Wednesday, November 2, 2022

राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ति सरसकट मिळावी- सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते अक्षय गोटेगावकर.

पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठात विविध विषयांमध्ये संशोधन करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना  डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ति सरसकट मिळण्याच्या मागणीसाठी संशोधक विद्यार्थी कृती समिती 2021 च्या वतीने सोमवार पासून पुण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. राज्यभरातील एक हजार संशोधक विद्यार्थ्यांना हि राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती मिळावी या मागणीसाठी संशोधक विद्यार्थी कृती समिती हे आंदोलन करीत आहेत.
महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी कृती समिती सदस्य उपोषणासाठी बसलेले असून त्यांना वंचित बहुजन युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर/जिल्हाच्या वतीने उपोषणास सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने  जाहीर पाठिंबा देण्यात आला त्यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते ओमकार कांबळे आणि अभिजीत बनसोडे प्रमुख अक्षय गोटेगावकर मा. महासचिव कौस्तुभ ओव्हाळ, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नांदेड जिल्हा माजी संघटक तथा संशोधक विद्यार्थी प्रतिनिधी भीमराव रामजी सूर्यवंशी, विनय कांबळे युवा नेते वंचित बहुजन युवा आघाडी, पत्रकार निखिल गायकवाड  वाडिया महाविद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी हंसराज खुणे, मॉर्डन महाविद्यालय विदयार्थी प्रतिनिधी अथर्व लोंढे  इतर 72 जन उपोषणकर्ते  संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक ही उपस्थित होते

No comments:

Post a Comment