परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे गुरूवार दि.6 एप्रिल 2023 रोजी हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त विविध धार्मीक कार्यक्रमही आयोजिले आहेत अशी माहिती श्री विलासानंद महाराज यांनी दिली आहे.
चैत्र शके 1945 पोर्णिमा गुरूवार दि.6 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मीक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 ते 4 या वेळेत महाप्रसाद होणार असून या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विलासानंद महाराज यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment