देशातील विविध महामार्गांवरील टोल नाक्यांवर लागणारी वाहनांची लांबच लांब रांग टाळण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित आणली. परंतु टोलनाक्यांवरील लांबलचक रांगांमध्ये काहीच फरक पडला नाही. दरम्यान, आता त्यापूढे जाऊन सरकार एएनपीआर प्रणाली कार्यान्वित करण्याच्या विचारधीन आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर देशातील प्रमख टोल नाक्यांसह छोटे छोटे टोलनाके हद्दपार होतील असा विश्वास प्रशासकीय अधिक-यांकडून व्यक्त केला जात आहे
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून ही नवी संकल्पना घेऊन येत आहे. या अंतर्गत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राजस्थानमध्ये असा ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे बनवत आहे, जिथे एकही टोल बूथ नसेल. याचा सर्वात मोठा फायदा वाहन चालकांना होणार आहे. जितकी रक्कम महामार्गावरून जाण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे तितकीच रक्कम त्याच्याकडून घेतली जाणार आहे
सध्या महामार्गावरून प्रवास करताना वाहनावर लावलेल्या फास्टॅगमधून टोलची आकारणी केली जाते. नवीन तंत्रज्ञान लागू झाल्यानंतर तुमच्या वाहनाची नंबर प्लेट स्कॅन केली जाईल आणि फास्टॅगमधून पैशांची आकारणी होईल. यामध्ये किलोमीटरच्या आधारे आकारणी होणार असल्याचे मानले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, टोलवर एकाच वेळी पैसे वसूल केले जात होते. मात्र नवीन प्रणालीनूसार महामार्गावर एकच एंट्री आणि एक्झिट पॉइंट असेल. वाहन दाखल होताच नंबर प्लेट स्कॅन होईल. त्यानंतर प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या अंतरानुसार प्रवाशांच्या खात्यातून पैसे कापले जातील
या संकल्पनेची सुरुवात राजस्थानपासून होत आहे. भारत माला प्रकल्पांतर्गत राजस्थानमध्ये ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे बनवला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, राजस्थानमध्ये त्याची एकूण लांबी 637 किलो मीटर असेल. हा एक्स्प्रेस वे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमधून जाणार आहे. त्याची लांबी 1224 किलो मीटर असेल. हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे पंजाबमधील अमृतसर ते गुजरातमधील जामनगरपर्यंत सुरू होईल. ते राजस्थान या दोन शहरांना जोडेल. या एन एच वरून अरबी समुद्रातील बंदरापर्यंत कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राजस्थानला एक समर्पित एक्सप्रेस वे मिळेल.
No comments:
Post a Comment