Friday, May 13, 2022

वसुंधरा महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गजानन सवने यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता.

घाटनांदुर( प्रतिनिधी) येथील वसुंधरा महाविद्यालयातील हिंदी विभागात कार्यरत प्रा. डॉ. गजानन भगवानराव सवने यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,औरंगाबादाने हिंदी विषयाची संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे.
प्रा. डॉ. गजानन सवने हिंदी विषयाचे संशोधक व अभ्यासक आहेत . त्यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र परिषदेमध्ये सहभागी झाले असून संशोधन पेपर प्रस्तुत केले आहेत. प्रा. डॉ. सवने यांची दोन पुस्तके प्रकाशित झाले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे अधिसभा सदस्य श्री गोविंदराव देशमुख हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो.शिवाजी सांगोळे प्रो. डॉ. संजय राठोड  प्राचार्य डॉ. अरुण दळवे प्रा.डॉ.काकासाहेब गंगणे  उपप्राचार्य डॉ. अर्जुन मोरे डॉ. संदीप प्रशाद प्रा डॉ मनीषा देशमुख श्री उमेश सरनाईक श्री भगवानराव सवने श्री मनोहर कांबळे प्रा. डॉ. पांडुरंग रणमाळ प्रा.नरसिग उदार प्रा.डॉ.श्रीधर साळुंके प्रा. उमेश घुले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment