रात्री 10 नंतर पोलिसांकडून गस्त सुरू करून दुकाने बंद करण्यासंदर्भात आवाहन केले जात आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी बीड शहरात किरकोळ वादामधून जातीय वळून देण्याचा प्रयत्न केला होता.
यामुळे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या सूचनेनुसार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रात्री 10 नंतर जिल्ह्यातील हॉटेल, दुकाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या सूचनेचे पालन केले नाही, तर दंड अथवा थेट फौजदारी कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान या निर्णयाचे काही लोकांनी स्वागत केले आहे, तर काहींनी विरोध केला आहे.
No comments:
Post a Comment