Saturday, May 21, 2022

वंचित बहुजन आघाडी चा टोकवाडी येथील सर्कल मेळावा जिल्ह्यासाठी दिशादर्शक - अशोक हिंगे


*पांचाळ व  हिंगे यांच्या उपस्थिति शेकडो महिलांनी घेतला वंचित मध्ये प्रवेश.

बीड (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी चा टोकवाडी तालुका परळी येथील सर्कल मेळावा अवकाळी पाऊस येऊन गेल्या नंतरही यशस्वी ,राज्याचे उपाध्यक्ष नागोराव पांचाळ मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे पुरुषोत्तम वीर,बालाजी जगतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्रद्धेय अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्रात राजकीय सत्ता आनन्या साठी  वंचित बहुजन आघाडी या पक्षाची निर्मिती झाली आहे, अठरा पगड जाती ला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात घोडदोड करीत आहे लोकसभा विधानसभा व सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अवघ्या तीन वर्षात प्रस्थापित राजकीय पक्षांना टक्कर देण्याची ताकत वंचित मध्ये आहे , ज्या ओबीसी मायक्रोबेस जाती आहेत त्यांना राजकीय मंच वर स्थान देऊन त्यांच्यातील राजकीय अस्मिता जागी करण्याची भूमिका वंचित च्या माध्यमातून झाली आहे, संख्येने कमी असणाऱ्या जातींना देखील राजकीय प्रवाहात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्न शील आहे, 
वंचित बहुजन आघाडी  खऱ्या विरोधकाची भूमिका सध्याया महाराष्ट्रात बजावत आहे, मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण सी ए ए,एन.आर.सी,सह महागाई, अन्याय अत्याचार व भ्रष्टाचाराच्या विरोधात, रस्त्यावर उतरून काम करणारा पक्ष म्हणून ओळखली जात आहे.या पक्षाकडे सर्वसामान्य मध्यमवर्गीय वंचित उपेक्षित लोकांचा येण्याचा कल वाढला आहे, टोकवाडी येथील तालुका सर्कल मोळाव्यात 
यशोधरा राठोड सह शेकडे
 महिलांनी प्रवेश घेऊन याची प्रचिती दिली आहे,
परळी तालुक्यातील मौजे टोकवाडी येथे पक्षप्रवेश व सर्कल मेळावा सर्कल  मेळावा घेण्यात आला होता त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष नागनाथ पांचाळ मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, सर्कल मेळाव्याचे आयोजक विष्णुपंत मुंडे, जिल्हा सहसचिव पुरुषोत्तम वीर,उपाध्यक्ष गौतम आगळे, मिलिंद घाडगे,संपादक बालाजी जगतकर,यशोघरा राठोड, गोविंद मस्के  तालुका अध्यक्ष संजय गवळी,गौतम साळवे,बाळु किरवले,राजु भुतके,साहेबराव रोडे,वसंत रोडे,विश्वनाथ धनघावकर,
कार्यक्रमाचे संचलन मिलिंद घाडगे तर आभार अँड,शआर्जून सोंळंके यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परळी तालुका पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment