कोळशाच्या रेल्वे वॅगनखाली चिरडून कामगाराचा मृत्यू


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : येथील परळी नवीन औष्णिक विद्युत केंद्राच्या कोळसा हाताळणी विभागात आज सकाळी अपघात झाला. कंत्राटदाराकडील एका कामगाराचा कोळसा घेऊन येणाऱ्या रेल्वे मालगाडीच्या वॅगनखाली येऊन मृत्यू झाला. विनायक केंद्रे ( 52, रा वाघबेट) असे मृताचे नाव आहे. 

परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दुपारी देण्यात आला. दरम्यान, परळी उपजिल्हा रुग्णालयास कंत्राटदार व औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मितीसाठी कोळसा आंध्र प्रदेशातून रेल्वे मालगाडीने पुरवला जातो.  याच रेल्वे गाडीखाली आल्याने कामगाराचा मृत्यू झाला आहे. विद्युत केंद्रात कोळसा हाताळणी विभागात स्वच्छतेचे काम करणाऱ्या थर्मलच्या कंत्राटदाराकडे कामगार कामास होता.

Monday, May 22, 2023

दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता .


मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) आणि बारावी ( HSC) परीक्षांच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

इयत्ता बारावीचा निकाल 31 मे 2023 रोजी जाहीर होण्याची शक्यता असून, जून 2023 च्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
दरम्यान राज्यातील शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्या नंतर जु्न्या पेन्शनच्या मागणीमुळे काही दिवस शैक्षणिक काम बंद होते. या गोंधळात सहा-सात दिवस बारावीच्या उत्तरपत्रिका तपासल्या गेल्या नव्हत्या.
यामुळे यंदा दहावी आणि बारावीचा निकाल विलंबाने लागेल अशी भीती पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये होती. परंतु आता मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.! पुन्हा एकावर भरदिवसा गोळीबार.


पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे जाणवत असून, अवघ्या पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गोळीबारीची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथे एका युवकावर भरदिवसा  गोळीबार करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.२२) दुपारी २:३० च्या दरम्यान २ अज्ञात आरोपींनी चिखली चौकात उभ्या असलेल्या एका तरुणावर गोळ्या झाडल्या. सोन्या तापकीर असे गोळ्या झाडण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, या गोळीबारीत तो गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आलीय.

काही दिवसापूर्वी तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची भरदिवसा गोळ्या घालून, हत्या करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने पिंपरी चिंचवड शहर हादरले आहे.

टाळगांव चिखली येथील चौकात सोन्या तापकीर उभा असतांना; यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात सोन्या गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून, हल्ल्यातील जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या घटनेप्रकरणी चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत. 


दोन हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी SBI चा मोठा निर्णय.

कांतीकारी साथी न्यूज ;- भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद होत असल्याची घोषणा केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नागरिक बँकेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकतात.
२३ मेपासून नोटा बदलण्याचे काम सुरू होणार असून, स्टेट बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासंदर्भात महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार, २००० रुपयांच्या नोटा एकावेळी २० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलण्याची सुविधा असेल, यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही. यामुळे नागरिक एकाच वेळी २००० रुपयांच्या १० नोटा बदलून घेऊ शकतात.

तुम्ही एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन कोणताही फॉर्म न भरता किंवा ओळखपत्राशिवाय २००० रुपयांच्या नोटा सहज बदलून घेऊ शकता.

बँकेने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, २००० रुपयांच्या दहा नोटा बदलताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राची गरज भासणार नाही. म्हणजेच, नोटा बदलून घेताना ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.

रिझर्व्ह बँकेची २००० रुपयांच्या नोटांसंदर्भात घोषणा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भात घोषणा केली. पण या नोटा रद्द केल्यानंतरही त्या लीगल टेंडर असतील, असे आरबीआयने म्हटले. आता २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागरिक २००० रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकतात.

धक्कादायक! आयुर्वेदिक औषधोपचार करण्याच्या बहाण्याने आला, अन् त्यांच्याच मुलीला घेऊन पळाला.

केज (प्रतिनिधी) : बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आयुर्वेदिक औषधोपचार करण्याच्या बहाण्याने आलेल्या भोंदू महाराजाने एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बीडच्या केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. याप्रकरणी भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. याठिकाणी राहणाऱ्या एका आजारी व्यक्तीवर आयुर्वेदिक औषधोपचार करण्यासाठी एक भोंदू महाराज आला होता. अल्पवयीन मुलगी आपल्या आजारी वडिलांची देखभाल आणि सेवा करत होती. ही मुलगी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. त्याच वेळी या भोंदू महाराजाने फूस लावून तिला पळवून नेले.

भोंदू महाराज या अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून पळून गेला. ही घटना अल्पवयीन मुलीच्या काकाने पाहिली. त्यांनी या भामट्या महाराजाचा पाठलाग करुन शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ते कुठेच दिसले नाही. या घटनेमुळे अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी युसुफवडगाव येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी माऊली धोंडीराम भोसले या भामट्या महाराजाविरोधात गुन्हा दाखल केला. या महाराजाचा आणि मुलाचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार.

माजलगाव (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात समोर आलाय. अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. ही अपघाताची घटना बीडच्या  माजलगाव गढी महामार्गावर घडली आहे. 
विकास रामदास खरात (वय 32 रा. केसापुरी) असं मयत दुचाकीस्वराचे नाव आहे. विकास हा तरुण गढीवरून दुचाकीने माजलगावकडे येत होता. या दरम्यान केसापुरी कॅम्प परिसरात दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये विकास खरात याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. दरम्यान या प्रकरणी अज्ञात वाहनावर आणि चालकावर बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोकाच चुकला

अपघात इतका भीषण होता, की पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोकाच वाढला. मयत दुचाकीस्वार गाडीवरच पडल्याचं दिसून आला तर खाली अक्षरशः रक्ताचा सडाचं पडला होता.

शिवसेना आणखी मजबुतपणे उभी कराखा.संजय राऊत यांचा बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ अभयकुमार ठक्कर यांच्याशी संवाद.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शिवसेनेच्या अगदी स्थापनेपासून सोबत असलेले अभयकुमार ठक्कर हे आजही शिवसेनेत कायम असून परळी शहर व तालुक्यात शिवसेना वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे अशी ओळख माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी खा.संजय राऊत यांच्यासोबत करून दिल्यानंतर काही वेळ राऊत आणि ठक्कर यांच्यात संवाद झाला. शिवसेना आणखी मजबुत करा, तुम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहात, आपल्याला शिवसेना पुन्हा एकदा मोठया जोमाने उभी करायची आहे अशी सूचना खा.संजय राऊत यांनी दिली. 
बीड येथील महाप्रबोधन यात्रेसाठी खा.संजय राऊत हे रवाना होत असतांना त्यांच्या समवेत परळी येथे अनेकांनी संवाद साधला. यावेळी बोलतांना वैद्यनाथ मंदिरात अभयकुमार ठक्कर यांची ओळख खा.संजय राऊत यांच्यासोबत माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी करून दिली. अभयकुमार ठक्कर हे शिवसेनेच्या स्थापनेपासून सोबत असल्याचे सांगत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माँ साहेब मीनाताई ठाकरे या ठक्कर यांच्या निवासस्थानी उतरल्याची आठवण आ.धनंजय मुंडे यांनी करून दिली. त्याचा संदर्भ घेत संजय राऊत यांनी सांगितले की, शिवसेनेत निष्ठावंतांची नेहमीच कदर केली जाते. आपण शिवसेनेला मोठे यश यापूर्वी मिळवून दिले असून भविष्यातही असेच यश मिळवून द्याल असा विश्वासही खा.संजय राऊत यांनी व्यक्त केला.  
दरम्यान बीड येथे महाप्रबोधन यात्रेदरम्यान शिवसेना नेते खा.संजय राऊत, माजी खा.चंद्रकांत खैरे व अभयकुमार ठक्कर यांच्यामध्ये विविधि विषयावर चर्चा झाली. यावेळी  आम्ही करत राहू, आपले सहकार्य असेच कायम राहु द्या असे आवाहन यावेळी अभयकुमार ठक्कर यांनी खा.संजय राऊत यांना केला.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची राज्य कार्यकारणी बैठक संपन्न.पर्याय नको जुनी पेन्शन योजनाच हवी :- वितेश खांडेकर

 

नागपूर (प्रतिनिधी)  नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावरील भव्य पेंशन मोर्चा ,त्यानंतर राज्यात सर्व कर्मचारी संघटनानी एकत्र येत केलेल्या संपात कर्मचाऱ्यांनी घेतलेला अभूतपूर्व सहभाग यातून मृत कर्मचारी कुटुंबांना न्याय मिळाला.सेवेतील कर्मचाऱ्यांना नियत कालावधी नंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर जुनी पेन्शन बाबत सरकारने समिती नेमली आहे.या समितीस संघटनेने आपले म्हणणे दिले असून पर्याय नको 1982 -1984 ची जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी केल्याचे यावेळी राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी बैठकीत सांगितले.

2024 पूर्वी जुनी पेन्शन मिळवण्यासाठी कृती कार्यक्रम व आंदोलनाच्या नियोजनाबाबत बैठकीत विचार मंथन करण्यात आले.जुनी पेन्शन योजनाच कर्मचाऱ्यांचे हित साध्य करू शकते.त्यामुळे इतर पर्याय न स्वीकारता जुनी पेन्शन योजनेसाठी आग्रही राहण्याची विनंती यावेळी करण्यात आली. 
*संपानंतर गठित केलेल्या समितीची 14 जून रोजी मुदत संपणार आहे.त्यांनतर सर सकट 1982-1984 ची जुनी पेन्शन बाबत तातडीने निर्णय न झाल्यास सर्व कर्मचारी व अधिकारी संघटनांना एकत्र  घेत  आंदोलन ताकतीने पुढे नेण्यासाठी राज्यातील सर्व कर्मचारी व अधिकारी बंधू भगिनींनी तयार रहावे असे आवाहन यावेळी जुनी पेन्शन संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष गौरव काळे व अमरावती विभागीय अध्यक्ष मिलिंद सोळंकी यांनी केले.*

बैठकीस राज्य सरचिटणीस गोविंद उगले,कार्याध्यक्ष अशितोष चौधरी,राज्य उपाध्यक्ष ,नामदेव मेटांगे ,राज्य सल्लागार सुनील दुधे,राज्य संघटक संजय सोनार,राज्य आय टी प्रमुख विनायक चौथे ,महिला आघाडी प्रमुख मनीषा मडावी, राज्य प्रसिद्धी प्रमुख संतोष देशपांडे पुणे विभागीय अध्यक्ष सागर  खाडे ,नागपूर विभागीय अध्यक्ष अनिल वाकडे ,अमरावती विभाग प्रमुख मिलिंद सोळंके , ,राज्य कार्यालयीन सरचिटणीस शैलेश राऊत ,राज्य सम्पर्क प्रमुख अतुल कडू ,राज्य सहकोषाध्यक्ष मुरली टेकोडे ,आंदोलन प्रमुख नदीम पटेल यांच्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व राज्य पदाधिकारी व विभागीय पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीचे नियोजन  अमरावती जिल्हा अध्यक्ष  गौरव काळे, प्रज्वल घोम ,यश बहिरम ,रितेश जगताप ,प्रवीण निभोरकर , आशिष ढवळे ,आशिष साव ,अमोल दांडगे ,राकेश काळे ,राजेश वानखडे ,सुधीर जाणे ,भावना राऊत ,योगिता वाकोडे ,प्राजक्ता मशिदकर ,संचिता गोगटे,प्रीती दिवाण  यांनी केले....

Sunday, May 21, 2023

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत आगाशी रिक्षा चालक मालक मित्र मंडळ स्टॅन्ड चे उद्घाटन.

विरार (प्रतिनिधी) आगाशी रिक्षा चालक मालक मित्र मंडळ चे अध्यक्ष प्रभाकर वागळे यांच्या पुढाकाराने तसेच शिवसेना (उबाठा) तालूका समन्वयक अभिजीत सांगळे व सहसंपर्क प्रमूख महेश राऊत यांच्या सहाय्याने स्थानिक भूमिपूत्रांसाठी रिक्षास्टॅन्ड चे उद्घाटन बोळींज ओलांडा येथे करण्यात आले. विरार शहरातील आगाशी पूरापाडा ते ओलांडा येथील वाढती लोकसंख्या तसेच नव्याने होणारे विकास काम लक्षात घेता तिथे नागरिकांच्या सोयीसाठी रिक्षा स्टॅन्ड असावा असे स्थानिकांचे म्हणने होते. नव्याने विकसीत होत असलेल्या पूरापाडा ते ओलांडा रोड जवळ रॅाकस्टार सिनेमागृह हे अर्नाळा, आगाशी, उंबरगोठण तसेच बोळींज करांसाठी एकमेव असे सिनेमागृह आहे व लवकरच तेथे लहान मूलांसाठी शाळा व मर्चंन्ट नेव्ही चे प्रशिक्षण केंन्द्र नव्याने चालू होणार आहे तेथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांची संख्या वाढत आहे त्यांना प्रवासासाठी गैरसोय होत आहे हीच गैरसोय दूर करण्यासाठी २१ मे २०२३ या दिवशी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत आगाशी रिक्षा चालक मालक मित्र मंडळ स्टॅन्ड चे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनावेळी शिवसेना पक्षाचे तालूका समन्वयक (वसई विधानसभा) अभिजीत सांगळे, सहसंपर्क प्रमूख (नालासोपारा विधानसभा) महेश राऊत, आगाशी विभागप्रमूख दिलीप सांगळे, आगाशी रिक्षा चालक मालक मित्र मंडळ चे अध्यक्ष प्रभाकर वागळे, उपाध्यक्ष राकेश तामोरे व शेकडो स्थानिक भूमिपुत्र रिक्षावाले उपस्थित होते.