*मूळ गावाचाच पत्ता गृहीत धरले जात आहे.
आधारकार्ड बनवतांना बहुतांश जणांचा पत्ता मूळ गावाचाच नोंद केलेला असतो. मात्र पुढे व्यवसाय किंवा नोकरी निमित्ताने गाव सोडून अनेकदा इतर ठिकाणी स्थलांतर व्हावे लागते. मात्र या काळात आधार कार्डवर असलेला पत्ता सहसा कोणी बदलत नाही. त्यामुळे शहर किंवा गाव बदलेले असले तरीही आधारवरील पत्ता मात्र तोच कायम असतो. मात्र आता अशात केवळ आधार कार्डचा पत्ता ज्या गावचा आहे. त्या गावचे लोकेशन गृहीत धरून, परत मतदानासाठी त्याच गावात पाठवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न या मतदारांनी उपस्थित केला आहे.
*आहे त्याच ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळावा.
राज्यातील काही खाजगी शिक्षण संस्था सोडल्या तर जिल्हा परिषद अथवा संस्थेतील शिक्षकांच्या सुद्धा कायम बदल्या होत असतात. या शिक्षकांचे कामाचे ठिकाण बदलले तरी आधार कार्डवरचा मूळ पत्ता मात्र तोच राहतो. त्यामुळे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत तरी शिक्षकांना आहे, त्याच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने केली आहे.
तर अनेक शिक्षकांना एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यामध्ये मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जावे लागणार आहे. या निवडणुकीतील मतदारांचा आकडा जरी फार मोठा नसला, तरी या प्रक्रियेत सहभागी झालेल्या शिक्षकांना मात्र प्रशासनाच्या या कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
No comments:
Post a Comment