बीड (प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अधिसभा (सिनेट) निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे या प्रचारात वंचित बहुजन परिवर्तन पॅनलचे उमेदवार बीड दौऱ्या वर असताना वंचित बहुजन आघाडी आयोजीत पदविधारकांच्या बैठकीत आज सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे व मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी केले आहे.
यावेळी वंचित बहुजन परिवर्तन पॅनल चे प्रमुख प्रकाश इंगळे आणि खुल्या वर्गातील उमेदवार पंकज बनसोडे , नितीन फंदे , दळवी अनिल सरकटे विलास तसेच जोगदंड रोहित (एस सी प्रवर्ग) बर्डे भागवत (एसटी प्रवर्ग )आघाव विनोद (व्ही.जे एन टी प्रवर्ग ) गायकवाड नंदा (महिला प्रवर्ग), हे उमेदवार बैठकीला उपस्थित होते . बैठकीला वंचित चे जिल्हा सहसचिव पुरुषोत्तम वीर, भारत तांगडे, अंकुश जाधव, सुदेश पोतदार , बालाजी जगतकर ,प्रा गणेश खेमाडे,अजय सरोदे, महिला जिल्हाध्यक्ष ॲड.अनिता चक्रे, पुष्पा तुरुकमारे, नंदा भंडारे तालुकाध्यक्ष पप्पू गायकवाड,किरण वाघमारे डॉ.संजय नाकलगावकर, किशोर भोले,शहराध्यक्ष लखन जोगदंड , सुशील काकडे, विश्वजीत डोंगरे, भैया जावळे, संदीप जाधव, श्रीकांत वाघमारे, अजय साबळे यावेळी बीड शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दिवसभर बीड शहरातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन विद्यापीठ स्तरावरील बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार विजयी करा असे आवाहन करण्यात आले.
No comments:
Post a Comment