Friday, May 13, 2022

बीड जिल्ह्यात 100 कोटीचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील भ्रष्टाचाराची दक्षता पथकाकडून चौकशीस विलंब का? - वसंत मुंडे

मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सरकार असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. सन 2016 ते 2018 च्या दरम्यान मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 101 कामे बीड जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आली त्यापैकी 2.90 टक्के ते 4.99टक्के वाढीव दराने 91 कामे दिली असून कमी दराने 1.99 ते 17.86 टक्के 10 कामे   आहेत यामध्ये ग्रामीण विकास सचिव व्ही आर नाईक सचिव ग्रामीण विकास विभागांतर्गत टीमने घोटाळा केलेला आहे.सर्व पुरावे शासनाकडे काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी दिल्यावर  शासनाने  क्रमांक:मुग्रायो_2020l/प्र.क्र.230/बांध_4 दि.26/10/2020 ला चौकशी करण्याकरिता अध्यक्ष मुख्य अभियंता पुणे सचिव राज्य गुणवत्ता समन्वयक पुणे सदस्य कार्यकारी अभियंता सोलापूर सह नेमणूक केलेली होती परंतु काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी चौकशी समितीवर आक्षेप नोंदवला आणि चौकशी समिती हीच भ्रष्टाचारी आहे.असा आरोप ग्रामीण विकास मंत्री व प्रधान सचिव कडे विनंती वसंत मुंडेंनी निवेदनाद्वारे करून परत विशेष पथक नेमण्यात साठी मागणी केली. तात्काळ परिपत्रक क्रमांक. मोग्रायो-2021 /प्र.क्र.335/बांधकाम-4 दि 2.6.2021 . बीड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे दि.7.9.2019व दि.9.9.2019 च्या निविदा प्रक्रिया संदर्भात सर्वच काम तपासण्या करिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दि. 17.9.2019 च्या परिपत्रका प्रमाणे मुख्य अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था पुणे अध्यक्ष आणि इतर सर्व अधीक्षक अभियंता औरंगाबाद, अधीक्षक अभियंता पुणे, कार्यकारी अभियंता जालना, आणि कार्यकारी अभियंता बीड महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांच्या पथकाने बीड जिल्ह्यातील सर्वच कामे तात्काळ तपासण्यासाठी निविदा प्रक्रिया संदर्भात चौकशी करण्यासाठी समितीचे गठन करण्याबाबत प्रवीण जैन उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी माननीय राज्यपालाच्या मान्यतेनुसार आदेश देण्यात आलेले आहे अशी माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दिली . 
महाराष्ट्र राज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी व ग्रामीण भागातील दुरावस्था झालेले रस्तेची करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली याचा गैरफायदा अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगनमताने खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात भ्रष्टाचार झालेला आहे .सर्व नियमाला बगल देऊन कामे न करतात बिले उचलेले आहेत. एकही कामाचा रस्त्यातील अंदाजपत्रकाच्या नियमाप्रमाणे कामे झाले नाहीत, तसेच साईट पट्ट्या चे काम झाले नाही ,झाडे लावले नाहीत, नियमाप्रमाणे बोर्ड लावलेले नाहीत , रोड नाल्यावर चे कामे नियमानुसार केली नाहीत .पुलाची कामे अर्धवट आहेत, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले आहे 5 वर्षे करता दुरुस्तीसाठी शासनाने त्यांच्या निविदेमध्ये तरतूद केलेली आहे त्या प्रमाणे कुठेही रस्ता दुरुस्त केला जात नाही. सर्व बाबी अधिकाऱ्यांशी संगनमत करून गुत्तेदार यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला असून अतिवृष्टी व पावसामुळे सर्व रस्ते उखडलेले आहेत त्यामुळे तात्काळ शासनाने चोकशी समिती नेमली आहे. चौकशीस विलंब होत आहे. म्हणून तिसरी वेळ दि. 07/जानेवारी 2022 ला स्मरण पञ मुग्रायो-/प्र.क .230/बांध--4 महाराष्ट्र  शासनाकडून वसंत मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या संदर्भात समिती गठित करण्यासाठी तिसरी वेळ आदेश काढावे लागले आहेत . परंतु स्थानिक बीड जिल्ह्यातील आजी-माजी आमदार खासदार मंत्री व गुत्तेदार मंडळींनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची चौकशी करण्यात येऊ नये असा राजकीय दबाव समिती वर आणल्यामुळे शासनाचे आदेश देऊनही चौकशीस विलंब करीत आहे असा आरोप काँग्रेसचे ओबीसी चे नेते वसंत मुंडे यांनी केला . 
  मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या सर्वच कामाचा कालावधी संपलेला असूनही आजतागायत कामे केलेली नाहीत,त्याकरिता तात्काळ समितीने मुद्दे निहाय चौकशी करून , शासनाकडे नियमानुसार कारवाई करून अहवाल सादर करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला.

No comments:

Post a Comment