बीड (प्रतिनिधी) :- बीड येथील रेल्वे स्टेशन व रेल्वे मार्गाकरीता संपादीत जमिनीबाबत बीड तर फ पिंगळे स.नं.151, 152, 153, 155, 156, 157, 158, 159, 134 व बलगुजार स.नं. 84, 87, 88,89, 90,91, 92, 94, 99, 100, 101, 102, 103 या सर्व्हे नंबरमध्ये दि. 9 डिसेंबर 2022 रोजी संयुक्त मोजणी वेळेस प्लॉटधारक जायमोक्यावर हजर नसल्यामुळे संयुक्त मोजणी अहवालामध्ये 7/12 अभिलेखानुसार नोंदी झालेल्या आहेत. तरी या जाहीर प्रगटनाद्वारे संबधीतास कळविण्यात येत असून दि. 10 डिसेंबर 2022 व 11 डिसेबर 2022 रोजीसंपादन सिमांकन मोजणी / चौकशीकामी नेमलेल्या दिनांकास आपण भूमि अभिलेख, बीड कार्यालयाचे सिरस्तेदार, परिरक्षण भूमापक व भूमापक यांच्याशीसंपर्क साधवा व सिमांकन मोजणीकामी आपले मालकीहक्क पुरावा कागदपत्रे घेऊन आपल्या भूखंडावर /जमिनीवर हजर रहावे, आपण हजर राहीला नाहीततर आपलेकाहीम्हणणे नाही. असेसमजून आलेल्या आक्षेपाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी,असे उप अधीक्षक भूमि अभिलेख, बीड यांनी आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment