Tuesday, January 31, 2023

भरधाव कारच्या धडकेत ऑटोरिक्षा खड्ड्यात जाऊन उलटला.चालकाचा मृत्यू.केज-मांजरसुबा राष्ट्रीय महामार्गावर झाला अपघात.


केज (कांतीकारी साथी न्युज): केज-मांजरसुबा राष्ट्रीय महामार्गावर सारूळ शिवारात आज सकाळी ९ .३० वाजेच्या सुमारास कार-ऑटोरिक्षाची जोरदार धडक झाली. धडकेनंतर ऑटोरिक्षा खड्ड्यात जाऊन उलटला. यात ऑटोरिक्षा चालकाचा मृत्यू झाला.

सारूळ येथील महेश बहादूर पुरी हे सकाळी ऑटोरिक्षा ( क्रमांक एम एच 23/ एच 9030 ) चालवत नांदूर फाट्याकडे जात होते. सारूळ शिवारात समोरून येणाऱ्या भरधाव कारने ( क्रमांक एम एच 25/ आर 7012 ) ऑटोरिक्षास जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की ऑटोरिक्षा बाजूच्या  खड्यात जाऊन उलटला. यात ऑटोरिक्षा चालक महेश बहादूर पुरी ( 23 वर्षे, रा. सारूळ ) गंभीर जखमी झाला. 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नांदूरघाट पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार अभिमान भालेराव, जमादार अशोक मेसे, व रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून जखमीस बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून महेश पुरीस मृत घोषित केले. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

दुर्मिळ! शेळीने मागील वर्षी ४ तर यंदा ५ पिलांना दिला जन्म, पशुपालकाच्या घरी आनंदोत्सव

आष्टी तालुक्यातील दादेगांव येथील गंगाधर आसराजी पोटे यांनी तीन वर्षांपूर्वी एक शेळी विकत घेतली. या शेळीने पहिल्या वर्षी एक, दुसर्‍या वर्षी चार तर आता तिसऱ्या वर्षी चक्क पाच पिलांना जन्म दिल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, पाचही पिलं ठणठणीत आहेत. तालुक्यात अशी घटना प्रथमच पहावयास मिळाली असल्याचे पशुपालकांचे म्हणे आहे. या घटनेमुळे पशुपालक पोटे आनंदित आहेत. तीन वर्षांपूर्वी पाच हजार रुपयांत घेतलेल्या शेळीने मागील वर्षी चार तर आता पाच पिलांना जन्म दिल्याचे  पोटे यांनी सांगितले. शेळीची प्रकृती चांगली असून पंचक्रोशीतून शेतकरी, ग्रामस्थ पिल पाहण्यासाठी येत आहेत. 

शेळी साधारण तीन ते चार पिलांना जन्म देते. पण पाच पिलांना जन्म दिला म्हणजे विशेष गोष्ट असल्याचे तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मंगेश ढेरे यांनी सांगितले.

परळीत जमाअत ए इस्लामी हिंदचा एक रोजा इजतेमा-ए-आम संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी येथे दिनांक २९ जानेवारी २०२३ रविवारी जमाअत ए इस्लामी बीड जिल्ह्याच्या एक रोजा इजतेमा-ए-आम च्या आयोजन करण्यात आला होता.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून जमाअत ए इस्लामी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मौलाना इलयास फलाही सहाब,जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्र राज्याचे तरबियत विभागचे सचिव डॉ जावेद मुकरम सहाब, जलगावचे सोहेल अमीर साहेब, शफीक फारुखी सहाब पाथरी, मुबश्शिरा फिरदोस बाजी औरंगाबाद आलं होत. 

या कार्यक्रमांची सुरुवात कुरान पठाणाने झाली नंतर डॉ जावेद मुकरम सहाब यांनी "सध्याच्या प्रसतीत कुरान आणि सुन्नत काय सांगतात" या विषयावर मुकरम साहेबनी अनेक उदाहरणे देऊन आपलं मनोगत व्यक्त केले नंतर बोलताना सांगितले की आज भारतात मुस्लिम समाजाला जितका अधिकार आणि आझादी आहे तितकी जकात कुठेच नाही.
यानंतर 'इस्लामिक समाज निर्माण करण्यात आमची भूमिका काय आसावी' यावर प्रमुख तीन व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वात अगोदर मुबश्शिरा फिरदोस मैडमनी 'लग्ना नंतर जोडीदार, शिक्षक' आणि पालक या विषयावर आपलं मनोगत व्यक्त केले नंतर 'धार्मिक अभ्यासक' या विषयावर मुफ्ती अश्फाक कासमी यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. नंतर 'राजकीय आणि सामाजिक नेते' या विषयावर शफी फारुकी साहेब यांनी अनेक उदाहरणे देऊन सध्या सध्याच्या राजकारणात जे चालू आहे ते गाव पातळीवर असो किंवा देश पातळीवर यावर आपले मनोगत व्यक्त केले.
या तिन्ही मुद्द्यावर नंतर मौलाना इलियास फलाही साहेब उपाध्यक्ष जमात इस्लाम हिंद महाराष्ट्र यांनी आपले विश्लेषण व्यक्त केले.नंतर सोहेल अमीर साहेब यांनी समाज सुधारण-सध्याच्या परिस्थितीत यावर आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी जमाअत ए इस्लामी हिंद यांनी 75 वर्षात काय काय काम केले आणि समाजसुधारणासाठी काय काय उपाययोजना केले यावर इलियासफलाही साहेब यांनी भाषण केलं. 

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जमाअत ए इस्लामी हिंद बीड जिल्हा अध्यक्ष सय्यद इफ्तेखार, परळीचे अध्यक्ष सय्यद अन्वर सोबत पूर्ण परळीचे कार्यकर्त्यांनी  खूप परिश्रम घेतले

पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एकाला अटक व जामीनावर सुटका...!


चाकण :(प्रतिनिधी) खराबवाडी गावातील नजीर इनामदार नामक आरोपीने पत्रकाराला बातमी हि बातमी का लावली म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी म्हाळुंगे पोलीसांनी अटक करण्यात आली.

नजीर इनामदार नामक आरोपीने एका वसाहतीची पोर्टलला बातमी केल्याने अशी बातमी तू का केली, तुला बघून घेतो, मी प्रॉपर आहे अशा आशयाची भाषा वापरून दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पत्रकार यांच्याकडून आरोपी विरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा. द. वि.504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावर आरोपीला म्हाळुंगे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. या अगोदरही नजीर इनामदार याच्याबाबत पोलीस ठाण्यात अजूनही तक्रारी असल्याचे समोर आले आहे. जर असे आरोपी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देत असतील तर सर्वसामान्य जनतेचे काय? असाच काहीसा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा.

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी)  म शि प्र मंडळ संचालित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात मराठी विभागातर्फे मोठ्या उत्साहात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' दिन (27 जानेवारी) रोजी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ वनमाला गुंडरे, प्रमुख वक्ते मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य व कै लक्ष्मीबाई देशमुख महिला  महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ राजकुमार  यल्लावाड तसेच प्रा संकेत हंडीबाग  व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्रमुख वक्ते डॉ राजकुमार यल्लावाड यांना  यांनी 'गाऊ मराठीचे गोडवे ' या विषयावर विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला पाहिजे असे मत मांडले अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ वनमाला गुंडरे यांनी मराठी भाषेचे महत्व सांगितले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा संकेत हंडीबाग, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा राघव गव्हाणे यांनी दिला सूत्रसंचालन डॉ श्रीहरी गुट्टे तर प्रा दत्ता लव्हाळे यांनी आभार मानले या कार्यक्रमास श्री अजय सोळुंके, प्रा आघाव ,प्रा ईश्वर कांबळे ,डॉ विलास चौधरी ,प्रा चाटे, प्रा राठोड , प्रा कोठुळे, प्रा बनसोडे मॅडम तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

चालकाकडून पैसे भेटले नाहीत दरोडेखोरां नी ट्रकमधील ६ टन साखर दुचाकीवरून पळवली.सहा आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात.


परळी वैजनाथ (कांतीकारी साथी न्युज) : चालकास चाकूचा धाक दाखवून पैश्याची मागणी करीत  ट्रकमधील तब्बल १२ पोते ( सहा टन ) साखर लंपास केल्याची घटना रविवारी ( दि 29) पहाटे घडली. दरम्यान, या प्रकरणी 6 जणांना परळी शहर पोलिसांनी काही तासाच ताब्यात घेतले. यापैकी चौघा युवकांना अटक केले असून दोघे 17 वर्षीय बालक असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून एक ट्रक 30 टन साखर घेऊन शनिवारी ( दि 28)  वर्धा जिल्ह्यातील आर्ची व कारंजा या ठिकाणी रवाना झाला.  परळी मार्गे ट्रक जात असताना रविवारी ( दि. 29 ) पहाटे दुचाकीवरील सहा जणांनी ट्रकचा पाठलाग केला. चालक सतीश रामभाऊ धंदर ( रा गाडगे नगर ,शेगाव परिसर अमरावती ) हे परळी बसस्थानकासमोर चहा पिण्यासाठी थांबले असता दुचाकीवरील सहा जण तेथे आले. त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवत चालकाकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. चालकाने पैसे नाहीत असे म्हणताच ट्रकमध्ये झोपलेल्या दुसऱ्या ड्रायव्हरला व अन्य एकास चाकूच्या धाकावर पैश्यांची मागणी केली. पैसे मिळत नसल्याने संतप्त दरोडेखोरांनी जबरदस्तीने ट्रकमधील साखरेचे 12 पोते (6 क्विंटल साखर) दुचाकीवर लादून घेऊन गेले. 

दरम्यान, या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात ट्रक चालक सतीश धंदर यांनी फिर्याद दिली. परळी शहर पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, सपोनि चंद्रकांत गोसावी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध लावला. सहा पक्की दोघे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी साखर जप्त करत चार जणांना ताब्यात घेतके. सुमित दशरथ जाधव ( 24), बालाजी अंकुश दहिफळे ( 23), वैभव दशरथ कापसे (22), नागेश अशोक शिंदे (21, सर्व राहणार परळी ) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना कोर्टात हजर केले असता ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दोघ अल्पवयीन मुलांना नोटीस बजावून पालकांच्या स्वाधीन केले. 



विद्युतपंप लावताना पाय घसरला १६ वर्षीय शेतकरीपुत्राचा विहिरीत पडून मृत्यू विहिरीत मोठ्या प्रमाणावर पाणी असल्या ने मृतदेह बाहेर काढताना अडचणी आल्या.


आष्टी (कांतीकारी साथी): विद्युत पंप लावत असताना अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने एका १६ वर्षीय शेतकरीपुत्राचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. संदिप बारीकराव खाडे असे मृत मुलाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील देवळाली येथील पांडुरंग भोजीबा खाडे हे पुतण्या संदिपला सोबत घेऊन सकाळी शेतात गेले होते. विहीरीत विद्युत पंप सोडण्याचे काम करत असताना अचानक संदीपचा पाय घसरला. विहीरीला कठडे नसल्याने संदीप थेट विहिरीत पडला. चुलत्याने मदतीसाठी आरडाओरड केली. मदत मिळेपर्यंत पोहता येत नसल्याने संदीपचा मृत्यू झाला. 

विहिरीत मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने मृतदेह बाहेर काढताना अडचणी आल्या. वेगवेगळे प्रयत्न करून देखील यश येत नव्हते. तीन तासानंतर अखेर गळाच्या माध्यमातून मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात यश आले. माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी  देशमाने, अंमलदार लुईस पवार, शिवदास केदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 

महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते परळी येथील भगवान मंडलीक यांचा गौरव.


सेवानिवृत्ती निमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धेत गौरव. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या शुभहस्ते परळी येथील कामगार कल्याण केंद्राचे केंद्रसेवक भगवान मंडलीक यांचा  सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आले.येथील कामगार कल्याण केंद्राचे केंद्रसेवक भगवान मंडलीक हे येत्या ३१ जानेवारी रोजी कामगार कल्याण मंडळाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे.
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने औरंगाबाद येथे राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळेस परळी येथील भगवान मंडलीक यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सेवापुर्ती निमित्त विशेष गौरव करण्यात आला. यावेळेस सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, कामगार कल्याण अधिकारी भालचंद्र जगदाळे, प्रसाद धस यांची उपस्थिती होती.

Monday, January 30, 2023

नितीन ढाकणे व दीपक गित्ते यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बीड जिल्हा कार्यकारणीवर निवड.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी येथील निर्भीड पत्रकार संपादक व सामाजिक कार्यकर्ते नितीन ढाकणे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बीड जिल्हाकार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. व तरुण तडफदार पत्रकार दीपक गित्ते यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र नागपूर येथील बैठकीत ठराव घेऊन नुकतेच त्यांना देण्यात आले आहे. पत्रकार नितीन ढाकणे व दीपक गित्ते यांच्या निवडीचे पत्रकार जिल्ह्यातील माहिती अधिकार महासंघ अशा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
नागपूर येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या झालेल्या बैठकीत ठराव घेऊन बीड जिल्हाकार्याध्यक्षपदी पत्रकार संपादक नितीन ढाकणे व पत्रकार दीपक गित्ते यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सदरील निवडीचे नियुक्तीपत्र दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी देण्यात आले आहे. 
मागील तीन वर्षापासून पत्रकार नितीन ढाकणे हे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे परळी तालुका संपर्कप्रमुख म्हणून काम करत होते. याचीच फलश्रुती म्हणून त्यांची जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
आपल्या पत्रकारीते बरोबरच सामाजिक आणि आपल्या श्री वैद्यनाथ सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून नितीन ढाकणे व दिपक गित्ते हे सामाजिक कामात ही अग्रेसर असतात या आधी त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत, नितीन ढाकणे हे कवी सामाजिक अभ्यासक, पत्रकार संपादक ,लेखक ,उत्कृष्ट वक्ते म्हणूनही पंचक्रोशीत ओळखले जातात त्याच प्रमाणे दिपक गित्ते यांचेही सोबतीने प्रभावी कार्य दिसून येते हे दोघेही बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. 
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर व शेखर उर्फ चंद्रभान कोलते कार्याध्यक्ष महाराष्ट्र यांनी पत्रकार नितीन ढाकणे व पत्रकार दीपक गित्ते यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र दिले आहे. या निवडीचे परळी शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवासह बीड जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी परळीत मतदानास सुरवात.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रिया सुरू असून दिनांक 30 रोजी प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी दि. २९ जानेवारी रोजी परळी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघासाठी परळी तालुक्यात तीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. परळी शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुक्यात धर्मापुरी व सिरसाळा येथे मतदान केंद्र असणार आहे. या मतदान प्रक्रियेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी दि.२९ जानेवारी या मतदान केंद्रांना भेटी दिल्या व प्रक्रियेचा आढावा घेतला. सोमवार दिनांक 30 जानेवारी रोजी मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी आठ ते चार या दरम्यान मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती यां केंद्रावर सकाळी ८.३५ वाजेपर्यंत एकूण 535 पैकी 15 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोस्त ठेवण्यात आला आहे.

मतदानासाठी या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात.मराठवाडा शिक्षक मतदार संघातील मतदारांचा घोळ काही संपेना.

         (कांतीकारी साथी न्युज)   प्रत्येक निवडणुकीमध्ये  मताचा टक्का वाढावा मतदान केंद्रापर्यंत मतदार पोहोचावा यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याच आपण यापूर्वी अनेक वेळा पाहिलं. मात्र याच्या विरुद्ध चित्र सध्या होऊ घातलेल्या मराठवाडा शिक्षक मतदार संघातील मतदारांचे झालेय. कारण मराठवाड्यातील शिक्षक मतदारांना मतदानासाठी या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जावे लागत आहे. त्यामुळे शिक्षक मतदारांच्या खिशाला कात्री तर बसतच आहे, पण होणारा मानसिक त्रास वेगळाच आहे. 
मूळचे लातूरचे असलेले उमाकांत गवळी सर गेल्या अनेक वर्षापासून ते गेवराई तालुक्यातील खळेगाव येथे एका संस्थेवर मुख्याध्यापक म्हणून सेवा देत आहेत. मात्र शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी त्यांना मतदान करण्यासाठी बीड वरून लातूरला जावं लागणार आहे. आता ही परिस्थिती एकट्या गवळी सरांची नसून उस्मानाबादचे कालिदास पांढरे यांना देखील बीडहून मतदान करण्यासाठी उस्मानाबादच्या तेर गावात जावं लागणार आहे. कारण मतदान नोंदणी करताना त्यांनी आधार कार्डवरचा मूळ पत्ता आणि सध्या राहत असलेला पत्ता दिला होता. पण नोंदणी करणाऱ्यांनी मूळ पत्ताच ग्राह्य धरला असून, ज्यामुळे मतदान करण्यासाठी या शिक्षकांना वेगवेगळ्या जिल्ह्यात जावं लागणार आहे.

*मूळ गावाचाच पत्ता गृहीत धरले जात आहे. 

आधारकार्ड बनवतांना बहुतांश जणांचा पत्ता मूळ गावाचाच नोंद केलेला असतो. मात्र पुढे व्यवसाय किंवा नोकरी निमित्ताने गाव सोडून अनेकदा इतर ठिकाणी स्थलांतर व्हावे लागते. मात्र या काळात आधार कार्डवर असलेला पत्ता सहसा कोणी बदलत नाही. त्यामुळे शहर किंवा गाव बदलेले असले तरीही आधारवरील पत्ता मात्र तोच कायम असतो. मात्र आता अशात केवळ आधार कार्डचा पत्ता ज्या गावचा आहे. त्या गावचे लोकेशन गृहीत धरून, परत मतदानासाठी त्याच गावात पाठवणे कितपत योग्य आहे,  असा प्रश्न या मतदारांनी उपस्थित केला आहे. 

*आहे त्याच ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळावा. 

राज्यातील काही खाजगी शिक्षण संस्था सोडल्या तर जिल्हा परिषद अथवा संस्थेतील शिक्षकांच्या सुद्धा कायम बदल्या होत असतात. या शिक्षकांचे कामाचे ठिकाण बदलले तरी आधार कार्डवरचा मूळ पत्ता मात्र तोच राहतो. त्यामुळे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत तरी शिक्षकांना आहे, त्याच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने केली आहे. 

तर अनेक शिक्षकांना एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यामध्ये मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जावे लागणार आहे. या निवडणुकीतील मतदारांचा आकडा जरी फार मोठा नसला, तरी या प्रक्रियेत सहभागी झालेल्या शिक्षकांना मात्र प्रशासनाच्या या कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

Sunday, January 29, 2023

नॅक, अकॅडमिक ऑडिट, भौतिक सुविधांची कसोटी. ३१ मार्चपूर्वी महाविद्यालयांच्या या तिहेरी परीक्षा उत्तीर्ण काॅलेजलाच संलग्नीकरण मिळणार.

औरंगाबाद (कांतीकारी साथी न्युज) पुढील शैक्षणिक वर्षांच्या सलग्नी करणासाठी महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन तसेच प्रत्येक महाविद्यालयाला अकॅडमिक ऑडिट करणे अनिवार्य असणार आहे. भौतिक सुविधांसंदर्भात ६२ महाविद्यालयांची तपासणी सध्या सुरू असून, त्या महाविद्यालयांसह यापूर्वी प्रवेशबंदी आणि दंडात्मक कारवाई झालेल्या २३ महाविद्यालयांनी भौतिक आणि शैक्षणिक सुविधांच्या त्रुटींची पूर्तता ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावी. या तीन कसोट्यांतून उत्तीर्ण महाविद्यालयांनाच पुढील शैक्षणिक वर्षाचे संलग्नीकरण विद्यापीठ देईल, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सांगितले.

भाैतिक व शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी विद्यापीठाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. नॅक, अकॅडमिक ऑडिटसाठी उच्च शिक्षण विभागासह विद्यापीठ वारंवार महाविद्यालयांना आवाहन करीत आहे. भौतिक सुविधांसह गुणात्मक शिक्षणासाठी महाविद्यालयांकडे विद्यापीठानेही लक्ष केंद्रित केले आहे. सुविधा देऊन संलग्नीकरणाचे सर्व निकष पूर्ण करतील त्याच महाविद्यालयांना विद्यापीठ पुढील शैक्षणिक वर्षासाठी संलग्नीकरण देईल. या वर्षी ४८५ महाविद्यालये संलग्नित आहेत. पुढील वर्षीच्या संलग्नीकरणासाठी महाविद्यालयांना नॅक, अकॅडमिक ऑडिट, भौतिक सुविधा पडताळणीच्या तिन्ही कसोट्या पूर्ण कराव्या लागणार असल्याचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी ठामपणे सांगितले. 

*६२ काॅलेजची तपासणी सुरू, १० अहवाल प्राप्त. 

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १० वर्षांपेक्षा जुन्या महाविद्यालयात प्राचार्य, प्राध्यापक, भौतिक सुविधा नाहीत, त्यांची तपासणी करीत आहोत. पहिल्या टप्प्यात २३ आणि आता ३९ अशा ६२ महाविद्यालयांची तपासणी कुलगुरूंच्या अधिकारात होत आहे. भाैतिक सुविधांच्या पडताळणी समितीतील काही प्राध्यापक परीक्षा आणि मूल्यमापनात व्यस्त असून, ३० जानेवारीपर्यंत तपासणी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १० महाविद्यालयांचे अहवाल आले. त्यांची सुनावणी घेऊन त्रुटीपूर्ततेची शेवटची संधी देऊ. शैक्षणिक सत्र सुरू असल्याने कारवाई करणार नाही, असे कुलगुरू म्हणाले.

*प्रत्येक महाविद्यालयाला अकॅडमिक ऑडिट अनिवार्य . 

प्रत्येक महाविद्यालयाचे शैक्षणिक अंकेक्षण अनिवार्य असणार आहे. ज्यांचे अकॅडमिक ऑडिट होणार नाही, त्या महाविद्यालयांना २०२३-२४ मध्ये संलग्नीकरण मिळणार नाही.

*कारवाई झालेल्या २३ महाविद्यालयांना अल्टिमेटम. 

कुलगुरूंनी गेल्या वर्षी २३ महाविद्यालयांना प्रवेशबंदीसह २ लाखांची दंडात्मक कारवाई केली. त्या महाविद्यालयांनी हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत त्रुटीपूर्तता करणे अपेक्षित आहे. त्यांना ३१ मार्चपर्यंत त्रुटीपूर्ततेचा शेवटचा अल्टिमेटम देण्याचे आदेश कुलगुरूंनी शैक्षणिक विभागाला दिले आहेत.

कामगार भजन स्पर्धेचे शानदार उद्घाटनभजन हे सामाजिक संस्कार निर्माण करणारे माध्यम- प्रधान सचिव विनिता वेद- सिंगल.


*कामगारांच्या जीवनात भजन आनंद फुलविते- कल्याण आयुक्त रविराज इळवे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : भजन हे ईश्वराशी संवाद साधण्याचा मार्ग आहे. भजनामुळे सामाजिक संस्कार निर्माण होते. समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा नष्ट करण्याचे मोठे माध्यम भजन असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात भजनाला प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद -सिंगल यांनी केले.
त्या  राज्यस्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
 यावेळी व्यासपीठावर लोकमत मीडिया प्रायव्हेट लि. चे मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष बालाजी मुळे, दै. सकाळचे निवासी संपादक दयानंद माने, सहाय्यक कामगार आयुक्त युवराज पडियाल, कल्याण आयुक्त रविराज इळवे, सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांची उपस्थिती होती.
 तणाव कमी करण्यासाठी भजन करणे गरजेचे असून, दुःख पेलण्याचे सामर्थ्य ही भजनामुळे  माणसात निर्माण होते. भजनाचे संस्कार प्रत्येकाने आपल्या मुलांना द्यावे असे आवाहन विनिता-वेद सिंगल यांनी केले. राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचे  भरभरून कौतुक ही यावेळी त्यांनी केले. 
पांडुरंगाचे नामस्मरणाने  नैतिकता निर्माण होऊन माणसाच्या आयुष्यात बदल होते, असे यावेळी  बालाजी मुळे म्हणाले. दयानंद माने,  युवराज पडियाल यांनी मनोगत व्यक्त केले.

*कामगारांच्या जीवनात भजन आनंद फुलविते- कल्याण आयुक्त रविराज इळवे. 

कामगारांच्या जीवनात भजनामुळे आनंद फुलते, आनंद फुलवण्याचे कार्य कामगार कल्याण मंडळ करत असल्याने मला समाधान असल्याचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यावेळी प्रस्ताविकात म्हणाले.
 या स्पर्धेची  सुरूवात लातुर येथील भजनी संघाच्या सादरीकरणाने झाली. दोन दिवसीय स्पर्धेत महिला व पुरुष यांचे ३८ भजनी संघाचे सादरीकरण होणार आहे.
 प्रस्ताविक विजय अहिरे यांनी केले आभार सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी मानले. 



काशी जगदगुरू डॉ.चंद्रशेखर महास्वामी यांच्या हस्ते संत गुरूलिंग स्वामी मंदीरास टयुब संच भेट. राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचा उपक्रम.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती,परळीच्यावतीने वैद्यनाथ मंदीर जवळील संत गुरूलिंग स्वामी मंदीरास लागणारे टयुबसंच ज्ञानसिंहासनाधिश्वर श्रीश्रीश्री 1008 जगदगुरू डॉ.चंद्रशेखर महास्वामी, काशीपीठ यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ष.ब्र.नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज, सोनपेठकर, ष.ब्र.चंद्रशेखर शिवाचार्य महाराज,माजलगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
लिभेर अप्लांयसेस इंडीया प्रायव्हेट लिमिटेड,शेंद्रा,औरंगाबाद येथील कंपनीचे वरीष्ठ व्यवस्थापक श्री.किरण बेंडाळे यांच्याद्वारे  सामाजिक बांधिलकी जपत सीएसआर अंतर्गत मंदीरास लागणा-या टयुब संचाची उपलब्धता करून देण्यात आली.
याकरिता राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे, पदाधिकारी सचिन सौंदळे तसेच सर्व सदस्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला तसेच तपोनुष्ठान समितीचे सचिव तथा एस.पी.सप्लायर्सचे प्रो.प्रा.संतोष पंचाक्षरी यांच्यावतीने मंदीरातील सर्व टयुबसंचाची फिटींग करून योगदान देण्यात आले. यावेळी वैजनाथ देवस्थानचे विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे, मन्मथ स्वामी जन्मोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.सुरेश चौधरी, संत गुरूलिंग स्वामी मंदीराचे अध्यक्ष दत्ताअप्पा ईटके गुरूजी, सचिव अ‍ॅड.गिरीष चौधरी, नगरसेवक चेतन सौंदळे,अनिल अष्टेकर, रमेशअप्पा सपाटे, माजी नगरसेवक सोमनाथ निलंगे, महादेव ईटके, रमेश चौंडे, संजय स्वामी सर, संतोष पंचाक्षरी, आश्विन मोगरकर, दयानंद चौधरी,जगदीश मिटकर, मकरंद नरवणे, रमेश चौधरी सर, सोमनाथ गोपनपाळे, गजानन चौधरी, कैलास भिमाशंकरअप्पा रिकीबे, नितीन समशेट्टे, डॉ.योगीराज बर्दापुरे, बाबासाहेब शिगे, बाळू स्वामी,अशोकअप्पा झाडे,महेश वेरूळे, शिवकुमार चौंडे, संतोष चौधरी, शिवकुमार केदारी, विकास हालगे, संदीप चौधरी, मन्मथ नरवणे, नंदूअप्पा शेटे, योगेश स्वामी, अनिल चौधरी, महेश स्वामी, रत्नेश बेलुरे, निरंजन गौरशेट्टे यांच्यासह सर्व समाज बांधव उपस्थित होते.

केज बस स्थानकावर महिलांच्या संरक्षणासाठी नियमित पोलीस यंत्रणा असावी - अँड मनिषा कुपकर


केज (प्रतिनिधी) केज बसस्थानका मध्ये ,प्रवाशी ये जा करणाऱ्या  माहीलांना शाळेतील कॉलेजच्या मुलींना काही मानसिक संतुलन बिघडलेल्या व टवाळ खोर वृत्तीचे पुरुष ञास  देतात .काही तक्रारी बरेच वेळेस आल्या आहेत .तरी महीला च्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन तात्काळ दखल घेऊन अशा प्रवृत्ती च्या लोकांवरवर  लक्ष ठेवून तात्काळ कारवाई करावी , तसेच बस स्टॅन्ड वर सीसीटीव्ही कॅमेरे वाढवावेत, पोलीस पेट्रोलिंग च्या फेऱ्या पण  वाढवाव्यात. अशी मागणी आज सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वाघमोडे साहेब यांच्याकडे केली ॲड मनिषा कुपकर शिवसंग्राम महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष यांनी केली. 

केज बसस्थानकावर शाळा कॉलेजच्या मुली येण्याच्या व जाण्याच्या वेळेला मानसिक संतूलन बिघडलेली टवाळखोर मुल मुलींना व महिलाना छेडछाड करतात . अनेक मुलींना व महिलाना याचा भयंकर त्रास होतो , विनाकारण बस स्थानकाच्या मध्यातून मागे जाण्यासाठी जागा सोडल्याने अनेक टवाळखोर मुल बसस्थानकात मुलीजवळ जाऊन बसणे , मुलींना मोकार बडबड करत त्रास देणे पाठलाग करणे , मोबाईल नंबर मागणे अश्लील बोलणे अश्या टवाळखोरावर आळा घालण्यात यावा . बस स्थानकात
मुलीजवळ जाऊन बसणे , मुलींना मोकार बडबड करत त्रास देणे पाठलाग करणे , मोबाईल नंबर मागणे अश्लील बोलणे अश्या टवाळखोरावर आळा घालण्यात यावा . बस स्थानकात चौवीस तास दोन पोलिसांची नियुक्ती करावी , बसस्थानकात चारही बाजुला सिसीटिव्ही बसवावेत व पेट्रोलिंगच्या फेऱ्या वाढवावी अशी मागणी केज पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी शंकर वाघमोडे यांच्या कडे शिवसंग्रामच्या जिल्हा अध्यक्ष ॲड मनिषा कुपकर यांनी केली आहे .

बेलापुरात ख्वाजा गरीब नवाज़ ची छट्टी मोठ्या उत्साहत साजरी.

बेलापूर (प्रतिनिधी) गौसे आजम सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य बेलापुर बु।। झेंडा चौक या ठिकाणी ख्वाजा गरीब नवाज यांच्या उर्स (छट्टी )मोठ्या उत्साहत मिठाई वाटप करुन साजरी करण्यात आली यावेळी जामा मस्जिद चे मौलना (धर्मगुरु) यांनी देशाच्या शांति व एकता साठी परमेश्वरा कड़े प्रार्थना केली गौसे आजम सेवा भावी संस्थे चे संस्थापक मुख़्तार सय्यद यांनी ख्वाजा गरीब नवाज यांच्या प्रतिमें ला पुष्प अर्पन केले. 
यावेळी गौसे आजम संस्थाचे अध्यक्ष सुल्तान शेख, उपध्यक्ष असीम शेख, सचिव नौसद शेख,गयाजभाई पठान, इरफ़ान शेख, रिक्शा यूनियन चे जीनाभाई शेख, रामगड शाखाचे अध्यक्ष तौफीक बागवान, भीम गर्जना तालुका अध्यक्ष रफीक शाह, गौसे आजम चे कार्याध्यक्ष नासिर शेख, इ उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायज पठान, सुल्तान शेख, असीम शेख यांनी अथक परिश्रम घेतले,

राज्यातल्या 2 हजार पेक्षा अधिक शाळांच्या कागदपत्रांची तपासणी होणार? शिक्षण आयुक्तांचा मोठा निर्णय.


पुणे (कांतीकारी साथी न्युज) : शिक्षण क्षेत्राला हादरून सोडणार निर्णय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी घेतला असून, राज्यातील 2 हजार 500 पेक्षा अधिक शाळांच्या कागदपत्रांची तपासणी करणार असल्याचे शिक्षण आयुक्तांनी सांगितले आहे. तसेच या तपासणी दरम्यान बनावट कागदपत्रं आढळल्यास अशा शाळांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

सविस्तर माहिती अशी की. राज्य मंडळाशी संलग्न शाळा वगळता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि अन्य मंडळांशी संलग्न सर्वच शाळांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी घेतला आहे. त्याअंतर्गत राज्यभरातील जवळपास दोन हजार सहाशेहून अधिक शाळांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार असून, त्यात कागदपत्रे बनावट आढळल्यास संबंधित शाळांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले की.! शाळांकडे तीन महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्यात शाळा सुरू करण्याचे प्रमाणपत्र, संलग्नतेसाठीचे राज्य शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि संबंधित मंडळाचे संलग्नता प्रमाणपत्र यांचा त्यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात शाळांकडून त्यांच्याकडे असलेल्या मूळ कागदपत्रांवरून साक्षांकित प्रत सादर करायची आहे. शाळांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. त्यातून कागदपत्रे बनावट आहेत का, हे स्पष्ट होईल. सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. या पडताळणीत काही गैरप्रकार आढळल्यास त्यानुसार फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांची पडताळणी सखोल आणि काळजीपूर्वक होण्याच्या दृष्टीने पडताळणीचा कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही. मात्र लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नावे आणि बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून सीबीएसई शाळांना बनावट ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या संदर्भातील पुण्यातील तीन शाळांची चौकशी करण्यात आली. त्या अनुषंगाने अधिक तपासणी केली असता पुणे परिसरातील अन्य काही शाळांची ना हरकत प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. शाळांना बनावट प्रमाणपत्र देणारी एक टोळी असल्याचे, या प्रमाणपत्रांसाठी लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचेही पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले. या संदर्भातील शिक्षण विभागाकडून पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली. तसेच अन्य ६६६ शाळांची माहिती यूडायस प्रणालीतील माहितीशी जुळत नसल्याचे आढळून आले. या पार्श्वभूमीवर या ६६६ शाळांसह आता राज्यातील राज्य मंडळ वगळता अन्य मंडळांशी संलग्न असलेल्या शाळांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


शेतकऱ्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळ्याने खळबळ नातेवाईकांचा हत्या झाल्याचा आरोप.


*ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

गेवराई (प्रतिनिधी): तालुक्यातील देवपिंपरी येथील ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास लावलेला अवस्थेत आज दुपारी २ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवल्याने काही वेळ तणावाचे वातावरण होते.

बंडू सखाराम सुरनर असे मृताचे नाव आहे. बंडू यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतातून जाण्याच्या रागातून शेजाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी बंडू सखाराम सुरनर व मुलगा भैयासाहेब यांना लक्ष्मण गवारे, अदित्य गवारे, विष्णू नलावडे यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी पोलीसांनी तक्रार घेतली नाही. रस्त्याच्या वादातूनच बंडू यांची तिघांनी मिळून गळफास देत हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

तसेच तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींच्या अटकेची मागणी केली. तोपर्यंत मृतदेह खाली उतरला जाणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. दरम्यान, गेवराई पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणला. येथेही आक्रमक होत नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखले. मध्यस्थीनंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.


गेट तोडून तलावातील पाणी सोडले नदीत, उन्हाळ्याच्या तोंडावर हजारो लिटर पाण्याचा अपव्यय.


धारूर (कांतीकारी साथी न्युज) : तालुक्यातील घागरवाडा साठवण तलावाच्या गेटचे कुलूप तोडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी ( दि. २४ ) घडला आहे. अज्ञाताने केलेल्या या कृत्याने शेती, पिण्यासाठीच्या पाण्याचा मोठाप्रमाणावर अपव्यय झाला असून उन्हाळ्यात याची झळ दहा गावातील ग्रामस्थांना बसणार आहे. 

चांगला पाऊस झाल्याने यंदा घागरवडा साठवण तलावात पाण्याचा साठा चांगला झाला होता. उन्हाळ्यात शेती आणि पाण्यासाठी जवळपास १० गावातील ग्रामस्थ या तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, मंगळवारी रात्री अज्ञाताने संरक्षक साखळी तोडत गेटची तोडफोड करत पाणी नदीपात्रात सोडले. मंगळवारपासून गेटमधून पाणी नदीपात्रात वाहत आहे. ही संतापजनक घटना आरणवाडी येथील भागवत शिनगारे व वंचित विकास आघाडीचे बाबूराव मस्के यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिले. 

दरम्यान, या प्रकारामुळे 0.65 मी. ने पाणी पातळी कमी झाली आहे. शिवाय रस्ता, इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. विनाकारण अमुल्य पाणीसाठी नदीपात्रात सोडल्याने ग्रामस्थांना रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी पुरेल का याची चिंता सतावत आहे. तसेच उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासू शकते. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून पाण्याचा अपव्यय करणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

*पाठबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले. 

तलावाच्या गेटची साखळी काढून पाणी सोडण्यात आलेला प्रकारास पाटंबंधारे विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. देखरेखची जबाबदारी असणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करावी. तसेच पुन्हा असा प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

परळी ते लातूररोड मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी. रेल्वेमार्गासाठी २५ केव्हीचे सबस्टेशन वीजपुरवठा करण्यासाठी सज्ज आहे.


परळी वैजनाथ (कांतीकारी साथी न्युज) : दक्षिण मध्य रेल्वेच्या परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड मार्गाचे विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, आज सायंकाळी विद्युतीकरणाची अंतर्गत तपासणी करून परळी ते लातूररोड मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात आली. 

परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड दरम्यानच्या रेल्वेमार्गासाठी २५ केव्हीचे  सबस्टेशन वीजपुरवठा करण्यासाठी सज्ज आहे. विजेवरील इंजिनाची अंतर्गत चाचणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रवासी रेल्वेची चाचणी घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात परळी ते पोखर्णी नृसिंह आणि परळी ते लातूररोड   मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची चाचणी आज करण्यात आली.

*प्रथमच विजेचे इंजिन. 

 प्रथम विजेचा पुरवठा केल्यानंतर पथकाकडून तपासणी केली जाईल. वीजपुरवठा व्यवस्थित सुरू आहे की नाही याची तपासणी केली जाते. अनावश्यक ठिकाणी विजेचा पुरवठा होत नाही ना, याची चाचपणी केली जाते. त्यानंतर विजेचे इंजिन चालवले जाईल. विजेच्या तारा तांब्याच्या असल्याने चोरी होण्याची शक्यता लक्षात घेता चोवीस तास वीजपुरवठा सुरू ठेवला जाताे.

*वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चाचणी . 

 डिझेल इंजिन व विद्युत इंजिनाची प्रत्यक्ष चाचणी व तपासणी करण्यात आली. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तांत्रिक विभागाचे अधिकारी विद्युत विभागाचे अधिकारी कंट्रोल रूम सबस्टेशनचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Saturday, January 28, 2023

लग्नात १५ वर्षांची मुलगी नटून आली अन् दागिने घेऊन पसार झाली.चोरी सी.सी.टी.व्हीत कैद.


*वैणू शिवमूर्ती कुडके (रा. बीड) यांचे पुत्र पवनराज यांचा २६ जानेवारीला धानोरा रोडवरील एका मंगल कार्यालयात विवाह होता. 


बीड :(कांतीकारी साथी न्युज) अंदाजे १४ ते १५ वर्षांची मुलगी, नवा कोरा ड्रेस, चेहऱ्याला मेकअप लावून लग्नात वन्हाडी बनून आली. लग्न सोहळ्यानंतर वरमाई नातेवाइकांना बोलण्यात मग्न असतानाचा मुलीने पर्स घेऊन पोबारा केला. दहा तोळे सोने व रोख ९० हजार रुपये असा सुमारे पाच लाख ९० हजार रुपयांचा ऐवज तिने लंपास केला. ही घटना गुरुवारी शहरातील एका मंगल कार्यालयात घडली.
वैणू शिवमूर्ती कुडके (रा. बीड) यांचे पुत्र पवनराज यांचा २६ जानेवारीला धानोरा रोडवरील एका मंगल कार्यालयात विवाह होता. विवाह सोहळ्यानंतर वरमाई वैणू कुडके या नातेवाइकांशी बोलण्यात व्यग्र होत्या. बोलताना त्यांनी स्वतःकडील पर्स खुर्चीवर ठेवली. यावेळी वऱ्हाडी बनून आलेल्या एका १४ ते १५ वर्षांच्या मुलीने पर्स अलगद उचलली व पळून गेली. पर्समध्ये अंगठी, गंठण, सोनसाखळी, नथ असे सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने व रोख ९० हजार असा एकूण पाच लाख ९० हजारांचा ऐवज होता.

चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

पर्स लंपास झाल्याचे लक्षात आल्यावर शोधाशोध सुरु झाली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा सगळा प्रकार निदर्शनास आला. शुक्रवारी वैणू कुडके यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून गुन्हा नोंद झाला. या अल्पवयीन मुलीसोबत अन्य एक जण असल्याचा पोलिसांचा कयास आहे.

मृत्यू जवळून पाहिला.कानिफनाथ डोंगराच्या वळवळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात लोखंडी रेलिंग कारच्या आरपार गेली.


कडा (कांतीकारी साथी न्युज)  कुटुंबासह गावी जात असताना चालकाचा वळणावर अचानक ताबा सुटल्याने सुरक्षेसाठी लावलेला लोखंडी रेलिंग थेट कारमध्ये घुसला. यात एकाच कुटुंबातील चारजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपरीघाट परिसरात झाला.

बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्गावरून नांदेड येथे आई-वडिल, मुलगा आणि सून जात कारमधून ( एम.एच २९,ए.आर. २५९६) जात होते. आष्टी तालुक्यातील पिंपरीघाट येथील कानिफनाथ डोंगराच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूच्या सुरक्षा कठड्यावर आदळली. जोरदार धडकेने लोखंडी रेलिंग थेट कारमध्ये घुसली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. अपघातात एकाच कुटुंबातील चारजण जखमी झाले आहेत. जखमींवर नगर येथे उपचार सुरु असून नावे समजू शकली नाहीत.  

शिक्षण क्षेत्रात थाटलाय बोगस इंग्लिश शाळांनी बाजार, पालकांची केली जातीये आर्थिक लूट....!


चाकण (प्रतिनिधी) : चाकण शहरात अनेक बोगस इंग्लिश शाळा भरवल्या जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहेचाकण शहरात रहिवाशी वस्तीत RTE सर्व नियम धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात या शाळा भरवल्या जात असल्याची माहिती उघड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता थेट रहिवाही वस्तीत एक छोटासा फ्लॅट घेऊन त्यात अशा इंग्लिश माध्यमाच्या शाळा भरवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एका विद्यार्थ्याकडून १२ ते १५ हजार फी वसूल करून त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुख सुविधा न देता फक्त पैसे कमवायचा धंदा म्हणून या शाळा उघडल्या गेल्या असल्याचे प्रथमदर्शी दिसते आहे. या प्रकारात LKG व UKG अशा दोन प्रकारच्या शाळांचा समावेश होतो. यातील LKG(Lower Kindergarten) मध्ये तीन ते चार वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्यांच्याकडून १२ हजाराच्या वर फी आकारनी केली जाते. तर UKG(Upper Kindergarten) मध्ये चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना शिक्षण दिले जाते. यांच्याकडून १५ हजाराच्या वर फी आकारणी केली जाते. या दोन्ही टप्प्यात विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया रचला जातो. सर्वात प्रथम मुलं नर्सरी आणि LKG मध्ये शिक्षण घेतात. दोन्ही ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर त्यांना UKG मध्ये प्रवेश मिळतो. UKG हा पहिलीच्या वर्गात जाण्यापूर्वीचा टप्पा असतो. पण या पहिल्या टप्प्यातील शिक्षणाचा दर्जा बघितला तर त्यावर चर्चा न केलेलीच बरी अशीच काहीशी परिस्थिति चाकण मधील या बोगस इंग्लिश शाळांची दिसून येते.

प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा केला मात्र वेळेत राष्ट्रध्वज उतरवला नाही; आरोग्य सेविकेवर गुन्हा दाखल.

*वेळेवर राष्ट्रध्वज उतरवला नाही म्हणून आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर (प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे शिरोळ वांजरवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले होते.परंतु वेळेवर राष्ट्रध्वज उतरवला नाही म्हणून आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नवाज चाँदपाशा तांबोळी यांनी तक्रार दिली आहे.ते संध्याकाळी 7 वाजता शेतातून घराकडे परत जात असताना शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील राष्ट्रध्वज उतरवला नसल्याचे दिसून आले.आरोग्य सेविका अरुणा सूर्यकांत राठोड यांना त्यांनी मोबाईलवर संपर्क साधून राष्ट्रध्वज उतरवला नसल्याचे सांगितले.
त्यांनी आशा कार्यकर्ती मुक्ताबाई बाळासाहेब जाधव यांना राष्ट्रध्वज उतरवण्यास सांगितल्याचे सांगून फोन ठेवून दिला.त्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांना आणि पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी येळेकर यांच्या हस्ते रात्री 9.30 वाजता राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक उतरवण्यात आला. राष्ट्रध्वज वेळेत उतरवला नाही म्हणून वैद्यकीय अधिकारी येळेकर आणि आरोग्य सेविका अरुणा सूर्यकांत राठोड यांच्याविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या हाती लागली गोपनीय माहिती, हॉटेलमध्ये धाड टाकताच सापडलं मोठं घबाड.

गेवराई :(प्रतिनिधी एका हॉटेलमध्ये विक्रीसाठी आणण्यात आलेला २५ किलो गांजा पोलिसांनी पकडला आहे. ही कारवाई गेवराई शहराजवळ करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गेवराई पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे यांना बाह्यवळण रस्त्याजवळच्या हॉटेलमध्ये २५ किलो गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. यावरून मध्यरात्री पोलिसांच्या पथकाने तात्काळ हॉटेलमध्ये जाऊन झडती घेतली असता २५ किलो गांजा सापडला. याप्रकरणी पोलिसांनी गौसखान अमनउल्ला खान वय ४५ वर्ष, रा.गेवराई याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत मात्र आता जिल्ह्याभरात याआधी देखील अमली पदार्थाची जोरदार विक्री सुरू असल्याचं पाहायला मिळालं.
जिल्हाभरात गांजा आणि नशेचे इतर साहित्य हे गल्लोगल्ली मिळताना पाहायला मिळतात मात्र यावर पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही असं प्रश्न सध्या नागरिक उपस्थित करत आहेत. परळी, गेवराई, आष्टी, अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये सर्रास तरुण टोळकी ही नशा पाणी करून लोकांना लुटण्याचा काम आणि हप्ते गोळा करण्याचे काम देखील या ठिकाणी याआधी देखील अनेक घटनेतून पाहायला मिळालं.

Friday, January 27, 2023

९२ हाजाराचा गुटखा पकडला.दोघांवर गुन्हा दाखल.आय.पी.एस.पंकज कुमावतांच्या पथकाची कारवाई.

बीड (प्रतिनिधी)ः-महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा बीडमध्ये सर्रास विक्री होतांना दिसून येत आहे. आपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटखा विक्री करणार्‍या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 92 हजाराचा गुटखा जप्त केल. ही कारवाई काल (26 जानेवारी रोजी) केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे करण्यात आली.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे. गुटख्याला बंदी असतांनाही गुटखा माफिया शासन- प्रशासनातील अधिकार्‍यांना हाताशी धरुन जिल्ह्यात सर्रास पणे गुटख्याची तस्करी केली जात आहे. का आयपीएस पंकज कुमातव यांना चिंचोलीमाळी येथे गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली हेाती. त्यांनी तत्काळ आपले पथक त्या ठिकाणी पाठवत कारवाई केली. यावेळी आकाश इंगळे (रा.कळम) धनराज चंदनशिव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 92 हजाराचा गुटखा जप्त केला. त्यांनी तो गुटखा कोठून आणला याचा पोलिस तपास करत आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, पंकज कुमातव यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर,रामहरी भंडाणे, संजय टुले, विकास चोपणे यांच्यासह आदींनी केली.

बीड जिल्ह्यात दहावीचे 41 तर 12 वीचे 38 हजार विद्यार्थी देणार परीक्षा.


बीड (प्रतिनिधी) दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बीड जिल्ह्यात बारावीचे 38 हजार 929 तर दहावीचे 41 हजार 521 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

21 फेब्रुवारी ते 21 मार्च या दरम्यान बारावीची तर 2 ते 25 मार्च या कालावदीत दहावीची परीक्षा होणार आहे. बीड जिल्ह्यात बारावीचे 101 परीक्षा केंद्र आहेत. 15 परीरक्षक केंद्र असून 38 हजार 921 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीचे 156 परीक्षा केंद्र तर 15 परीरक्षक केंद्र असून 41 हजार 521 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

जि प प्रा शा संगम येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) संगम येथे 74 वा प्रजासत्ताक दिन निमित्त जि प प्रा शा संगम येथे मुख्याध्यापक श्री अशोक नावंदे  सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संगम गावचे सरपंच श्री अच्युत चव्हाण उपसरपंच निलाबाई कामाळे,सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री नवनाथराव नागरगोजे,उपाध्यक्ष व सर्व सदस्य,जेष्ठ नागरिक ,शिक्षक ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी गावातून   वाजता गाजत देशभक्ती घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली . 
त्यानंतर विद्यार्थ्यांची कवायत,डँबेल्स, लेझीम इ प्रकार घेण्यात आले, मनोरे तयार करून व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध  देशभक्ती गीतावर नृत्य सादर करून  उपस्थितांची मने जिंकली
 यावेळी ग्रामपंचायत संगम  यांच्या वतीने विध्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप व गरजू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले
खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अशोक नावंदे,श्री महादेव गित्ते सर,श्री सचिन फड सर ,श्रीम. बबिता शिंदे मॅडम व शा व्य समिती अध्यक्ष श्री नवनाथराव नागरगोजे यांनी परिश्रम घेतले यावेळी शाळेच्या या उपक्रमाचे सरपंच ,पालक व उपस्थित सर्वांनी  कौतुक केले व सरपंच श्री अच्युतराव चव्हाण यांनी शाळेसाठी सर्वोतोपर मदत देण्याबाबत आम्ही नेहमीच प्रयत्न करणार आहोत असे सांगितले.

परचुंडी येथे प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परचुंडी येथे 74 वा प्रजासत्ताक दिन निमित्त जि प प्रा शा परचुंडी येथे श्री निलेवार सर यांनी तर ग्रामपंचायत कार्यलय परचुंडी येथील ध्वजारोहण सरपंच सौ मीना गुरुलिंग नावंदे यांनी केले.
या वेळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांची वेशभूषा करून व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. 

 यावेळी प्रेस फोटोग्राफर व गावचे भूमिपुत्र भीमाशंकर नावंदे यांच्या वतीने विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले . श्री नावंदे यांनी यावेळी शाळेच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले व शाळेसाठी सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच व सर्व सदस्य ,ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक सचिन निलेवार सर यांनी मानले

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात आला.
26जानेवारी 2023 भारत देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक (गणराज्य) दिन देशभर मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात येत असून याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी 8:10 वाजता राष्ट्रपती महात्मा गांधी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी महाविद्यालयाचे प्रा. ए.ए. मुंडे मॅडम,प्रा.एस.आर.कापसे, प्रा.यु.एन.फड,प्रा. ए.डी. शेख, प्रा. पी.पी. परळीकर,ए.डी. आघाव, व्ही.एन.शिंदे, जी. व्ही. कांबळे,यु.बी.जगताप , एम.पी.सातपुते, एन. व्ही. दळवी यांच्या सह प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

वडवणीत मेडिकल मालकाला मारहाण शहरात तणाव पुर्ण शांतता.



पोलीस स्टेशनला जमाव, दंगल नियंत्रण पथकाला पाचारण,
जयसिंह सोंळके देखील तळ ठोकून, डिवयएसपी बच्चू पोलीस स्टेशनला दाखल. 

वडवणी (प्रतिनिधी):- वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मेडिकल मालकाला नि;शुल्क कारणावरुन रात्री मारहाण झाली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करावी तसेच शहरासह तालुक्यातील अवैदय धंदे बंद करण्यात यावेत.यामागणीसाठी आज सकाळपासूनच पोलीस स्टेशनला गर्दी जमली होती यांचे पडसाद दुपारी साडेबारा नंतर बाजार पेठेवर झाले असून मुख्य बाजार पेठ देखील बंद झाली आहे.शहरात तणाव पूर्वक शांतता दिसून आली आहे.तर दंगल नियंत्रण पथकासह माजलगांवचे डिवायएसपी धिरजकुमार बच्चु हे देखील पोलीस स्टेशनला दाखल झाले आहेत.या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.परंतु कोणते गुन्हे दाखल झाले आहेत.आरोपी कोण आहेत.हे उशीरा पर्यत समजू शकलेले नाही.दीड वाजण्याच्या सुमारास उपस्थित जमावा समावेश डिवायएसपी बच्चू यांनी चर्चा केली असून यामध्ये आरोपीला पाठीशी घालणार नाहीत तसेच अवैद्य धंदा विरोधात कडक मोहिम राबवली जाईल या अश्वासना नंतर जमाव पागवण्यात आला आहे.तर वडवणी पोलीस स्टेशनमध्ये जयसिंह सोंळके यांच्यासह स्थानिक नेते मंडळी देखील उपस्थित आहेत.

परळी नगरपालिकेच्या इमारतीवरून उडी मारून आत्‍मदहनाचा प्रयत्‍न; रखडलेल्या कामासाठी संतप्‍त तरुणाचे पाऊल.

*नगरपालिकेच्या इमारतीवरून उडी मारून आत्‍मदहनाचा प्रयत्‍न; रखडलेल्या कामासाठी संतप्‍त तरुणाचे पाऊल. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात दोन टर्मपासून असलेल्या परळी नगरपालिके विरोधात तरुणाने आक्रमक पवित्रा घेतला. शहरातील रखडलेल्या कामासाठी अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलन करून दखल घेतली जात नाही. यामुळे तरुणाने नगरपालिकेच्या इमारतीवरून उडी मारून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदर तरुणास पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्‍यामुळे होणारा अनर्थ टळला आहे. 

Thursday, January 26, 2023

भाजप नेत्यांना मा.मंत्री पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढणार?, ताब्यात असलेल्या वैद्यनाथ बँकेला आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस.

*भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्या ताब्यात असलेल्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन को- ऑप बँकेला बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली आहे.

बीड (प्रतिनिधी) भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्या ताब्यात असलेल्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन को- ऑप बँकेला बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली आहे. 24 जानेवारी रोजी कोट्यवधींच्या गैर व्यवहारा संदर्भात ही नोटीस बजावली असून 31 जानेवारी रोजी समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे बँकेला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

परळी वैद्यनाथ येथे असलेली ही बँक पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. या बँकेंच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे संचालक या संचालक आहेत. उस्मानाबादच्या कळंब येथील शंभू महादेव कारखान्याच्या लिलावात अटी, शर्थीचे उल्लंघन केल्याचा वैद्यनाथ बँकेवर आरोप आहे. दरम्यान, वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेचे सभासद सुभाष कारभारी निर्मळ रा. आर्य समाज मंदिराजवळ, परळी यांनी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात 5 जानेवारी 2023 रोजी अर्ज देऊन गैरव्यवहराची चौकशी करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली होती.

तक्रारीचे अर्ज आल्याने पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तपासाचा भाग म्हणून, दि. वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेला पोलिसांनी नोटीस पाठवली असून 31 जानेवारी रोजी समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे बँकेला देण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सुभाष कारभारी निर्मळ यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार करत वैद्यनाथ बँकेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपअधिक्षक संतोष वाळके यांनी सहायक निरीक्षक सुजित बडे यांच्याकडे चौकशी सोपविली आहे. 

त्यानुसार चौकशीचा भाग म्हणून, अर्जातील आरोपाच्या अनुषंगाने म्हणणे सादर करण्यासाठी वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत व मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खर्चे यांना सहायक निरीक्षक बडे यांनी नोटीस बजावली आहे. तसेच 31 जानेवारी रोजी समक्ष हजर होऊन कागदपत्रांसह खुलासा करावा, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

काय आहेत तक्रारदाराचे आरोप ?

सुभाष कारभारी निर्मळ यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीवरून, संपूर्ण रक्कम जमा होण्यापूर्वी कारखान्याचा ताबा दिला. शिवाय तात्काळ बेकायदेशीररीत्या कर्ज वितरण केले. वैद्यनाथ बँकेची 65 कोटी व इतर बोजा 41 कोटी अशी एकूण 106 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असा सुभाष निर्मळ यांचा आरोप आहे.

तसेच वैद्यनाथ बँकेकडे हावरगाव ता. कळंब येथील शंभू महादेव शुगर अलाइड प्रा.लि. कारखाना गहाण होता. त्यावर वैद्यनाथ बँकेसह इतर बँकांचा बोजा होता. शंभू महादेव कारखान्याने मुदतीत कर्ज रक्कम परत न केल्याने कारखाना लिलावात काढला. मात्र, लिलाव प्रक्रियेत अटी, शर्थीचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप सुभाष निर्मळ यांनी केला आहे.

दरम्यान यावर वैद्यनाथ बँकेचे सीईओ विनोद खर्चे यांनी म्हटलंय, की हे प्रकरण आधीच उच्च न्यायालयात सुरु आहे. परळी शहर पोलिस ठाण्यातही संबंधितांनी तक्रार दिली होती. तेथे आम्ही आमची बाजू मांडलेली होती. आता 31 जानेवारीला आर्थिक गुन्हे शाखेकडे आम्ही आमचे म्हणणे सादर करू असे विनोद खर्चे म्हणाले आहेत.


शॉट सर्किटमुळे गोठा जळून खाक.आगीत ४ म्हशी, ३ वासरे होरपळली, लाखोंच्या शेतमालाची राख.

केज (प्रतिनिधी) : शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने  सोयाबीन, कापूस, केबल वायर, पेंड, दिवाण, कपडे आदी साहित्य जळून खाक झाले. तर ४ म्हशी आणि ३ वासरे गंभीररित्या भाजल्याने शेतकरी गोविंद बारगजे यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी टाकळी येथे घडली.
गोविंद बारगजे हे टाकळीपासून जवळच असलेल्या डोणगाव येथे बैलगाडीद्वारे ऊसतोडीचे काम करतात. मंगळवारी सकाळी गोठ्यात 4 म्हशी, 3 वासरे बांधून बारगजे ऊस तोडणीसाठी गेले. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे गोठ्यात अचानक आग लागली. यात 20 पोते सोयाबीन, 5 क्विंटल कापूस, 5 क्विंटल पेंड, केबल वायर, दिवाण, कपडे आणि गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. तर 4 म्हशी, 3 वासरे गंभीररीत्या भाजले आहेत. यात शेतकऱ्याचे जवळपास 2 लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करून शासकीय मदत देण्याची मागणी बारगजे यांनी तहसीलदार डी. सी. मेंडके यांच्याकडे केली आहे. 

एक म्हैस दावे तोडून पळाल्याने वाचले इतरांचे प्राण

आगीत होरपळलेल्याने एक म्हैस दावे तोडून गोठयाबाहेर आली. तेव्हा शेजारच्या शेतकऱ्यांचे लक्ष गोठ्याकडे गेले. त्यानंतर नाथ्याबा बारगजे यांनी लागलीच 3 म्हशी व वासराचे दावे कुऱ्हाडीने तोडले. यामुळे त्यांचे प्राण वाचले मात्र म्हणी आणि वासरे गंभीर भाजले आहेत. पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रीतमकुमार आचार्य त्यांच्यावर उपचार केले. याप्रकरणी आपत्कालीन पंचनामा करण्याचे आदेश संबंधित तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती तहसीलदार डी. सी. मेंडके यांनी दिली आहे.

गेवराईच्या अवैध वाळू प्रकरणी तहसिलदार सचिन खाडे यांना नोटीस.

गेवराई (प्रतिनिधी)  गेवराई तालुक्यात महसूल पथकाने अडीज महिन्यांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेल्या दोन हायवांवर १८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. चालकांविरुद्ध फिर्याद देत मालकांना मोकळे सोडले. या आधारावर "तस्करी वाळूची, गुन्हा फक्त चोरीचा, कलमाला फाटा" या मथळ्याखाली बातमी दिली त्याची दखल घेत. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांना लेखी खुलासा करण्यासंदर्भाने नोटीस बजावली आहे.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिलेल्या नोटीसमध्ये बातमीचा उल्लेख असून इतर गंभीरबाबींचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. सदरील नोटीशीनुसार, अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणात कारवाई व नियंत्रण ठेवण्यात येत नसल्यामुळे गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन व वाहतुकीच्या घटना निदर्शनास येत आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या कोणत्याही शासन निर्णयान्वये कारवाई होत नसल्याचे निदर्शनात येत आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीच्या प्रकरणामध्ये जाणुनबुजून निष्काळजीपणा करत असल्याचे दिसून येत आहे. ही अत्यंत खेद जनक बाब असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणात कारवाई होत नसल्यामुळे गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन व वाळू वाहतुकीचे प्रकार निदर्शनास येत आहेत. मागील १५ दिवसात जिल्हास्तरीय पथकाकडून अंदाजे १५०० ते २००० ब्रास वाळू गेवराई तालुक्यात जप्त करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत असल्याची आपणास कल्पना नसणे ही नक्कीच संशायास्पद आहे. जिल्हास्तरीय पथकाकडून राक्षसभुवन येथे ७५० ब्रास जप्त वाळू चोरी जाईपर्यंत आपण कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे शासनाने आर्थिक नुकसान झाले आहे. ही निश्चितच आपली जबाबदारी आहे. 
शासकीय कामात जाणून-बुजून निष्काळजीपणा करत असून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत नाहीत. सदरील वर्तन हे अत्यंत बेजबाबदारपणाचे असून आदेशाचा अवमान करणारे आहे. शासकीय कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष हे गंभीर स्वरुपाचे आहे. आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करु नये ? याचा लेखी खुलासा सादर करावा असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी गेवराईचे तहसिलदार खाडे यांना पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Wednesday, January 25, 2023

शिवशक्ती -भीमशक्ती असं ठाकरे-आंबेडकर यांच्या युतीला म्हणू नये. तर शिवशक्ती-वंचितशक्ती म्हणावं :ना.रामदास आठवले

मुंबई ( कांतीकारी साथी न्युज) वंचित बहुजन विकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युती झाली. मुंबई महापालिकेत ते एकत्र निवडणूक लढविणार आहेत. यावर बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले  म्हणाले, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलेले आहेत. या युतीला भीमशक्ती-शिवशक्ती म्हणता येणार नाही. भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला होता. बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही त्यांच्यासोबत होतो. २०१२ मध्ये शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली होती
शिवसेना, भाजप आणि आरपीआय एकत्र आली होती. त्यावेळी महायुती झाली होती. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे आता एकत्र आले आहेत. पण, त्याचा राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होणार नाही, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात कुणाचं चालू देणार नाही

भाजपची मोठी ताकद देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनाही मजबूत होत आहे. आमचा रिपब्लिकन पक्षही मजबूत आहे. आम्ही तिघेही एकत्र असल्यानं महाराष्ट्रात कुणाचं चालू देणार नाही, असंही रामदास आठवले यांनी ठणकावून सांगितलं.

शिवशक्ती-वंचितशक्ती म्हणावं

प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले. पण, भीमशक्ती आमच्यासोबत आहे, असा दावाही रामदास आठवले यांनी केला. त्यामुळं शिवशक्ती -भीमशक्ती असं ठाकरे-आंबेडकर यांच्या युतीला म्हणू नये. तर शिवशक्ती-वंचितशक्ती म्हणावं.

आम्हाला आव्हान देणे शक्य नाही

राजकारणात कोणीही कोणासोबत जावं. हा त्यांचा अधिकार आहे. आमची ताकद मोठी आहे. त्यामुळं आमच्या ताकदीला आव्हान देणं हे महाविकास आघाडीला शक्य नाही. त्यात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनाही शक्य नाही, असंही रामदास आठवले यांनी सांगितलं

प्रजासत्ताक दिन विशेष : जीवनात आध्यात्मिक प्रजासत्ताकाचे महत्त्व.


*गुरुदेव श्री आशुतोष महाराज जी* *_(संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान)_*

 प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. दरवर्षी २६ जानेवारीला साजरा केला जातो. स्वतंत्र प्रजासत्ताक होण्यासाठी आणि देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही व्यवस्थेसह संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. त्याचप्रमाणे, एक आध्यात्मिक प्रजासत्ताक आपल्या जीवनात देखील लागू होते. त्याबद्दल आपल्यापैकी बहुतेकांना माहिती नाही. ज्याची आजच्या काळात नितांत गरज आहे. असे शिक्षण, नियम ज्यामुळे मनुष्याचा आंतरिक विकास होऊ शकतो. आपल्या भारतीय संस्कृतीचा गाभा असलेले अध्यात्म आपल्या जीवनात, आचरणात आणण्याची गरज आहे. असे होऊ नये की आपण आपले जीवन असेच विस्कटलेले पाहत राहू आणि अधोगतीच्या खाईकडे नेऊ. म्हणूनच हे समजून घेतले पाहिजे की ते कोणते शिक्षण आहे ज्याबद्दल आपले शास्त्र सांगते - सा विद्या या विमुक्तये.
            ज्ञान तेच आहे जे मुक्ती देते. ज्यामुळे आपल्या बाह्य विकासाबरोबर  अंतर्गत विकासही होतो असे ज्ञान आवश्यक आहे. केवळ शिक्षणानेच अंतर्गत विकास होऊ शकत नाही. त्यासोबतच दीक्षेचा समन्वय खूप महत्त्वाचा आहे. दीक्षेची व्याख्या करताना आपले वेद-उपनिषद अगदी छान सांगतात- 'भस्माने झाकलेला अग्नी ज्या प्रकारे मुखातून प्रेरीत झालेल्या वायूने प्रज्वलित होतो.योग्य वेळी पेरलेले बियाणे फलदायी होऊन बहरते. त्याचप्रकारे गुरूंनी दिलेले आत्मज्ञान एखाद्या व्यक्तीच्या / शिष्याच्या/ विद्यार्थ्याच्या जीवनात सद्गुण निर्माण करतात.
           आज प्रत्येकजण पॅटर्न बदलण्याचा प्रयत्न करत आहे. पण रचनेत बदल करायचा असेल तर आधी साचा बदलावा लागतो. म्हणूनच शास्त्र-वेद-ग्रंथांनी घोषित केले की आचार्यांना प्रथम बाह्य ज्ञानाबरोबरच आंतरिक ज्ञानही असले पाहिजे, तरच ते विद्यार्थ्याचा पूर्ण आणि सर्वांगीण विकास करू शकतील.
            आज समाजात अशा नवीन व्यवस्थेची गरज आहे जी आपल्या मुलांचा पूर्ण विकास करेल. त्यांच्यात पूर्ण व्यक्तिमत्व निर्माण करेल. परमपूज्य सर्वश्री आशुतोष महाराज जी यांनी दिव्य ज्योति जाग्रति संस्थेच्या माध्यमातून असे संपूर्ण व्यक्तिमत्व घडविण्याचे काम हाती घेतले आहे. महाराज जींच्या कृपेने 'मंथन'. असा एक शिक्षण प्रकल्प ज्यामध्ये असे शिक्षक आहेत जे आतून जोडलेले आहेत आणि त्यांच्यात विद्यार्थ्यांना आतून जोडण्याची ताकद आहे. संपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी बाह्य शिक्षण आणि अंतर्गत दीक्षा या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, असे महाराज जी अनेकदा सांगतात. यामुळेच आज महाराज जी समाजातील प्रत्येक जीवाला त्या ज्ञानाने जोडत आहेत. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील अध्यात्मिक प्रजासत्ताक कार्यान्वित होऊन व्यक्ती समाजाच्या उभारणीस सहकार्य करू शकेल.
            भारत हे स्वतः एक स्थिर संस्कृतीचे प्रतीक आहे. भारत = भा + रत ; भा म्हणजे प्रकाश, रत म्हणजे  मग्न. जो नेहमी दिव्य प्रकाशात मग्न असतो तो भारतीय असतो. असा देश ज्याच्या नावानेच त्याचे वैभव आणि प्रतिष्ठा वर्णीत होते. सत्याचा मूळ स्त्रोत असल्याचा महिमा फुलवितो. हेच आध्यात्मिक प्रजासत्ताक व्यक्तीच्या जीवनाचा एक आवश्यक भाग आहे. तरच आपले जीवन परिपूर्ण होऊ शकते. दिव्य ज्योति जाग्रति संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

किसान सभेच्या वतीने ट्रँक्टर मोर्चा शेतकरी राँम्प वाजवत मोर्चाने वडवणी करांचे लक्ष वेधून घेतले.

वडवणी (प्रतिनिधी):- पिक विमा सह नुकसान भरपाई अनुदान देण्यासाठी सरकार व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उशीर होत आहे.यासह अन्य मागण्यासाठी वडवणी शहरात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास किसान सभेच्या वतीने ट्रँक्टर मोर्चा काढत मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकविला आहे. तर ट्रँक्टरमध्ये शेतकरी राँम्प गाण वाजवित या मोर्चाने वडवणीकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
सदरील मोर्चा आज दुपारी 12 वा. वडवणी शहरातील विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघला असून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग छत्रपती संभाजी महाराज चौक तहसिल कार्यालयावर धडकला आहे. यामध्ये शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळवून देणारा कायदा करण्यात यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शेतकरी हिताच्या सर्व शिफारसी लागू करण्यात याव्यात, वीज विधायक वापस घ्यावे, घोषित अतिवृष्टी अनुदान तातडीने वाटप करावे, पीक नुकसानीच्या प्रमाणात पीक विमा वितरित करा व वितरणात पारदर्शकता आणण्यात यावी, वन्य प्राण्यांपासून शेती वाचविण्यासाठी शंभर टक्के अनुदानित कुंपणाची सुविधा द्यावी, वडवणी तालुक्यातील देवडी व साळिंबा फिटरच्या शेतकर्‍यांना दिवसा आठ तास योग्य दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा. यासह अन्य मागण्यासाठी सदरील मोर्चा किसान सभेच्या वतीने काढण्यात आला आहे.तर या मोर्चात तब्बल 25 ट्रँक्टरचा सहभाग होता.तर या ट्रँक्टरमध्ये शेतकरी राँम्प आवाजात गीत तयार करुन मोर्चात गीत वाजविण्यात आले आहे. तर यावेळी उपस्थित किसान सभेच्या कार्यकर्त्यासह किसान पुत्रानी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणा देऊन मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली असून या मोर्चाने वडवणीकरांचे मात्र विशेष लक्ष वेधून घेतले आहे.या मागण्याचे निवेदन वडवणी तहसिल प्रशासनानाला देण्यात आले आहे.

खळबळजनक : खामगावच्या ‘त्या’ सात जणांची हत्याच.पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीत फेकले.चुलत भावांनीच कुटुंबाला संपवले.


पुणे (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यात दौंड परिसरात पारगाव येथील भीमा नदीत काल मंगळवारी 7 जणांचा मृतदेह आढळला होता. मुलाने पळून जाऊन लग्न केल्याने संबंधित कुटुंबाने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र पोलिसांच्या तपासात या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. 3 चिमुरड्यासह 7 जणांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.

चार चुलत भावांनीच कुटुंब प्रमुखासह सात जणांची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत. पवार कुटुंबीयांनीच आपल्या मुलाचा अपघात करुन त्याचा खून केल्याचा संशय एका चुलत भावाला होता. त्यातून त्याने इतर तीन भावांसह पवार कुटुंबातील 7 जणांची हत्या केली व नंतर त्यांचे मृतदेह भीमा नदीत फेकल्याचे तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अशोक कल्याण पवार (वय 40), श्याम कल्याण पवार (वय 30 ), प्रकाश कल्याण पवार (वय 32) आणि आणखी एक त्यांचा भाऊ अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. मृतक मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत. मोहन पवार यांच्या मुलासोबत
आरोपींचा एक मुलगा दुचाकीवर काही दिवसांपूर्वी गेला असताना त्याचा अपघात झाला होता. या घटनेत सदर मुलगा गंभीर जखमी होऊन त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, चार दिवस ही बाब पवार कुटुंबाने मुलाच्या पालकांना सांगितले नव्हती. या घटनेत दुर्दैवाने मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेव्हा आपल्या मुलाचा खून हा पवार कुटुंबीयांनी केल्याचा संशय चुलत भावांना होता. या रागातून त्यांनी पवार कुटुंबीयांच्या खुनाचा कट रचला.
घटनेच्या दिवशी आरोपींनी चुलत भाऊ मोहन पवार व त्याच्या कुटुंबीयांना गावाला जाऊ, असे सांगितले आणि गाडीत बसवले. त्यानंतर ते भीमा नदी पात्राच्या जवळ गेले. तेथे आरोपींनी 7 जणांना मारून त्यांचे मृतदेह भीमा नदी पात्रात फेकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी नेमके कशाप्रकारे मयतांना मारले, त्यांच्या खुनामागे नेमके अजून कोणते इतर कारण आहे का?, याबाबत पुणे ग्रामीण पोलिस यांची स्थानिक गुन्हे शाखा तपास करत आहे.


*सुरुवातीला आत्महत्येचा अंदाज. 

मोहन पवार यांचा छोटा मुलगा अनिल पवार (वय 20) हा त्यांच्याच समाजातील महिलेसह 17 जानेवारी रोजी लग्नाकरिता पळून गेला होता. त्यानंतर हे भयानक हत्याकांड घडले. त्यामुळे सुरुवातीला पवार कुुटुंबातील 7 जणांनी बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात होता (वाचा सविस्तर). मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात मोहन पवार यांच्या चुलत भावांनीच हे हत्याकांड केल्याचे उघड झाले आहे.

*भीमा नदीच यांचे मृतदेह आढळले. 

मोहन उत्तम पवार (वय 50), संगीता मोहन पवार (वय 45), त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे (वय 32), पत्नी राणी शामराव फुलवरे (वय 27), त्यांचा मुलगा रितेश शामरावर फुलवरे (वय 7), छोटू शामराव फुलवरे (वय 5) व कृष्णा फुलवरे (वय 3), यांचे मृतदेह मंगळवारी भीमा नदीत आढळली होती. याबाबत यवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मोहन पवार हे मुळचे बीड जिल्हयातील गेवराई परिसरातील रहिवासी असून एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे राहण्यास आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करत होते. तर, त्यांचे जावई शामराव फुलवरे हे आपल्या कुटुंबासह उस्मानाबाद, वाशी येथे राहत होते.

शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते.तर गावपातळीवर सरपंच फडकवणार झेंडा.


बीड (प्रतिनिधी) जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे जालना जिल्ह्याचे सुद्धा पालकमंत्री असल्याने ते प्रजासत्ताकदिनाचे ध्वजारोहण जालना येथे करणार असल्यामुळे बीड येथील शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते होणार आहे. तर गावपातळीवरील ध्वजारोहण सरपंचाच्या हस्ते होणार आहे.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता चालू असल्याने ध्वजारोहण कुणाच्या हस्ते होईल याबाबत शंका होती. मात्र याबाबत प्रशासनाने स्पष्ट करत आचारसंहिता असल्याने शासकीय ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते तर गावपातळीवरील ध्वजारोहण सरपंचांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे जालना आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे सावे हे पालकमंत्री या नात्याने जालना या ठिकाणी 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण जालना येथे करणार आहत. त्यामुळे मुख्य शासकीय ध्वजारोहण जे की पोलीस मुख्यालय या ठिकाणी होते ते जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयातील झेंडा वंदन हे राधाबिनोद शमा यांच्याच हस्ते होणार आहे.

हिटर लावताना बसला विजेचा धक्का. पती-पत्नीचा जागीच मृत्यू .कुटुंबावर आघात पत्नीला वाचविताना पतीचाही झाला मृत्यू.

केज (कांतीकारी साथी न्युज) तालुक्यातील पिंपळगाव (घोळवे )येथील पती, पत्नीचा पाणी तापविण्याच्या हिटरमधून बसलेल्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली आहे. ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे (50) आणि इंदूबाई ज्ञानेश्वर सुरवसे (45) अशी मृतांची नावे आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे हे पत्नी इंदूबाई आणि आईसह पिंपळगाव येथे राहतात. आज पहाटे 4 वाजता झोपेतून उठल्यानंतर इंदुबाई या हिटर लावण्यासाठी पाण्याने भरलेली बकेट घेऊन विजेच्या बोर्डाकडे गेल्या. हिटर लावताच त्यांना विजेचा धक्का बसला. हे लक्षात येताच ज्ञानेश्वर यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात दोघा पती.  पत्नीचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक उमेश आघाव आणि पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मृतांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि वयोवृद्ध आई आहेत. याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी कुटुंबावर दोन आघात

सुरवसे दाम्पत्यांना 3 मुली आणि 1 मुलगा अशी 4 अपत्य होते. 12 वर्षांपूर्वी 1 मुलगी पाण्यात बुडून मृत्यू पावली होती, तर दुसरीने 5 वर्षा पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर एका मुलीचा विवाह झाला असून मुलगा बीडला शिक्षण घेतो आहे.

शिंदे-फडणवीस समर्थक आमदारकडून, पुन्हा: शासकीय कर्मचार्‍याला मारहाण.! आमदार संतोष बांगर यांची प्राचार्याला मारहाण...


हिंगोली (प्रतिनिधी) नेहमी कोणता न कोणत्या वादामुळे, कारणावरून व वक्तव्यावरून चर्चेत असणारे कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी.!  पुन्हा: एकदा एका शासकीय कर्मचार्‍याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

हिंगोली शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचे समोर आले आहे. आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर येत आहे.

आमदार संतोष बांगर यांनी यापूर्वी.! 1. जेवण पुरवणाऱ्या गोडाऊन व्यवस्थापकाला मारहाण केली. 2. विमा कंपनी कार्यालयाची तोडफोड आणि त्यानंतर कृषी अधिकाऱ्याला धमकावलं. एवढच नव्हे तर त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा देखील आरोप आहे. त्यानंतर आता पुन्हा: एकदा आमदार बांगर यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्याला मारहाण केली आहे. त्यामुळं आमदार बांगर यांचं आणि शासकीय कर्मचार्‍यांच काय भिनसल आहे; अशी चर्चा नागरिक करू लागले आहे. 

तर आमदार बांगर यांनी संबंधित प्राचार्याला का मारहाण केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, अशा पद्धतीने मारहाण करणे चुकीचे असल्याचे बोले जात आहे. तसेच या विषयावर आमदार बांगर यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. नगृकांमधून'ही आमदार यांच्याविषयी संतप्त प्रक्रिया उमटू लागल्या आहेत.