"एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ...शिवसंग्राम"

बीड (प्रतिनिधी) :- शहरात होत असलेल्या जिल्हास्तरीय इज्तेमाहसाठी जिल्हाभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने इज्तेमाहस्थळी दाखल झाले आहेत.इज्तेमाहस्थळाकडे जाणाऱ्या समाजबांधवांना स्व. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या प्रेरणेतून शिवसंग्रामच्यावतीने ठिकठिकाणी  पाणी बॉटल व फलाहाराची  सोय करण्यात आली होती. 
   बीड शहरात मागील कांही महिन्यापुर्वी लोकनेते विनायकरावजी मेटे यांनी ऐत्याहासिक मराठा आरक्षणाचा मोर्चा आयोजित केला होता, तेव्हा बीड शहरात  ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी पाणवठे उभारून मोर्चेकरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. त्याच पद्धतीने आज इस्तेमाच्या कार्यक्रम प्रसंगी शिवसंग्रामच्या वतीने पाणी बॉटल व फळे वाटप करण्यात आली याप्रसंगी शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

बीड शहरालगत असलेल्या तळेगाव येथे दोन दिवशीय इज्तेमाचे मुस्लिम बांधवांच्या वतीने आयोजन केले गेले. याप्रसंगी महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम बांधव या इज्तेमासाठी उपस्थित होत आहेत. याप्रसंगी " एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ " या उक्तीप्रमाणे मुस्लिम बांधवांसाठी  शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वंयस्फुर्तीने उपस्थित राहून  येणाऱ्या मुस्लिम बांधवांना फळे वाटप करत पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.
याप्रसंगी शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते प्रभाकरआप्पा कोलंगडे,जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,युवक जिल्हाध्यक्ष रामहरीभैया मेटे, सुहास पाटील,शहराध्यक्ष अँड. राहुल मस्के,अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष फेरोज पठाण,शिरूर तालुका अध्यक्ष माऊली शिंदे,ज्येष्ठ नेते योगेश शेळके, सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे,शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे,ज्येष्ठ अल्पसंख्यांक नेते शेख अखिल भाई,अजहर भाई,शकील खान,अल्पसंख्यांकचे युवा नेते सय्यद सलमान अली,इमरान जागीरदार, शिवसंग्राम नेते मनोज जाधव,महादेव बहिर,कैलास शेजाळ,गणेश धोंडरे,अशोक लोकरे,पांडुरंग बहिर,सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रा.पंडित शेंडगे,हरिश्चंद्र ठोसर,राजेंद्र कोटुळे,राजु येडे,रवी घुमरे व अन्य  पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.