नांदेड (प्रतिनीधी) :- नांदेड मध्ये संजय बियाणी असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. बियाणी घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. नांदेड शहरातील आनंदनगर भागात ही गोळीबाराची घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. गोळीबारात संजय बियाणी गंभीर जखमी झाले आहेत. बियाणी यांच्यावरील गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्यावर गोळी झाडून कोणी हल्ला केला, हे अजूनही समजलेलं नाही. बियाणींच्या हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. मात्र भरदिवसा रस्त्यात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने नांदेड हादरले आहे._*
*काय आहे प्रकरण?*
*_नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्याच घरासमोर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झालाय. या दोन्ही जखमींवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत._*
_*हा गोळीबार कुणी केला याचा पोलीस घटनास्थळी येऊन शोध घेत आहेत. यातील दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने शहरात तणावाचे वातावरण पसरलं आहे. संजय बियाणी हे नांदेडमधले मोठे प्रस्थ असून खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.*_
_*गोळीबारात बियाणी गंभीर जखमी*_
_*दरम्यान, गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालीय का याचा शोध घेणे सुरू आहे. नांदेडमध्ये गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट झाला असून गोळीबाराच्या घटना आता अगदीच सामान्य होत चालल्या आहेत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आजच्या या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात मोठी दहशत पसरलीय.*_
No comments:
Post a Comment