Thursday, January 12, 2023

परळीच्या पोलिसांचे अवैध धंद्याकडे दुर्लक्ष.सहाय्यक पोलीस अधिक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाची अवैध धंद्याविरुद्ध कारवाई. 31 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.


*परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. 

*शहरातील अवैध मटक्याच्या अड्यावर छापेमारी  31 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. 

परळी,(प्रतिनिधी):- सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने परळी शहरात अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. गेल्या दोन दिवसापासून परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याविरुद्ध कारवाई सुरू असून या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. जर सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकांना परळी शहरात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळत असेल तर ती परळीतल्या पोलिसांना कशी मिळत नाही? असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी व सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा सुरू करावा असेही जनतेतून बोलले जात आहे. दरम्यान धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने अवैध ऑनलाइन बिंगो मटक्यावरही कारवाया कराव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.

     सहायक पोलीस अधीक्षक डॉ. धिरजकुमार माजलगांव अतिरिक्त पदभार उपविभागीय पोलीस अधीकारी अंबाजोगाई यांनी अंबाजोगाई उपविभातील सामान्य नागरीकांच्या तक्रारीची प्रथम प्राधान्याने दखल घेऊन अवैध मटक्याचे धंदयाबाबत गोपणीय बातमीदारा मार्फत माहिती हस्तगत करुन घेतली. मटका जुगार खेळणारे व चालविणारे  खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली. पोलीस ठाणे परळी शहर येथे गुरन 11 / 2023 कलम 12 अ मुजुका प्रमाणे आरोपी बिबन शबीर पठाण, रा. भोईगली परळी 2) सयद जाबेर सयद अब्दुला, राहणार पालम जि परभणी 3) शेख असीफोदीन शेख जमीरोदीन राहणार मलीकपुरा यांचेकडून 11770/- रुपये मोबाईल व नगदी रक्कम तसेच पोस्टे परळी शहर गुंरंनं 12 /2023 कलम 12 अ मुबई जुगार मधील आरोपी विश्वनाथ शिवाजीराव चव्हाण राहणार पंचशिलनगर परळी यांचे ताब्यात नगदी 100/- रुपये 2) तुकाराम सखाराम बहीरे राहणार कन्हेरवाडी यांचे ताब्यात एक मोबाईल व नगदी 480/- रुपये तसेच आरोपी गणेश ज्ञानोबा फड राहणार कनहेरवाडी यांचे ताब्यात 800/- रुपये असा एकूण 2390/- रुपये व मुददेमाल तसेच पोस्टे संभाजीनगर गुरंनं 9/2023 कलम 12 अ मुबई जुगार कायदा मधील आरोपी सय्यद इब्राहीम सय्यद सादेक रा. इस्लामपुरा बंगला परळी यांचे ताब्यात नगदी 4470/- रुपये तसेच पोस्टे संभाजीनगर गुंरनं 10/2023 कलम 12 अ मुजुका प्रमाणे आरोपी वैजनाथ पंढरी लांडगे, रा. मिलींदनगर परळी यांचे ताब्यात एक मोबाईल 1000/- रुपये किमतीचा व नगदी 1000/- रुपये तसेच आरोपी गंगाधर सखारामजी सिरसाट राहणार घोडागौडगांव यांच्या ताब्यात नदी 300/- रुपये व मोबाईल 10,000/- रुये असे एकूण 10300 रुपये मिळून आले. सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार यांच्या पथकातील  सहायक पोलीस उपनिरीक्षक बालासाहेब फड, पोह सांगवे, पोह गुटटे, पोना खेलबुडे, पोह. सौंदनगर यांनी छापा टाकून सदर छाप्यात एकूण चार मोबाईल व नगदी रकमेसह एकूण 31820/- रुपयाचा जुगाराचा मुददेमाल व मोबाईल जप्त केला आहे. 

*धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने कारवाया कराव्यात*

 दरम्यान परळी शहर व संभाजीनगर हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळले असून परळीचे पोलीस केवळ चिरीमिरीत गुंग असून कसल्याही प्रकारची कारवाही करीत नाहीत. यामुळे अवैध धंदेवाल्यांना रान मोकळे झाले असल्याचेही जनतेतून बोलले जात आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने ऑनलाइन बिंगो मटक्यावर ही कारवाया कराव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.

@@@@@

*जनाची नाही तर मनाची तरी..... बाळगा*

परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसापासून अवैध गावठी दारू अवैद्य पत्त्याचे क्लब ऑनलाइन बिंगो मटकासर्रासपणे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परळी शहर व संभाजीनगर पोलिसांना हे सर्व अवैध धंदे कुठे चालतात? कसे चालतात? कोण चालवतात? याची इत्यंभूत माहिती असूनही कसलीही कारवाई करीत नाहीत. यामागे काय गोड बंगाल असावे? असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. संभाजीनगर व शहर पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी किमान जनाची नाही तरी मनाची लाज बाळगून या अवैध धंद्यावाल्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशीही मागणी जनतेतून होत आहे.

*अनेकांचा तिळपापड*
सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालासाहेब फड यांनी परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अनेक अवैध धंद्यावर गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकीत कारवाई केल्याने अनेकांचा तिळपापड होत आहे. कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालासाहेब फड यांनी परळी शहरात सुरू असलेल्या कारवाया सुरूच ठेवाव्यात असेही मागणी जनतेतून केली जात आहे.

No comments:

Post a Comment