परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके यांचा वाढदिवसानिमित्त आज जेष्ठ नेते प्रा.विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी आज गुरूवार दि.17 नोव्हेंबर रोजी सत्कार करण्यात आला.
जेष्ठ नेते प्रा.विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष तथा आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन अॅड.विष्णुपंत सोळंके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते विजयकुमार देशमुख, अॅड.अमोल सोळंके, शिवलिंगआप्पा मरळे, सत्यजित सोळंके पत्रकार बालाजी ढगे, हेमंत कुलकर्णी, दत्ता चव्हाण बालाजी रामगिरवार, अश्वमेघ गिरी, मनोज मानधने यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
No comments:
Post a Comment