परळी वैजनाथ (प्रतिनिधी) प्रजाहित जाणणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या माऊलीने घडविला. त्या राजमाता जिजाऊच्या भूमितून सर्वांना कायमच प्रेरणा मिळत आली. कणखर राजमाता आणि लोकमाता म्हणूनही जिजाऊंकडे पाहिले पाहीजे, जिजाऊंची दुरदृष्टी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी केले.
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त राणी लक्ष्मीबाई टावर चौकात असलेल्या जिजामाता गार्डन येथे जिजामाता गार्डन क्लब च्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान आज गुरूवार दि.12 जानेवारी 2023 रोजी राजमाता जिजाऊ यांच्या पुर्णाकृती पुतळयास श्री. अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी अभयकुमार ठक्कर यांनी म्हटले की, जिजाऊ जयंती हा एक जिजाऊ प्रेमींसाठी उत्साहाचा दिवस आहे. संकटाला सामोरे जायला कणखर पणा लागतो. संकटं झेलण्याची शक्ती लागते. ती शक्ती तो कणखरपणा राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना दिला आणि तोच संदेश आपल्यासाठी देखील आहे. त्यामुळे राजमाता जिजाऊंच्या विचारांची प्रेरणा प्रत्येकांने घ्यावी, असे ते म्हणाले. कार्यक्रमास जिजाऊ गार्डन क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment