Saturday, May 21, 2022

एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गळा चिरुन निघृण हत्या.


औरंगाबाद (प्रतिनीधी):- शहरात गेली काही दिवस मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत . यातच काही दिवसांपूर्वी शहरात युवकाचा काही युवकांनी निर्घृण खून केला होता. 21 एप्रिल 2022 रोजी देखील औरंगाबादेत तरुणाला बेदम मारहाण करुन खून करण्यात आला होता. निर्दयी घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला होता. आज बरोबर एक महिन्यानंतर हत्येच्या दुसऱ्या घटनेने औरंगाबाद हादरले आहे. तर चार दिवसात 19 वर्षीय तरुणीची हत्या होण्याची ही शहरातील दुसरी घटना आहे.

औरंगाबाद शहरात शनिवारी एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गळा चिरुन निघृण हत्या करण्यात आली. शहरातील देवगिरी महाविद्यालयाच्या परिसरात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ग्रंथी सुखप्रीत कौर असे मृत तरुणीचे नाव आहे. ती ‘बीबीए’च्या प्रथम वर्षात शिकत होती. हल्लेखोराने तिला जवळपास 200 फूट ओढत नेऊन तिची चाकूने गळा चिरुन हत्या केली.

घटनेनंतर हल्लेखोर शरण सिंग पसार झाला असून, पोलिसांची 3 पथके त्याच्या मागावर आहेत. विशेष म्हणजे घटनास्थळाचा परिसर नेहमीच विद्यार्थी व नागरिकांनी गजबजलेला असतो. त्यामुळे आरोपी तरुणीला तब्बल 200 फूट फरफटत ओढत नेत असताना हे सर्वजण काय करत होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तूर्त, या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

No comments:

Post a Comment