परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा आयोजित भव्य धम्म मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवारी दिनांक ५/११/२०२२ रोजी भारतीय बौद्ध महासभा आयोजित भव्य धम्म मेळाव्याची तयारी परळी शहर व तालुक्यात करण्यात येत असुन याचाच एक भाग म्हणून परळी शहरात प्रचार व प्रसार करण्यासाठी सपिकर लावले असुन परळी तालुक्यातील वाघाळा येथे वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली असून या बैठकीस वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे वंचित बहुजन आघाडीचे परळी महासचिव विष्णुपंत मुंडे, युवक उपाध्यक्ष बनसोडे वंचित चे कार्यकर्ते अविनाश सरवदे हे उपस्थित होते तर याच वाघाळा येथे पन्नास सभासद नोंदणी ही करण्यात आली असून या गावातिल अनेक महिला सह युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते असे ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी माहिती दिली आहे
No comments:
Post a Comment